Tag: महाराष्ट्र सरकार

  • Ladki Bahin Yojana Maharashtra : ही तर महिलांचा छळ करणारी योजना – डॉ.अभिलाषा गावतुरे

    Ladki Bahin Yojana Maharashtra : ही तर महिलांचा छळ करणारी योजना – डॉ.अभिलाषा गावतुरे

    Ladki bahin yojana maharashtra वर्ष २०२४ – २५ अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या गाजवाज्याने घोषणा केलेली ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाचक अटी बघता असे लक्षात येईल कि, हि योजना केवळ गरजू गरीब लाभार्थ्यांना लाभापासून कसे वंचित ठेवता येईल यावर जास्त भर देण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया भूमिपूत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करा – खासदार धानोरकर

    ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा दिनांक १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ ठेवण्यात आली आहे. या १५ दिवसाच्या कालावधीत महिलेला अधिवास प्रमाणत्र आणि २.५० लाख पेक्षा कमी उत्पनाचा दाखला काढून या आणि इतर कागदपत्रांसह online अर्ज करणे अपेक्षित आहे. परंतू महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ या कायद्यामध्ये या दोन्ही प्रमाणपत्र १५ दिवसाच्या कालावधीत नागरिकांना पुरवणे बंधनकारक आहे.

    महत्त्वाचे : क्षुल्लक वादात पतीने पत्नीवर केला प्राणघातक हल्ला, बाबूपेठ येथील घटना

    Ladki bahin yojana maharashtra जर सरकाने स्वतः मान्य करत आहे कि हे प्रमाणपत्र काढण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागतो तर महिलांनी या कालावधीत प्रमाणपत्र काढायचे कधी आणि online अर्ज करायचा कधी?

    महिला शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, दिनांक १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ या १५ दिवसाच्या कालावधीत अधिवास प्रमाणत्र आणि २.५० लाख पेक्षा कमी उत्पनाचा दाखला काढण्यासाठी लागणारे माहेरकडचे आणि सासरकडचे कागदपत्र आणि योजने साठी लागणारे इतर कागदपत्रांची जुळवा जुळवा  करायची कशी हे समजण्या पलीकडचे आहे.

     

    Ladki bahin yojana maharashtra समजा ही कागदांची जुडवा-जुडव करण्याची जादू एका शिक्षित महिलेने केली आणि यशस्वीपणे online अर्ज करण्याची लढाई जिंकली पण अशिक्षित महिलांचे काय? अशा कितीतरी शिक्षित आणि अशिक्षित महिला या योजने पासून वंचित राहतील.

    सध्या अनेक सेतू केंद्रावर महिलांची मोठ्या संख्येत अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती, मात्र योजनेची वेबसाईट ओपन न झाल्याने महिलांना घरी परत जावे लागले.

  • Maharashtra swayam student yojana : आता विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

    Maharashtra swayam student yojana : आता विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

    Maharashtra swayam student yojana शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वर्षाकाठी ३२ हजार रु., निवासी भत्ता २० हजार रु. आणि निर्वाह भत्ता ८ हजार रु. असे ६० हजार रुपये दिले जातील. 

     

    Maharashtra swayam student yojana इतर महसुली विभागीय शहरांतील उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रांमध्ये भोजनभत्ता २८ हजार रु., निवास भत्ता १५ हजार रु. आणि निर्वाह भत्ता ८ हजार रु. असे ५१ हजार रुपये देण्यात येतील. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ही रक्कम अनुक्रमे २५ हजार रु., १२ हजार रु. आणि ६ हजार रु. म्हणजे एकूण ४३ हजार रु. असेल. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे २३ हजार रु., १० हजार रु. आणि ५ हजार रु. अशी ३८ हजार रु. असेल.

     

    Maharashtra swayam student yojana प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना म्हणजे राज्यातील २१ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.* त्यात व्यावसायिक शिक्षण घेणारे ७० टक्के विद्यार्थी, तर बिगरव्यावसायिक शिक्षण घेणारे ३० टक्के विद्यार्थी असतील. ६० टक्के गुणांसह १२ वीनंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू असेल. रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

    सध्या कोणाला लागू?

    अनुसूचित जाती, जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना आधीपासूनच लागू करण्यात आली आहे. धनगर समाजातील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना हे एक मोठे प्रोत्साहनच असेल. – अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

  • चंद्रपुरात गर्भवती महिलेला मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल शहरात 14 ऑक्टोबर ला रात्रीच्या सुमारास शेजाऱ्यांनी गर्भवती महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे, या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राज्यात एकीकडे सरकार महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना काढत आहे मात्र दुसरीकडे महिलांवर अत्याचार वाढत आहे, असाच एक संतापजनक प्रकार मूल शहरात उघडकीस आला.

     

    शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये राहणारे 27 वर्षीय आकाश बोर्डावार राहतात, मोल मजुरी करीत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, 6 महिन्यांपूर्वी आकाश चे लग्न दामिनी सोबत झाले, सध्या दामिनी ही 3 महिन्याची गर्भवती आहे.

     

    आकाश यांच्या घराशेजारी राहणारे राहुल प्रेमलवार राहत असून त्यांच्यासोबत नेहमी होणारे वाद बघता आकाश बोर्डावार यांचे बोलणे बंद आहे. 14 ऑक्टोबर ला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे हे बोर्डावार यांच्या घरापुढे येऊन जोरजोरात ओरडत शिवीगाळी करू लागले.

     

    त्यांचा आवाज ऐकून आकाश व त्यांची आई शोभा बोर्डावार यांनी शिवीगाळी का करता म्हणून हटकले, हटकले म्हणून चौघांचा पारा चढला व त्यांनी आकाश सोबत मारहाण केली, आकाश ला मारहाण होत असताना त्यांच्या गर्भवती पत्नीने पतीला वाचविण्यासाठी मध्ये गेली मात्र चौघांनी दामिनी ला सुद्धा मारहाण करीत तिला अश्लील शिवीगाळी केली.

     

    या मारहाणीत दामिनी जखमी झाली, पती आकाश ने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.

     

    आकाश ने याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, पोलिसांनी राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे यांच्यावर कलम 324, 294,  506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.