Tag: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

  • Ladki Bahin bank Kyc : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात

    Ladki Bahin bank Kyc : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात

    ladki bahin bank kyc मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला, जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये महिपाच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र अजूनही लाखो बहिणीला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही.

    अवश्य वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबपोर्टल सुरू


    कारण महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही, केवायसी झालेली नाही.
    त्यामुळे हजारो महिला रोज बँकेत जात केवायसी साठी रांगा लावत आहे.
    रक्षा बंधनाच्या पूर्वी खात्यात बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार असा शब्द सरकारने दिला मात्र ऐन रक्षाबंधनाला बहिणी बँकेच्या बाहेर उभ्या आहे.

    राजकारण : चंद्रपुरातील रस्ते खड्डेमुक्त करा – सुधीर मुनगंटीवार

    Ladki bahin bank kyc बँक खात्यात पैसे न आल्यामुळे लाडकी बहीण केवायसी च्या फेऱ्यात अडकली आहे. मोठ्या प्रमाणात माहिला बँकेत केवायसी करण्यासाठी येत असल्याने बँकेतील कर्मचारी सुद्धा हैराण झाले आहे.

    बँकेने मुख्यमंत्री शिंदे यांना केली सुरक्षेची मागणी

    माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसै मिळाले नाहीत अशा महिला बँकेत गर्दी करत आहेत. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, आधार लिंक स्टेटस पाहण्यासाठीही महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक महिला बँक कर्मचाऱ्यांशी भांडणही करत आहेत. याच कारणामुळे महिलांची बँकांत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

    असा करा अर्ज

    शासनाने अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीद्वारे लाभार्थी अर्ज करू शकतात, ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास त्या महिला ऑफलाईन अर्ज करू शकतात, ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्याकडे करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत हे अँप व ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र याठिकाणी जावून लाभार्थी महिला आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतात.

    आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे? हे जाणून घेऊ या…

    सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुया.  हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in    या संकेतस्थळावर जावे लागेल.   

    त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar 
    आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा. 
    आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचं आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल. 

    त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार तो टाका. 
    ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात. 
    आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
    आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा. 
    आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.  

  • Ladki Bahin Web portal : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबपोर्टल सुरू

    Ladki Bahin Web portal : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबपोर्टल सुरू

    ladki bahin web portal – महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर महिलांनी त्याला भरभरून प्रतिसाद देत कोट्यवधी अर्ज दाखल केले, विशेष म्हणजे अर्ज मंजूर झाल्यावर 14 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यात DBT द्वारे 3 हजार रुपये जमा करण्यात आले.

    Ladki bahin web portal 23 ते 23 लाख महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नसल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने सध्या बँकेत महिलांची रांग लागली आहे, आता नवा अर्ज दाखल करताना महिलांना काही समस्या उदभवू नये यासाठी शासनाने थेट वेब पोर्टल सुरू केले आहे.

    लाडकी बहीण योजना : 31 ऑगस्ट नंतर बंद होणार काय ही योजना? वाचा सविस्तर


    Ladki Bahin Web portal महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही अर्ज प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही अर्जप्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन अर्जाकरता तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, प्रभाग समितीमध्ये संपर्क साधू शकता. तर, ऑनलाईन अर्जाकरता अँप आणि वेबसाईटचा वापर करू शकता. ऑफलाईन आणि अँपवरील अर्जप्रक्रिया तुम्हाला माहीत झालीच असेल. आता तुम्हाला वेबसाईटद्वारे अर्जप्रक्रिया कशी भरायची हे आम्ही सांगणार आहोत.

    ➡️वेबसाईटद्वारे लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?
    https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

    ➡️उजव्या बाजूला असलेल्या अर्जदार लॉगिनवर क्लिक करा.

    ➡️खाली असलेल्या Creat Account वर क्लिक करा.

    तुमच्या समोर आता साईन अपसाठी पेज ओपन झालेलं असेल.

    ➡️तिथे असलेली माहिती भरा, कॅप्चा द्या आणि साईनअपवर क्लिक करा.

    ➡️आता तुमचं अकाऊंट ओपन झालं.

    ➡️आता होमपेजवर येऊन अर्जदार लॉगइनवर पुन्हा क्लिक करा आणि तिथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड भरा.

    ➡️मेन्यूच्या बाजूला तीन पांढऱ्या रेषा असलेल्या सब मेन्यूबारवर क्लिक करा.

    ➡️तिथे तुम्हाला Application For Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana वर क्लिक करायचं आहे.

    तुमच्या समोर आता आधार कार्ड आणि कॅप्चा असलेलं पेज ओपन झालं असेल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून वेरिफाय आधार करायचं आहे.

    ➡️वेरिफाय आधार केल्यानंतर तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आला असेल. त्या फॉर्ममधील माहिती भरा.

