Tag: महाविकास आघाडी सरकार

  • Popular Maha Vikas Aghadi : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या विकासाच्या थापा व फोल प्रचार

    maha vikas aghadi राज्यात परिवर्तनाची लाट… गाफील राहू नका – विजय वडेट्टीवार, मुल येथे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक

    Maha vikas aghadi राज्यात महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून यामुळें राज्यातील शेतकरी, शेतमजूर नौकरदार, कर्मचारी, महीला वर्ग, विध्यार्थी, बेरोजगार तरुण – तरुणी यांच्यात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. तसेच राज्यांत गगनाला भिडलेली महागाई, महीला अत्याचार, गंभीर गुन्हे , गुंडाराज या सर्व बाबींमुळे हे भ्रष्ट महायुती सरकार सपेशल अपयशी ठरले आहे. आता राज्यांतील नागरीकांना परिवर्तन हवे असून येणारा सत्ताकाळ हा महाविकास आघाडीचा आहे.

    महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रुपये – विजय वडेट्टीवार

    Maha vikas aghadi यामुळे कसलेही गाफील न राहाता प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि विजय मिळवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते बल्लारपूर – मुल विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकी प्रसंगी बोलतं होते.

    तुमच्या सोन्यावर या महिलांची नजर

    आयोजित बैठकीस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा मध्यप्रदेश आमदार कुणाल चौधरी, महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, संदीप गड्डमवार, घनश्याम मुलचंदाणी, चंदू पाटिल मारकवार, बेबी उईकें, सूर्यकांत खणके, मयूर राईकवार, प्रकाश गांगरेड्डीवार, सुनील समर्थ, सुमित उनाडकट, रामकृष्ण ओंद्रा, प्रमोद बोरीकर, दिलीप माकोडे, के. के. सिंग, अशोक निमगडे, डॉ.सुरेश महाकुलकर, चित्रा डांगे, करीम भाई शेख,गोविंद उपरे, कवडू कुंदावार तथा अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. Maha vikas aghadi


    पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यांतील महायुती हेकेखोर सरकार केवळ कमिशन खोरी, भ्रष्ट्राचार, उद्योगपतींची चाकरी करणारे आहे. येथील प्रकल्प गुजरातला पाठवून यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. राज्याची अस्मिता गुजरातला गहाण ठेवणाऱ्या या लुटारु सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठीं आपण तन – मन – धनाने महाविकास आघाडीचे हात बळकट करावे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिकणार असा सर्वे कर्त्यांचा अंदाज आहे. आता वेग वाढवा विरोधकांच्या खोटारड्या डावाला हाणून पाडा. असे आवाहन ही त्यांनी उपस्थितांना केले.

    यावेळी मार्गदर्शनपर बोलताना महाराष्ट्र प्रभारी आमदार कुणाल चौधरी म्हणाले की, संतांच्या या पावन भूमीत महाभ्रष्ट , मनुवादी भाजप कडून थोर पराक्रमी राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मितीत भ्रष्ट्राचार करून त्यांचा अवमान केला जातो. जाती धर्मामध्ये भांडणे लावली जातात. देश विकायला काढणाऱ्या या महापापी साम्राज्याला सत्तेतून पूर्णतः हद्दपार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने काम केले पाहिजे असे ते म्हणाले.


    या प्रसंगी महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत आणि सामजिक कार्यकर्ते चंदू पाटिल मारकवार, यांनी बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्रात विकासाच्या थापा मारणाऱ्या भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांच्या फोल प्रचाराचा विशेष शैलीत खरपूस समाचार घेतला. यावेळी बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

  • हिंगणघाट जळीत कांडाची 3 वर्षांनी पुन्हा चर्चा

    News34 chandrapur

    वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे, महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं जळीत कांडातील पीडित कुटुंबाला मदतीच्या नावावर निव्वळ आश्वासन देण्यात आले होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.

    ३ फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. ८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने 10 फेब्रुवारीला निर्भयाचा मृत्यू झाला होता.

    ही घटना वर्धा निर्भया प्रकरण व हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले. याच घटनेमुळे शक्तीकायदयाचे सुतोवाच झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश निर्माण झाला होता.

    संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते.

    मात्र उध्दव ठाकरे आणि मविआ त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही, २.५ वर्ष कसलीही काहीही मदत केली नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

     

    महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या जळीतकांडाचा महाविकास आघाडीलाच विसर पडला होता, अखेर महायुतीच्या सरकारकडून
    पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    अडीच वर्ष सत्तेत असनार ठाकरे सरकारने फक्त घोषणाबाजीच केली होती प्रत्यक्ष मदत मात्र शुन्य, अखेर पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल पुढे करीत पिडीत कुटूंबियाला जाहिर मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

    तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून नुसतीच घोषणाबाजी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात मदत ही महायुती सरकारने केली.

     

    मात्र दिनांक २५ सप्टेबर, २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सदर निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली

    निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे असे चित्राताई वाघ म्हणाल्या.

    निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला.