Tag: मराठा समाज आरक्षण

  • चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

     

    सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी व इतर असे एकूण 270 अधिका-यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

     

    सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने आयोगाकडून नियुक्त पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षकांकडून 20 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकारी तसेच प्रत्येक तालुका प्रशिक्षकांना तसेच 21 व 22 जानेवारी रोजी तालुकास्तरावर सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

     

     

    घरोघरी येऊन सर्व्हेक्षणाचे कामकाज करणा-या प्रगणकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सर्व कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाकरीता प्रश्नावली निश्चित करण्यात आली आहे. सदर सर्व्हेक्षण हे मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. तरी प्रगणकाच्या घरभेटीवेळी कुटुंबातील सज्ञान सदस्याने घरी थांबून सर्व्हेक्षण करणा-यास सहकार्य करावे व विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

  • मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – भावसार समाजाची मागणी

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – भावसार समाजाची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर :-भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री संजय जी पवार चंद्रपूर यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही परंतु ओबीसी आरक्षणातून देण्यात येऊ नये. असे निवेदन देण्यात आले.

     

    या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, मीनाक्षी अलोने, कांता दखणे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, बबन धानेवार, निकेश पेटकर, प्रदीप गोविंदवार,मोहन जिवतोडे,आदी समाज बांधव उपस्थित होते. इतर मागास वर्गात एकूण 346 जाती आहेत त्यात 37 मुस्लिम जाती पण आहेत. राज्यात एकूण ओबीसींची संख्या 27% आहे मात्र आरक्षण 19% देण्यात येत आहे.

     

    ओबीसींना जाती-गणनेनुसार 27% आरक्षण देण्यात यावे हे अपेक्षित होते. त्यात मराठा समाजाचा १० टक्के लोकसंख्येचा भार का सहन करायचा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठा समाजातील १० टक्के लोकसंख्येचा भार ओबीसी आरक्षणावर पडेल व ओबीसी वर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आपल्या जीवाची परवाना करता आमरण उपोषण सुरू केले ओबीसींना जागविण्याकरीता आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोतच परंतु ओबीसी नेतेच स्वतःच्या स्वार्थाकरिता त्यांना विसरलेले दिसतात.

     

    कुठे पोहोचले मनोज जरांगे पाटील, कुठे आहेत रवींद्र टोंगे पाटील. (त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते सांगा कोणासाठी लढायचे)हीच ओबीसींची खरी समस्या आहे. न्यायमूर्ती खत्री आयोग व न्यायमूर्ती बापट आयोगाने आरक्षण नाकारले होतेच. तेव्हा सदर आयोगाचाही विचार होणे गरजेचे आहे. आम्ही मराठा समाजास आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. त्यांना आरक्षण शासनाने खुशाल द्यावे परंतु ओबीसीच्या कोट्याला न हात लावता आरक्षण देण्यात यावे.

  • मराठा समाज आरक्षणावर आमदार बोर्डीकर यांची सुप्रिया सुळेवर जोरदार टीका

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून सध्या काही आमदार व खासदार राजीनामे देण्याच्या तयारीत आहे, मात्र या गंभीर प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 40 दिवसापासून सरकारने मराठा आरक्षण बाबत काय केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    यावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार समाचार घेत, अनेक वर्षे शरद पवार साहेब सत्तेत होते जर त्या काळात आपल्या वडिलांनी मराठा समाजबाबत काही चांगले निर्णय घेतले असते तर आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.

     

    सरकार आरक्षण प्रश्नावर गंभीर आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समजाला न्याय देतील, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होत मात्र मविआ सरकार आलं आणि आरक्षण गेलं, त्यावेळी आपण गप्प होता सुप्रियाताई, उगाच उलटसुलट प्रतिक्रिया देत आमच्या मराठा बांधवांच्या भावना भडकवू नका ही आपल्याला विनंती आहे.