    ➡️माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली कागदपत्रांचे फोटो अपलोड करायचे आहेत.

    ➡️फोटो अपलोड करताना ५ एमबीच्या वर अपलोड करू नका. अन्यथा ते अपलोड होणार नाहीत.

    ➡️संपूर्ण माहिती आणि कागदपत्र भरल्यानंतर सबमिट फॉर्मवर क्लिक करा. तुमच्यासमोर तुम्ही भरलेली माहिती आली असेल.

    ➡️ही माहिती पुन्हा एकदा वाचा. या माहितीत काही बदल करायचे असतील तर काही असलेल्या ए़़डीटवर क्लिक करा. तिथे माहिती भरून पुन्हा सेव्ह करा.

    आता तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी सज्ज आहे. खाली असलेल्या सबमिटवर क्लिक करा.

    ➡️क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Application Submitted Successfully असा पॉप अप मेसेज येईल. तिथंच तुमचा अँप्लिकेशन नंबर आणि तुमचं नाव असेल.

    ➡️हा फॉर्म आता प्रशासनाकडून तपासला जाईल. तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल तर काही दिवसांनी तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारला असल्याचा मेसेज येईल.

    🔢लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत काय आहे?

    ➡️मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही तटकरे यांनी सांगितले.

  • ladki bahin yojana : फक्त याचं महिलांना मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार रुपये

    ladki bahin yojana : फक्त याचं महिलांना मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार रुपये

    ladki bahin yojana सध्या राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भुरळ पाडत आहे, निवडणुकी आधी महायुती सरकारने मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्प अधिवेशनात अजित पवार यांनी केली होती.

    योजनेत अर्ज करण्यासाठी विविध अटी ठेवण्यात आला, केसरी रेशनकार्ड, आधार कार्ड, हमी पत्र, शाळा सोडल्याचा दाखला असे विविध कागदपत्राच्या आधारावर सदर योजनेत महिला पात्र असणार, अर्ज करण्याची तारीख येताच महिलांनी सेतू केंद्रावर अमाप गर्दी केली, योजनेचे सर्व्हर जाम झाले, सरकारने नारीशक्ती ऐप काढली महिलांनी घरूनच अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले.

    योजना लाडकी बहीण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

    Ladki bahin yojana दिवसा अर्ज भरण्यास महिलांना अडचण येत असल्याने अनेकांनी मध्यरात्री आपले अर्ज भरले, अर्ज केल्यावर महिला निश्चिन्त झाल्या, मात्र अर्ज स्वीकारल्यावर काय सूचना येणार याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले, काही दिवसांनी नारीशक्ती व लाडकी बहीण योजना पोर्टलवर अनेकांचे अर्ज in review, pending, approved, disapprove असे संदेश दिसायला लागले अनेकांना काही समजले नाही, त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज चुकले त्यांना पुन्हा एकदा अर्ज एडिट करण्याची संधी देण्यात आली.

    महायुती सरकारने योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला देणार असल्याचे जाहीर केले, मात्र अनेक महिलांचे अर्ज नामंजूर झाल्याने त्यांचा अर्ज मंजूर होणार की नाही अशी चिंता आजही महिलांच्या मनात आहे, तर आपण याबाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया.

    सध्या अर्जाची स्थिती काय आहे?

    Pending Status – पेंडिंग अर्थात अर्थ प्रलंबित असल्याचं स्टेटस तुम्हाला दिसत असल्यास सदर अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होतं.

    Reject Status – अर्जावर रिजेक्ट अर्थात बाद किंवा रद्द असा शेरा असल्यास तुमचा अर्ज नाकारला गेल्याचं लक्षात घ्यावं.

    Review Status – अर्जाच्या स्टेटसमध्ये Review म्हणून दिसत असल्यास तुमचा अर्ज पुनरावलोकन टप्प्यावर आहे असं समजा.

    Approval Status – हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, अर्ज तपासून त्याची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाल्याची बाब स्वीकृती अर्थात Approval Status दर्शवतो.

    वरील चारही टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, अर्जावर Approval Status दिसत असल्यासच त्या अर्जदार महिलेला सरकारमान्य 1500 रुपयांची रक्कम मिळते. त्याव्यतिरिक्त Pending किंवा Review स्टेटस दिसत असल्याच निधीसाठीची प्रतीक्षा आणखी लांबते हे लक्षात घ्यावं.

    अर्ज प्रलंबित विंका पुनरावलोकन टप्प्यांमध्ये असला तर निधी येण्यासाठीची प्रतीक्षा आणखी वाढत असून, अर्ज रिजेक्ट म्हणजेच रद्द झाल्यास मात्र खात्यावर कोणतीही रक्कम जमा होत नाही. राहिला मुद्दा एखादा अर्ज प्रलंबित का राहतो याविषयीचा, तर यामागं काही कारणं आहेत.

