Tag: मूल शहर

  • माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

    माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – 16 जानेवारीला चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी समोर मूल शहरातील विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली, सदर मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यावर विविध प्रश्न उपस्थित झाले आहे, सदर व्हिडीओ आपण बघितला तर आपल्या मनात नागरिकांची माणुसकी मरण पावली हे निश्चित लक्षात येईल.

    https://youtu.be/z5JcUNFl-b8?si=KokBeD-Bh7hZHVYr

     

    रेल्वे येत असताना गेट पडले, शहरातील वार्ड क्रमांक 4 येथे राहणारी स्नुषा उर्फ कुणाली नरेश कामडे ही 26 वर्षीय विवाहिता, गेट जवळ आली मात्र ती रेल्वे गेट ओलांडत नव्हती, काही वेळ ती तिथेच उभी राहली, अनेकांना प्रश्न ही पडला असेल ही महिला तिथं का उभी आहे मात्र कुणीही तिला काही विचारण्याची हिंमत दाखवली नाही, रेल्वे आल्यावर स्नुषा ने त्यापुढे स्वतःला झोकून दिले,

     

    हा सर्व मृत्यूचा तमाशा नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी बघितला मात्र माणुसकी मरण पावल्याने कुणीही स्नुषा ला तिथून थांबविले नाही.

     

    ह्या सर्व घटनेची सीसीटीव्ही फुटेज पुढे आली आहे, आजच्या आधुनिक युगात कोण काय करत? याकडे कुणाचं लक्ष नाही कदाचित कुणी स्नुषा ला हटकले असते तर ती नक्कीच वाचली असती.

  • दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

    दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळा हेटी येथील रहिवाशी असलेले राजू भेंडारे वय(३५) व दशरथ जेंगठे वय(२४) हे दोघे आपल्या दुचाकीने नातेवाईकांकडून पैसे आणण्यासाठी चंद्रपूर कडे जात असताना नागाळा नजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिल्याने राजू भेंडारे हा जागीच गतप्राण झाला तर सोबत असणारा मित्र दशरथ जेंगठे हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

     

    मृतक राजू भेंडारे यांना पत्नी व दोन मुले असून राजू आर्थिक अडचणीत असल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जात होता.

     

    मृतक राजुचा व्यवसाय ट्रॅक्टरने रेती दुलाई करणे करीत होता काही दिवसापूर्वी राजूची ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडल्याने त्याला दंडाची रक्कम भरायची होती म्हणून तो पैशासाठी धावपळ करीत होता. पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.

  • मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

    मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

    News34 chandrapur

    मूल – साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.

     

    या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली , बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत . त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार, २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार २०१९ ला योग समितीच्या वतीने जाहीर सत्कार २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे.

     

    साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांचे सामाजिक कार्य अपूर्व आहे . २००२ पासून त्या बालसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले . व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात.

     

    पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर, झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले, वृंदा पगडपल्लीवार, सुनील बावणे, प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे, वर्षा भांडारवार, गणेश मांडवकर, विजय लाडेकर, नामदेव पीजदूरकर, परमानंद जेंगठे, पंडित लोंढे, प्रशांत भंडारे, रामकृष्ण चनकापुरे, सुनील पोटे, सुरेश डांगे, संतोष मेश्राम, मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

  • मोबाईलवरून भांडण झाले आणि त्याने केलं असं भयावह

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : कौटुंबिक वादामधुन रागाच्या भरात एका युवकाने तलावात उडी घेवुन जीवन संपविल्याची घटना मूल शहरात घडली. गुलाब मारोती मंकीवार असे मृतकाचे नांव आहे.

     

    सावली तालुक्यातील चारगांव येथील रहीवाशी गुलाब मारोती मंकीवार (२८) हा मागील काही महीण्यांपासुन मूल येथील साईश्रध्दा रेस्टारंट येथे कामावर होता. नेहमी प्रमाणे दुपारी १२.३० वा. चे दरम्यान गुलाब जेवनासाठी म्हणुन कामावरून घरी आला. सवयीप्रमाणे गुलाब दारू पिवुन घरी आल्यानंतर त्याने पत्नीला मोबाईल मागीतला. गुलाबने यापुर्वी दोनदा मोबाईल नेवुन विकले असल्याने पत्नीने त्याला मोबाईल देण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

     

    भांडणाचे रूपांतर हातघाईवर आले. यावेळी मृतक गुलाबची आई, सासु आणि सासरे उपस्थित होते. पती पत्नीचा वादात त्यांनी मध्यस्थी करून गुलाबला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला राग अनावर झाल्याने तो घरून धावत येवुन स्थानिक बस स्थानका लगतच्या तलावात उडी मारली.

     

    युवकाने तलावात उडी मारल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश बंसोड यांनी सहका-यांसह घटनास्थळ गाठले. भोई समाजातील काही मंडळीच्या सहकार्याने तलावात शोध घेतल्यानंतर तब्बल दोन तासानंतर गुलाबचे पार्थीव गळाला लागले. शव विच्छेदना नंतर गुलाबचे पार्थीव त्याच्या कुटूंबियाचे स्वाधीन करण्यात आले.मृतकाला चार वर्षाची मुलगी आहे.