Tag: मकरसंक्रांत

  • मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे. धर्म, जात, वर्ण, चालीरीती, रूढी, परंपरा या अंगलट न आणता व अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारणे काळाची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिल्या जाते त्याचा गोडवा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथे आयोजित मकर संक्रांत महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते.

     

    आयोजित मकर संक्रांत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात
    कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार
    सहउद्घाटक म्हणून माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे हे तर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची उपस्थिती होती. सहअध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार हे उपस्थित होते.

     

    प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, बाजार समितीच्या उपसभापती तथा न.प. सभापती सुनिताताई तिडके, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, मुंबई येथील कंत्राटदार विजय भागडकर, माजी पोलीस पाटील किशोर तिडके, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डी. के. मेश्राम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी सरपंच ईश्वर ठाकरे, उपसरपंच सुरेश ठिकरे, माजी अध्यक्ष से.सो. अनिल पिलारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, क्षेत्र विकासासोबतच जनतेचे आरोग्य, शासनाचे जनकल्याणकारी योजना, व त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता रोजगार शिक्षण व मूलभूत सुविधा करण्याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने माझी असून ती मी सदैव विश्वासहतेने पार पाडणर अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
    प्रास्ताविक खेमराज तिडके यांनी तर सूत्रसंचालन संतोष पिलारे यांनी केले.

    गावकऱ्यांनी अनुभवला महीला कबड्डीचा थरार

    संक्रांत महोत्सव निमित्ताने आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी कबड्डी सामन्यांमध्ये दाखवलेले डावपेच बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदी कुंकू, वाणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
    त्यानंतर रात्री एकल व सामुहीक नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात गावातील महिलांसह मुला-मूलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे परिक्षण राहुल मैंद व पराग सहारे यांनी केले.
    विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीसे सुध्दा ठेवण्यात आली आहे.
    विद्यार्थ्यांसाठी मोटीव्हेशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नांदेड येथील बालाजी गाडे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत यांनी मार्गदर्शन केले.

     

    वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण

    तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व कंत्राटदार विजय भागडकर यांच्या कडून गावातील वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

  • चंद्रपुरात घडली दुर्दैवी घटना

    चंद्रपुरात घडली दुर्दैवी घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. आनंद विठ्ठल वासाडे (४३) रा. भानापेठ वॉर्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.

     

    मकरसंक्रांतीला पतंगबाजीचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. अनेकजण पंतग उडविताना दिसतात. पतंग तोडण्यासाठी पेच लावण्याची स्पर्धा बच्चेकंपनी आणि युवकांमध्ये दिसते. पतंग कटल्यानंतर ती पतंग लुटण्यासाठी बच्चेकंपनी पतंगीच्या मागे धावताना दिसतात. तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजानेही अनेकांचा गळा कापल्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. पोलिसांकडूनही विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे यावर्षी नायलॉन मांजा बाजारात दिसत नसला तरी, पतंग उडविण्याचा जोश कायम आहे. मात्र, हाच जोश अनेकदा अंगलट येत असल्याची चित्र आहे.

     

    रविवारी भानापेठ येथील आनंद विठ्ठल वासाडे हे घराच्या स्लॅबवर गेले. याचवेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद वासाडे गेले. मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
    ऋषीदेव आत्माराम वासाडे यांनी या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली.

     

    तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक मानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

  • जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

    जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जानेवारी महिना, संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीचा जोर. यासोबतच आजच्या युगात नायलॉन मांजा वापरला जात आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले.

    सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, या परंपरेनुसार आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून त्याचा आनंद लुटतो. मात्र आज नायलॉन मांजाचा बेकायदेशीर वापर इतका वाढला आहे की, त्यामुळे पादचाऱ्यांना अनेक दुखपतींना सामोरे जावे लागत आहे, शिवाय पक्ष्यांनाही अनेकदा जीव गमवावा लागतो.

     

    या संदर्भात चंद्रपूर शहरात जनजागृतीसह चंद्रपूर काँग्रेस कमिटीचे पर्यावरण जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.पाटील यांना निवेदन दिले. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी यावेळी कुरेशी यांनी केली.

     

    यावेळी आयुक्तांनीही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी एजाज खान, परवेज शेख, अखिलेश जनबंधू, शारिक भाई आदी उपस्थित होते.

  • नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.

     

    नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

    दुर्गापूर पोलिसांना मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने 6 जानेवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील समृद्धी पतंजली दुकानावर धाड मारली.

     

    या धाडीत प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला, असून पोलिसांनी 2 चकऱ्या जप्त केल्या आहे, दुकान चालक आरोपी रामचंद्र नंदूरकर यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सहकलम 188 भांदवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक म्हणून लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली, दुर्गापूर पोलीस स्टेशनला रुजू होताच पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वर्षातील प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.