Tag: बाबूपेठ

  • चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

    यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.

     

    दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

     

    यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.

  • माझ्या मुलाला शोधून द्या, चंद्रपूर शहर पोलिसांना आईची आर्त हाक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील बाबा नगर बाबूपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय प्रजेश खंडाळे हा मुलगा 22 सप्टेंबरपासून घरी आला नाही, याबाबत आई भाविका यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली, मात्र 8 दिवस उलटल्यावर सुद्धा प्रजेश चा पत्ता लागला नाही, प्रजेश च्या आईने मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली आहे.

     प्रकरण काय?

    भाविका खंडाळे या 22 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास कामावर निघून गेल्या होत्या, रात्री घरी परतल्यावर त्यांचा मोठा मुलगा प्रजेश त्यांना दिसला नाही, भाविका यांनी 23 वर्षीय लहान मुलगा राजदीप याला विचारले असता दादा घरी आला नाही असे त्याने सांगितले.
    आईने शेजारी व आजूबाजूला प्रजेश चा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, आई ती आईचं मुलगा येण्याची ती वाट बघू लागली.
    24 सप्टेंबरला प्रजेश ने आईच्या मोबाईल वर कॉल केला आई मी मुंबई ला आलो आहे, माझ्यासोबत घराजवळील योगेश व इतर 6 मुले आहे, यावर आईने म्हटले की बाळा काळजी घे? तू कशाला तिथे गेला कसलं काम आहे? यावर तो काही बोलला नाही, मला रोज फोन कर असे म्हटल्यावर प्रजेश ने हो म्हणत कॉल कट केला, मात्र त्या दिवसानंतर प्रजेश ने आई सोबत सम्पर्क साधला नाही, विशेष म्हणजे प्रजेश कडे मोबाईल नसल्याने त्याने दुसऱ्या कुणाच्या मोबाईल वरून आईला सम्पर्क केला होता.
    आई भाविका यांना मुलाची काळजी वाटू लागली, प्रजेश ने मी योगेश गेडाम सोबत बाहेरगावी असल्याची बाब आईला सांगितली असल्याने ती 27 सप्टेंबरला शेजारी असलेल्या योगेश गेडाम यांच्या घरी गेली, योगेश हा चंद्रपुरात आला होता, मात्र त्याने याबाबत प्रजेश च्या कुटुंबियांना माहिती दिली नाही.
    भाविका यांनी योगेश ला विचारणा केली की प्रजेश आला नाही काय? प्रजेश तर 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला तो आपल्या नातेवाईकांकडे जातो असे म्हणाला.
    त्यानंतर भाविका यांनी नागपुरातील नातेवाईकांना सम्पर्क केला असता प्रजेश कुणाकडेच गेला नसल्याची माहिती मिळाली.

    तपासात काय निष्पन्न?

    भाविका खंडाळे यांनी मुलगा घरी आला नाही म्हणून शहर पोलिसात तक्रार देत 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान काय घडलं, याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
    चंद्रपूर शहर पोलिसांनी योगेश गेडाम यांना चौकशीसाठी बोलाविले, त्याने प्रजेश हा नागपूरला उतरला असल्याची माहिती पोलिसांना दिली. ज्या मोबाईल वरून प्रजेश ने आईला सम्पर्क केला त्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मुंबई होते, 25 सप्टेंबरला प्रजेश नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
    योगेश ने प्रजेश च्या घरी न सांगता त्याला बाहेरगावी कशासाठी नेले होते? योगेश घरी परतला तेव्हा त्याने प्रजेश च्या आईला याबाबत माहिती का दिली नाही? योगेश ने जे बयान पोलिसांना दिले तीच खरी माहिती आहे काय? त्याच्या माहितीवर पोलिसांनी क्रॉसचेक केलंय का? प्रजेश सोबत गेलेले इतर मूल कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत पोलिसांशी सम्पर्क केला असता ते म्हणतात तपास सुरुच आहे.
    मागील आठवडाभरापासून प्रजेश ची आई योगेश ला मुलांबाबत विचारत आहे, मात्र तिला समाधानकारक उत्तर योगेश कडून मिळत नसल्याने ती न्यायासाठी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत आहे, भाविका खंडाळे यांना पोलिसांकडून न्याय हवा? पोलीस न्याय देतील काय? प्रजेश चे काही बरे वाईट तर झाले नाही? अशी शंका आई भाविका यांच्या मनात निर्माण होत आहे.
    प्रजेश जवळ खर्च करायला पैसे नाही, त्याच्या अंगावर जे कपडे आहे तेच त्याच्याजवळ आहे, तो काय करीत असेल? काय जेवण करीत असेल असे शब्द प्रजेश ची आई पुटपुटत असते.
    वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांना मोठं केलं व आज अशी परिस्थिती भाविका खंडाळे यांच्यापुढे उभी झाली, मुलगा आज येणार उद्या येणार अशी आस आईच्या नजरेसमोर आहे.
    दरवर्षी हजारो लाखो महिला व पुरुष बेपत्ता होतात मात्र काही जणांचा शोध लागतो, आजही लाखो नागरिक पोलिसांच्या रेकॉर्डवर हरविल्याची नोंद आहे, मात्र त्यांना कुणी शोधणारा नाही, माझ्या मुलाला शोधून द्या अशी आर्त हाक एक आई पोलिसांना करीत आहे.
  • बाबूपेठ परिसरात मृतदेह मिळाल्याने खळबळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील नार्मल स्कुल वॉर्ड बाबूपेठ परिसरात 18 सप्टेंबरला डीएड कॉलेजवळ राहणारे सुनील मिश्रा यांना परिसरात घाण वास येत असल्याने त्यांनी त्यादिशेने जाऊन बघितले असता घराजवळ त्यांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

    त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबत सूचना दिली, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के हे बाबूपेठ भागात पोहचले, मिश्रा यांच्या घरापासून तब्बल 15 फूट अंतरावर खुल्या जागेतील खड्ड्यात झाडाच्या खाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.

    सदर अनोळखी इसमाचे प्रेत हे सडलेल्या अवस्थेत होते, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला.

    मृतक इसमाचे वर्णन

    मृतकाचे वय अंदाजे 45 वर्ष ,बांधा मजबूत उंची 5 फूट 4 इंच अंगात गुलाबी रंगाचा फुलशर्ट, काळ्या रंगाचा ,फुल पॅन्ट, लाल व काळया रंगाच्या पट्ट्याचा टी-शर्ट ज्यावर खिसा असलेला, काळया रंगाची अंडरवियर ज्यावर Lux Cozi कंपनी असे घातलेला मिळून आला.

    तरी सदर मृतकाची ओळख असल्यास व त्याचे बाबत काहीही माहिती असल्यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे ठाणेदार एस. आर. राजपूत मोबाईल 8087031261 तसेच psi विजय मुके मोबाईल क्रमांक 9923401065 यांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.