    अनेकदा अर्ज भरताना काही चूका झालेल्या असतात. पण, अर्ज भरताना काहीही चूक न होताही अर्ज प्रलंबित दिसत असल्याच अर्जदारांनी चिंता करू नये. हा अर्ज पुढील प्रक्रियेतून जात असून, तपासणी प्रक्रिया सुरू असल्यामुळंही Pending Status दाखवलं जातं.

    असं कळेल अर्जाचं स्टेटस?

    > मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करा
    > अॅप सुरु करून त्यात लॉगइन करा.
    > अर्डाचा क्रमांक किंवा अर्जदार महिलेचं नाव टाकून Get Status वर क्लिक करा.
    > तुमच्यासमोर अर्जाच्या स्टेटसचे तीन पर्याय दिसणार असून, तिथं तुम्ही नेमकं स्टेटस पाहू शकता.

  • Ladki Bahin Yadi : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, यादीत असं तपासा तुमचे नाव

    Ladki Bahin Yadi : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, यादीत असं तपासा तुमचे नाव

    ladki bahin yadi माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिला ऑनलाइन माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    ओबीसी बांधवांसाठी आनंदाची बातमी : चंद्रपुरात 17 ऑगस्टला सुरू होणार ओबीसी वसतिगृह

    अशी तपासा ऑनलाईन लाभार्थ्यांची यादी

    • Ladki bahin yadi सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
    • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
    • या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
    • तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
    • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
    • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

    अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यावर महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर लाखो महिलांनी अर्ज भरला काहींचे अर्ज नामंजूर झाले, मात्र त्या महिलांना पुन्हा अर्ज भरण्याची मुभा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

    या योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. नारीशक्ती या एप वरून लाखो महिलांनी आपला अर्ज एडिट केला आहे.

  • Majhi Ladki Bahin : चंद्रपूर जिल्ह्यात 23 हजार 718 अर्ज नामंजूर

    Majhi Ladki Bahin : चंद्रपूर जिल्ह्यात 23 हजार 718 अर्ज नामंजूर

    Majhi Ladki bahin राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्ट नंतरही ही योजना सुरू राहणार आहे, त्यानुसार पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    Majhi ladki bahin नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. राजूरकर, प्रा. अतुल देशकर आदी उपस्थित होते.

    बिबट्याने गावात घेतला आश्रय आणि बछड्याना दिला जन्म

    जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 2 लक्ष 84 हजार 923 अर्ज आले असून 2 लक्ष 11हजार 326 अर्जाची तपासणी झाली आहे. यापैकी 1 लक्ष 87 हजार 463 अर्ज मंजूर झाले असून त्रुटी पूर्ततेत 23718 अर्ज आहे. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील. तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

    अर्ज नामंजूर तर पुन्हा करा दुरुस्त

    ज्यांचा अर्ज नामंजूर झाला आहे त्यांनी पुन्हा नारीशक्ती ऐप चा वापर करून एडिट करा, संपूर्ण कागदपत्रे व माहिती योग्य तपासून ती पुन्हा सबमिट केल्यास 2 दिवसात अर्ज मंजूर करण्यात येईल.

  • Ladki bahin arj : महिलांनो आता शेवटची संधी

    Ladki bahin arj : महिलांनो आता शेवटची संधी

    ladki bahin arj – मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात आजपर्यंत 2 लक्ष 70 हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच 27 जुलैपासून ऑनलाईन अर्ज तपासणीचे काम सुरू झाले असून प्रत्येक तालुका स्तरावर वॉररूम तयार करण्यात आली आहे. यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आाहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन हे या योजनेच्या कार्यप्रणालीवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक बनण्याची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

    Ladki bahin arj अर्जदारांसाठी सुचना : 1) ज्या यंत्रणांनी ऑफलाईन अर्ज जमा केले आहेत त्यांनी तातडीने अर्ज ऑनलाईन करावे. अर्जदारांनी आपला अर्ज ऑनलाईन असल्याची खात्री करावी. यासाठी अर्ज ऑनलाईन झाल्याचा एसएमएस आला की नाही हे तपासावे. ज्यांना असा एसएमएस आला नसेल त्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज ऑनलाईन भरून घ्यावा. 2) अर्जाची तपासणी होऊन अर्ज मंजूर झाला असेल तर त्याबाबत अर्ज मंजूर झाल्याचा एसएमएस अर्जदाराच्या मोबाईलला येणार आहे. ज्या अर्जदाराचे अर्ज काही कारणाने नामंजूर झालेले असेल अशा अर्जदारांना याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. 3) अर्ज नामंजूर झाल्याची कारणे ज्या मोबाईल मधून अर्ज भरला असेल तेथे दिसून येईल. अर्ज दुरुस्त करण्याची एक संधी अर्जदारास असणार आहे. त्यामुळे अर्जदाराने अशा अर्जातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करून अर्ज सबमिट करावा, ही संधी एकदाच असून त्यानंतर अर्ज कायमचा बाद होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.