Tag: माझी लाडकी बहीण योजना

  • majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

    majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

    majhi ladki bahin yojana 2024 महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, सदर योजनेत महिलांना आधी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र सरकारने त्या अडचणी दूर केल्या.

    महत्वाचे : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना

    majhi ladki bahin yojana 2024 14 ऑगस्ट पासून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये जमा झाले, ज्यांनी जुलै महिन्यात अर्ज भरले त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे, ज्यांनी नंतर अर्ज केला त्यांना पुढील दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.

    मात्र सध्या सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार आहे अशी अफवा सध्या जोर पकडत आहे, याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.

    काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार बघा

    राज्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली, 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये सरकार द्वारे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.
    चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लक्ष 81 हजार अर्जाला मंजुरी दिली अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, मात्र आता सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार अशी अफवा सुरू आहे, पण ही योजना कधीच बंद होणार नाही, 31 ऑगस्ट नंतर सुद्धा महिल या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

  • Ladki Bahin Yadi : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, यादीत असं तपासा तुमचे नाव

    Ladki Bahin Yadi : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, यादीत असं तपासा तुमचे नाव

    ladki bahin yadi माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिला ऑनलाइन माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    ओबीसी बांधवांसाठी आनंदाची बातमी : चंद्रपुरात 17 ऑगस्टला सुरू होणार ओबीसी वसतिगृह

    अशी तपासा ऑनलाईन लाभार्थ्यांची यादी

    • Ladki bahin yadi सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
    • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
    • या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
    • तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
    • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
    • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

    अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यावर महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर लाखो महिलांनी अर्ज भरला काहींचे अर्ज नामंजूर झाले, मात्र त्या महिलांना पुन्हा अर्ज भरण्याची मुभा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

    या योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. नारीशक्ती या एप वरून लाखो महिलांनी आपला अर्ज एडिट केला आहे.

  • Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

    Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

    Transgender scheme संपूर्ण राज्यभर माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ योजना सरकार राबवित असून योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यासाठी महिला व बेरोजगार तरुणांची लगबग ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे. परंतु समाजातील दुर्लक्षित असलेले आर्थिक दुर्बल व वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना कोणत्याही योजना नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे माझी लाडकी बहिण योजनेसारखी योजना तृतीयपंथीयासाठी ही राबवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनमार्फत मुख्यमंत्र्यांना मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    अवश्य वाचा : मदत छोटीशी मी आपल्या सदैव पाठीशी – प्रतिभा धानोरकर


    Transgender scheme तसेच तृतीयपंथीयासाठी सरकार तर्फे राबविण्यात येणारी कल्याणकारी योजनेचा लाभ देखील पोहचत नसून यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसून याच्या उपाययोजनेसाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


    यावेळी व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, रोजगार व स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जील्हासाचिव किशोर मडगुलवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, महिला सेना शहरअध्यक्ष वर्षा भोमले, कामगार सेनेचे अक्षय चौधरी, मनविसचे करन नायर, सुयोग धनवलकर, मयूर मदनकर, निकी यादव, अनुप माथणकर, शुभम वांढरे व संबोधन संस्थेचे अधक्ष राज कचोरे उपस्थित होते.

  • Ladki bahin chandrapur :  आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 39 हजार 367 लाडक्या बहिणीचे अर्ज

    Ladki bahin chandrapur : आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 39 हजार 367 लाडक्या बहिणीचे अर्ज

    Ladki bahin chandrapur चंद्रपूर – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे.

    अवश्य वाचा : मानव वन्यजीव संघर्ष थांबणार कधी? – अभिलाषा गावतुरे

    या योजनेचे जिल्ह्यात ऑफलाइन आणि ऑनलाईन मिळून एकूण 39 हजार 367 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिक रित्या भरलेल्या व इतर संस्थांनी भरलेल्या अर्जाचा समावेश नाही. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. 

    https://ads.timesdiginews.com/2024/07/main-bus-stand-chandrapur-increase-in-theft-incidents-install-cctv/

    Ladki bahin chandrapur जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 22,476 तर ऑनलाईन पद्धतीने 16891 असे एकूण 39 हजार 367 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात शहरी अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन 5529, ऑनलाईन 3859 एकूण 9388 अर्ज), ग्रामीण अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन 14931, ऑनलाईन 11994 एकूण 26925 अर्ज), चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन 1429, ऑनलाईन 535 एकूण 1964 अर्ज), जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन 117, ऑनलाईन 90 एकूण 207 अर्ज) तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये (ऑफलाईन 470, ऑनलाईन 413 एकूण 883 अर्ज) अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिकरित्या महिलांनी भरलेले व इतर सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी भरलेल्या अर्जाचा समावेश करण्यात आला नाही.

  • Ladki Bahin Yojana Maharashtra : ही तर महिलांचा छळ करणारी योजना – डॉ.अभिलाषा गावतुरे

    Ladki Bahin Yojana Maharashtra : ही तर महिलांचा छळ करणारी योजना – डॉ.अभिलाषा गावतुरे

    Ladki bahin yojana maharashtra वर्ष २०२४ – २५ अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या गाजवाज्याने घोषणा केलेली ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाचक अटी बघता असे लक्षात येईल कि, हि योजना केवळ गरजू गरीब लाभार्थ्यांना लाभापासून कसे वंचित ठेवता येईल यावर जास्त भर देण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया भूमिपूत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करा – खासदार धानोरकर

    ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा दिनांक १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ ठेवण्यात आली आहे. या १५ दिवसाच्या कालावधीत महिलेला अधिवास प्रमाणत्र आणि २.५० लाख पेक्षा कमी उत्पनाचा दाखला काढून या आणि इतर कागदपत्रांसह online अर्ज करणे अपेक्षित आहे. परंतू महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ या कायद्यामध्ये या दोन्ही प्रमाणपत्र १५ दिवसाच्या कालावधीत नागरिकांना पुरवणे बंधनकारक आहे.

    महत्त्वाचे : क्षुल्लक वादात पतीने पत्नीवर केला प्राणघातक हल्ला, बाबूपेठ येथील घटना

    Ladki bahin yojana maharashtra जर सरकाने स्वतः मान्य करत आहे कि हे प्रमाणपत्र काढण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागतो तर महिलांनी या कालावधीत प्रमाणपत्र काढायचे कधी आणि online अर्ज करायचा कधी?

    महिला शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, दिनांक १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ या १५ दिवसाच्या कालावधीत अधिवास प्रमाणत्र आणि २.५० लाख पेक्षा कमी उत्पनाचा दाखला काढण्यासाठी लागणारे माहेरकडचे आणि सासरकडचे कागदपत्र आणि योजने साठी लागणारे इतर कागदपत्रांची जुळवा जुळवा  करायची कशी हे समजण्या पलीकडचे आहे.

     

    Ladki bahin yojana maharashtra समजा ही कागदांची जुडवा-जुडव करण्याची जादू एका शिक्षित महिलेने केली आणि यशस्वीपणे online अर्ज करण्याची लढाई जिंकली पण अशिक्षित महिलांचे काय? अशा कितीतरी शिक्षित आणि अशिक्षित महिला या योजने पासून वंचित राहतील.

    सध्या अनेक सेतू केंद्रावर महिलांची मोठ्या संख्येत अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती, मात्र योजनेची वेबसाईट ओपन न झाल्याने महिलांना घरी परत जावे लागले.