Tag: महेश मेंढे

  • Mahesh Mendhe : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महेश मेंढे

    Mahesh Mendhe : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महेश मेंढे

    mahesh mendhe नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून  शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश देण्यात आल्यानंतरही यंत्रणेला जाग आली नसून शेतकरी संकटात सापडला आहे.   या संकटाच्‍या काळात शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी बांधावर पोहचले आहे.

    अपघातग्रस्त युवक-युवतीच्या मदतीला धावले आमदार

     Mahesh mendhe अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी मदतीचा हाथ हा थांबला नसून त्यांनी आत्ता आपला मोर्चा शेतकऱ्याकडे वाढविला आहे. त्यांच्या बांधावर जाऊन मदत करणे सुरु आहे.  मागील जुलै महिण्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस होत असुन धरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले फुगले आहेत.अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शेतात घुसुन साचुन राहिल्याने उभे धान पिक सडले.तसेच काही पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे.
    त्यामुळे शेतकरी पुरते अडचणीत आले असून अतिवृष्टीमुळे जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहुन महेश मेंढे यांनी पुढाकार घेतला व शेतकरी वर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा बांधावर जाऊन त्यांची विचारणा केली. त्यांना मदत करू असे मानत त्यांना सहानभूती दिली.  

    पावसाचे दिवस असल्याने त्यांना शेतात काम करताना अडचण होत असल्याने त्यांना त्यापासून संरक्षण करण्याचे उद्देश्याने छत्रीचे वाटप केले.

     यावेळी उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम ,सचिन रणवीर, समीर सोनवणे, अथर्व फुलझेले, सर्वेश पिसे, मीनल गुरव , राजेश पिंपळकर , विनय देठे,  पियुष धुपे यांची उपस्थिती होती.

  • A helping hand : गरजू नागरिकांना महेश मेंढे यांचा आधार

    A helping hand : गरजू नागरिकांना महेश मेंढे यांचा आधार

    A helping hand चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती यातच दिव्यांग हनुमान सेंगेरपला अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान,  काँग्रेसचे नेते महेश मेंढेनी मदतीचा हाथ दिला असून हनुमानाला मोठा सहारा मिळाला आहे.

    अवश्य वाचा – गडचांदूर बॉम्ब प्रकरणी जुळ्या भावांना अटक

    A helping hand अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान,  काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या माध्यमातून चंद्रपुरात गोर गरीब आणि सामान्यांना मदतीचा हात हा हाक मारण्याअगोदर पोहचत आहे. मग मदत मागणारा असो व गरजू त्यांना मदत करण्याचे काम हातही घेतले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील युवक बनणार पायलट, सुवर्णसंधी चा लाभ घ्या

    नुकतेच मुसळधार पावसाने मागील दहा दिवसापासून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  कुठे पुराने वेढले तर कुठे पावसाच्या मुसळधार सरींमुळे छत गेले. तर काहींचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अश्याना महेश मेंढे कडून मदत देणे सुरु असून सर्वाना एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशाना तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काही गरजूना आर्थिक मदत देण्यात आली.

    अवश्य वाचा : महिन्याभरात 3 वेळा पूर, आणि हा मार्ग तीनदा झाला बंद


    अश्यातच शिवाजी नगर येथील दिव्यांग हनुमान नरसंहरू सेंगेरपला पावसामुळे परिस्थिती हलाकीची  झाली असून त्याचे छत गेले असतांना मदतीची हाथ म्हणून हेश मेंढे यांनी मदत केली आहे.  त्यामुळे परिसरात महेश मेंढेच्या मदतीची चर्चा सर्वाकडे होत आहे.

    महेश चा हात हा लवकर गरजू पर्यंत पोहचत असल्याने त्यांना सहारा मिळत आहे .

  • Chandrapur rainfall : नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले महेश मेंढे

    Chandrapur rainfall : नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले महेश मेंढे

    chandrapur rainfall चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टीवासीय गोरगरीब गरजू लोकांना आर्थिक मदत व ताळपत्रीचे वितरण अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे करण्यात आले.

    अवश्य वाचा : पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख

    Chandrapur rainfall मुसळधार पावसाने मागील सहा दिवसापासून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून होणाऱ्या मानवी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशा कुटुंबांच्या मदतीसाठी महेश मेंढे यांनी तात्काळ धाव घेतली असून तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काही गरजूना आर्थिक मदत देण्यात आली.


    मुसळधार पावसामुळे घरांच्या आतील भागांना अधिक नुकसान होऊ नये म्हणून या ताडपत्री तात्पुरत्या छप्पर म्हणून वापरल्या जातील. त्यामुळे त्यांना थोडा सहारा मिळेल या उद्देशाने त्यांना ताळपत्रीचे वाटप करण्यात आले. ताळपत्री वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब गरजू लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. सदर उपक्रमात लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
    यावेळी मीराबाई लक्ष्मण जंगळे, नीता घनश्याम वालदे, नविना गणेश अवचारे, हनुमान नरसंहरू सेंगेरप, भारत सेंगेरप, कमलाबाई देवांगण, पिंकी शंकर बंदरकर यांना मदत करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात थरारक घटना


    यावेळी आर्थिक मदत व ताळपत्रीचे वाटप करतांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांचेसह मनपाचे माजी उपमहापौर वसंतदादा देशमुख, समाजसेविका सौ. वैशाली चंदनखेडे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चंदनखेडे, उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम, समीर सोनवाने, सर्वेश पिसे, राहुल बंडावार, सचिन रणदिवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.