Tag: भीषण अपघात

  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

    News34 chandrapur

    बुलढाणा – सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन परत निघालेल्या भाविकांचा शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील वर्ष 2023 मधील दुसरा भीषण अपघात आहे.

    कशी घडली घटना?

    नाशिक जिल्ह्यातील काही भाविक बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शन झाल्यावर नाशिक कडे परत जात असताना वैजापूर जांबरगाव शिवारातील टोल नाक्याजवळ उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

     

    स्थानिक नागरिक धावले मदतीला

     

    अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य चालविले, अपघातात भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे पूर्णतः चक्काचूर झाले, वैजापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली असता तात्काळ घटनास्थळी 5 ते 6 अंबुलन्स दाखल झाले, 20 प्रवासी जखमी झाले असून काहींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    या अपघातात जखमी व मृत प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावातील निवासी आहे.

    वैजापूर जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील जांबर गाव टोलनाक्यावर उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, मृतांमध्ये 4 महिन्याचा बालकाचा सुद्धा समावेश आहे.

     

    अपघातांचे कारण समोर

    स्थानिक नागरिकांनी सांगितले की शनिवारी रात्री RTO ने समृद्धी महामार्गावर ट्रक अडविला, ट्रक बाजूला घेत असताना हा अपघात झाला, धडक इतकी भीषण होती की अपघाताचा आवाज परिसरातील गावात दणाणला.

  • चंद्रपुरात ऑटोवर ट्रक झाला पलटी, तिघांचा जागीच मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर – चंद्रपूर बायपास मार्गावर ट्रक एका ऑटो वर पलटला असता झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी आहे. ही दुर्देवी घटना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

     

    मृतक मध्ये संगीता चाहांदे (५६, रा. गडचिरोली), अनुषका खेरकर (२२, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय ४९, बाबुपेठ) यांचा समावेश आहे.

     

    शहरातील अष्टभुजा मंदिराजवळील गोंदिया कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३४ एम १८१७ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेळी शेजारून जाणारा एक ऑटो क्रमांक एम एच ३४ एम ८०६४ हा ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीच ठार झाले तर तिन लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

     

    अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बातमी लिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू आहे. जखमीमध्ये राजकला मोहूर्ले (वय ३४, रा. बाबुपेठ), गीता शेंडे (वय ५०, रा. तुकुम), दशरथ बोबडे (वय ५०, रा. वणी) यांचा समावेश आहे. घटनास्थळ गाठुन पीएसआय हिवसे यांनी पंचनामा केला.

  • भीषण अपघातात 11 प्रवाश्यांचा मृत्यू

    News34chandrapur

    राजस्थान – लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 21 वर पहाटे 5 वाजता भीषण अपघात घडला, या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला.

     

    भावनगर वरून मथुरे ला जाणाऱ्या बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते, मात्र सकाळच्या सुमारास भरतपूर आग्रा मार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे वाहन चालकाने बस महामार्गावर थांबवित, दुरुस्ती करीत होते.

     

    रस्त्याच्या कडेला बस उभी केल्याने प्रवासी सुद्धा बसच्या बाहेर निघाले मात्र तितक्यात भरधाव असलेल्या ट्रक ने बस ला मागून धडक देत प्रवाश्यांना चिरडले, यामध्ये तब्बल 11 प्रवाश्यांचा मृत्यू झाला.

     

    मृतकामध्ये 6 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे, सर्व मृतक हे भावनगर गुजरात मधील रहिवासी होते, 12 च्यावर प्रवासी या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

     

    अपघातानंतर इतर वाहन चालकांनी रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांना बघून वाहन थांबवित पोलिसांना सूचना दिली काही वेळ महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, माहिती मिळताच 5 पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

    जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे.