Tag: मराठा समाज

  • Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य

    Maratha Reservation

    चंद्रपूर – महादेव जाणकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री, आज चंद्रपुरात आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन केलं.

    Maratha Reservation महादेव जाणकर यांनी आरक्षणाच्या विषयावर केलेलं वक्तव्य करीत कोर्टात मराठा आरक्षण 100 टक्के टिकणारं व त्याबाबत तिळमात्र शंका नाही असे ते म्हणाले.  जाणकर यांचं मराठा आरक्षण संदर्भात त्यांचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे – मराठयांना आरक्षण द्या पण आमच्या गरिबांच्या ताटातल नको. आम्ही त्यांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही.

    अवश्य वाचा : पत्रकारांच्या मुलाचा लंडनमध्ये सन्मान

    महादेव जाणकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्याचं म्हणजे ओबीसी समाज आरक्षणाचे अधिकार विकसित केलेले आहे. त्यांनी ओबीसी समाजाच्या आमदारांचं आणि खासदारांचं कमी होण्यामुळे त्या समाजाची परवड झाली आहे. महादेव जाणकर यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटलांची चुकीची होती असं म्हणालं. त्याप्रमाणे सगेसोयरे सुद्धा राज्यघटनेला अवमूल्य आहे.

    महादेव जाणकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्याचं आणि त्याच्या अभ्यासाचं म्हणजे विधानसभेत मराठा आरक्षण संदर्भात कायदा बनविला तो कोर्टात टिकेल असं म्हणाले. त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की आरक्षणाचं विषय न्यायिक प्रक्रियेत टिकणार असल्याचं आपला विश्वास आहे.

    मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या विचारांच्या आधारे केला आहे. त्यांनी या निर्णयाने समाजाला आणि राष्ट्राला आरक्षणाचे महत्त्व वाटवलेलं आहे. आरक्षणाच्या माध्यमातून गरीब, असामान्य वर्गातील लोकांना समान अवसर मिळवायला मदत होईल, हे त्यांचं मत आहे.

    महादेव जाणकर यांनी आपलं वक्तव्य देऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर आपलं दृष्टिकोन दाखवीला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयांचं त्यांनी विश्वास व्यक्त केला की ते न्यायिक प्रक्रियेत टिकणार असल्याचं आपलं मत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

     

    सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी व इतर असे एकूण 270 अधिका-यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

     

    सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने आयोगाकडून नियुक्त पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षकांकडून 20 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकारी तसेच प्रत्येक तालुका प्रशिक्षकांना तसेच 21 व 22 जानेवारी रोजी तालुकास्तरावर सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

     

     

    घरोघरी येऊन सर्व्हेक्षणाचे कामकाज करणा-या प्रगणकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सर्व कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाकरीता प्रश्नावली निश्चित करण्यात आली आहे. सदर सर्व्हेक्षण हे मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. तरी प्रगणकाच्या घरभेटीवेळी कुटुंबातील सज्ञान सदस्याने घरी थांबून सर्व्हेक्षण करणा-यास सहकार्य करावे व विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

  • ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    News34 chandrapur

    नागपूर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात 2 समाज एकमेकांसमोर उभे झाले आहे, या तिढ्याचा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही संकल्पबद्ध आहोत, सोबतच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे.

    आरक्षणावर विविध समाज एकमेकांसमोर उभा राहणे ही परिस्थिती योग्य नाही, राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री या महत्वाच्या प्रश्नावर गंभीर असून लवकरचं सर्व समाजाच्या फायद्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदें घेतील, तो पर्यंत राज्यात शांतता कायम ठेवा, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास संकल्पबद्ध आहोतचं सोबत ओबीसी समाजावर कसलाही अन्याय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा कौल देवेंद्र फडणवीसांना!

    News34 chandrapur

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या भाजपला मिळालंय.

     

    राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मनोज जरांगे – पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या उपोषणानंतर राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनोज जरांगे – पाटील यांनी भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, या टीकेचे धनी होऊन देखील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येनं मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं निवडणूक निकालांमधून स्पष्ट होतंय. त्याचबरोबर राज्यातल्या ओबीसी समाजाने देखील देवेंद्र फडणवीसांना पूर्वीपासून दिलेली साथ अजूनही सोडलेली नाही.

     

    उलट ओबीसी आणि मराठ्यांनीच भाजपचा हा मोठा विजय साकार केल्याचं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलंय. यामुळे राज्याचं खरं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच असल्याच्या विचाराला आता पुन्हा बळकटी मिळताना दिसतेय.
    ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या दुपारी 3.30 वाजता आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप ७१७ राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४०७, शिवसेना (शिंदे गट) २६२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) १८५, कॉंग्रेस २०७, शिवसेना (ठाकरे गट) ११४, आणि इतर 60 आहेत.

    आंदोलनातील टीकेचा परिणाम नाही

    मराठा आरक्षण आंदोलन काळात टीका होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जरांगे – पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्यांमध्ये 4 मंत्र्यांसह 2 माजी न्यायमूर्तींना पाठवण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या माजी न्यायमूर्तींंनीची जरांगेंना आरक्षण मिळवण्यासाठी लागणारा वेळ व त्यामागची कायदेशीर गुंतागुंत समजवून सांगितली.

     

    हे जाणून घेतल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा संदेश जनतेत गेला. हे सगळं होत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच अतिशय भरघोस यश भाजपच्या पारड्यात पडल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. निवडणूक निकालांमधून हे सिद्ध होत असून निकाल येण्यासाठी शिल्लक राहिलेल्या इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी घेतली आहे.

  • ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत – डॉ. अशोक जीवतोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व सर्व पक्षीयांचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी जाहीर आभार मानले आहे.

     

    काल (दि.११) ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत सर्व पक्षीय बैठक मुंबई येथे पार पडली. त्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांतर्फे असे ठरले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्या जाणार नाही. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण दिले जावे असे मान्य केले. यासाठी त्यांचे जाहीर आभार डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले.

     

    मात्र या निमित्ताने बिहारच्या धरतीवर जात निहाय जनगणना करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू करावे व स्वाधार योजना सुरू करावी या व इतर मागण्या देखील सरकारने मान्य कराव्या असे मत देखील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

     

    सोबतच काल (दि.११) ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मराठ्यांना ओबीसी समाजात समाविष्ट करू नये, याबाबत चर्चा केली. तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेवून मार्गदर्शन केले.

     

    त्यानंतर मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला चर्चेसाठी बोलवावे, असे पत्र देखील देण्यात आले आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.