Tag: बंडू धोत्रे

  • Eco Pro – इको-प्रो कडून चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ल्याचे पूजन

    Eco Pro – इको-प्रो कडून चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ल्याचे पूजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गड किल्ल्यावर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करत पार्थना करीत असतात, या दिवसाचे निमित्त साधून ‘इको-प्रो’च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यावर जाऊन आज एकाचवेळी सकाळी गड पूजन केले. Eco pro

     

    इको-प्रो संस्था जिल्ह्यातील किल्ले संरक्षण व संवर्धनकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुद्धा राबविले, यातून आता किल्ला पर्यटन ‘चंद्रपूर हेरिटेज वॉक’ सुद्धा सुरू झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील विविध गड-किल्ले संवर्धन करिता सुद्धा प्रयत्न सुरू आहे. Chandrapur district

     

    फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व गड-दुर्ग प्रेमी किल्ल्यावर एकत्रित येत पूजन करतात आणि पार्थना करतात की “हे किल्ला स्वरुपी देवतांनो, त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले, आता वेळ आली आहे की, आम्ही तुझे संरक्षण करण्याची, ते आम्ही केले पाहिजे. जेथे-जेथे संवर्धन कार्य चालू आहे, तेथे अशी कोणतेही दुर्घटना घडू देऊ नकोस, कि ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य, दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख, शांती, समृध्दी दे व त्याच्या आरोग्याची काळजी घे. हिच तुझ्या चरणी माझी प्रार्थना. Heritage walk

     

    अशी पार्थना करीत आज चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यावर पूजन करण्यात आले. चंद्रपूर येथील परकोट किल्ल्यावर पठाणपुरा गेट वर बंडू धोतरे यांचे नेतृत्वात योजना धोतरे, अब्दुल जावेद, सौरभ शेटे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, धर्मेंद्र लुनावत, कपिल चौधरी तर बल्लारपूर येथील किल्ल्यावर अभय अमृतकर, मनीष गावंडे, मनीषा जैस्वाल आणि भद्रावती येथील किल्ल्यावर भद्रावती इको प्रो सदस्य अमोल दौलतकर, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, दिपक कावटे, राहुल सपकाळ, कुंदन चौधरी, दीपेश गुरनुले व माणिकगड किल्ल्यावर सुनील लिपटे, सुधीर देव, राजू काहिलकर, संजय सब्बनवार आदी कार्यकर्ते यांनी पूजन केले.

  • Ramala Lake : रामाळा तलाव एसटीपी मागणीकरीता इको-प्रोचे 22 फेब्रुवारीचे प्रस्तावीत आंदोलन तूर्तास स्थगित

    Ramala Lake : रामाळा तलाव एसटीपी मागणीकरीता इको-प्रोचे 22 फेब्रुवारीचे प्रस्तावीत आंदोलन तूर्तास स्थगित

    News34 chandrapur

    चंद्रपूर: रामाळा तलाव संवर्धनाच्या प्रलंबीत मागण्याकरीता विशेषकरून तलावात येणारे सांडपाणी यावर प्रकीया करण्यास ‘एसटीपी’ बांधकामास ‘खनिज विकास निधी’ मधुन प्रशाशकीय मान्यता देण्याची मागणीकरीता दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता, त्यानुसार आज/जिल्हाधिकारी कार्यालय, खनिकर्म विभाग कडुन देण्यात आलेल्या पत्रानुसार आंदोलन रद्द करून शाशनास सहकार्य करावे सदर एसटीपी बांधकामास परवानगी देण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे. Historical ramala lake

     

    चंद्रपूर शहरातील एकमेव ऐतिहासिक रामाळा तलाव संवर्धनासाठी 2021 मध्ये इकोे-प्रो तर्फे करण्यात आलेल्या जनआंदोलनानंतर या तलावाचे पहिल्या टप्प्यातील खोलीकरणाचे काम झाले मात्र दुसऱ्या टप्प्यातील एसटीपी चे बांधकाम जे तलावात येणारे सांडपाणी यावर प्रकीया करणारे सयंत्र बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र या बांधकामास मागील दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करूनही मंजुरी देण्यात न आल्याने हिवाळी अधिवेशन दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ करीत 7 डिसेंबर 2023 रोजी आंदोलन करण्यात आले होते. सोबतच येत्या 22 फेब्रुवारी 2024 रोजी ‘रामाळा तलाव’ परिसरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. waste water

    याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय खनिकर्म विभाग कडुन लेखी पत्राव्दारे कळविण्यात आले असुन त्यात सदर एसटीपी बांधकामास मंजुरी देण्यात येत असुन प्रस्तावीत आंदोलन रद्द करून सहकार्य करण्याचे नमुद करण्यात आले, सोबतच जिल्हाधिकरी ‘रामाळा तलाव संवर्धनाच्या’ दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेला एसटीपीच्या बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात येत असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार इको-प्रो कडुन तुर्तास सदर आंदोलन रद्द करण्यात आले आहे. Eco Pro Environmental Organization

     

    आज जिल्हाधिकारी यांचे भेट घेण्याचे इको-प्रोचे शिष्टमंडळ भेट घेणार होते मात्र आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय कडून पत्रानुसार इको-प्रो कार्यालयात बैठक घेउन सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांचेसह अभय बडकेलवार, निवृत्त विभागीय वनअधिकारी, किशोर जामदार, डॉ. प्रा. योगेश दुधपचारे, नितीन रामटेके उपस्थित होते.

  • हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील अनेक वर्षात इको-प्रो च्या वेळोवेळी करण्यात आलेले आंदोलन व अद्याप प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील मागण्या संदर्भात आंदोलन/सत्याग्रह करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनसामान्यांचे समर्थन मिळविण्यासाठी आणि व्यापक जनजागृती व्हावी #हिवाळीअधिवेशन2023 #एकदिवसएकआंदोलन अश्या पद्धतीने संपूर्ण अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.

     

    या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी, आज सकाळी 7:30 ते 10:00 दरम्यान प्रतिकात्मक आंदोलन करीत किल्ला संवर्धन विषयक मागण्याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी किल्ला भिंतीवर बसून बैठा सत्याग्रह केला. यावेळी इको-प्रो तर्फे सुरू असलेले किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक मार्गातील अडथळे दूर करीत पर्यटकांना सुरक्षित जाता यावे म्हणून परकोट भिंतीची दोन ठिकाणी दुरुस्ती त्वरित करावी, किल्ला भिंत व पुरातत्व विभागाने नव्याने बांधलेली संरक्षण भिंतिचे बांधकाम पूर्ण करण्यास त्या दरम्यानचे अतिक्रमण मुक्त करण्यास पंतप्रधान/मुख्यमंत्री आवास योजनेत घरे देण्यात यावे, किल्ला परकोट पासून शंभर मीटर पर्यंत बांधकामाची अट असली तरी बांधकाम होत असून यावर कुठलेही नियंत्रण नाही, नाहक नागरिकांना बांधकाम करताना त्रास होत आहे, यामुळे ऐतिहासिक स्मारक विषयी नकारात्मक भावना निर्माण होत असते, त्यावर उपाय म्हणून ही किल्ला परकोट भिंतीपासून बांधकाम ची 100 मीटर अट रद्द करून 3 ते 5 मीटर करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

     

    हिवाळी अधिवेशन दरम्यान इको-प्रो कडून करण्यात येत असलेली आंदोलन/सत्याग्रह पुढील काळात व्यापक व तीव्र असे आंदोलन करण्याचे नियोजीत आहे. आणि महत्वाचे म्हणजे संस्थेचे “आपला वारसा आपणच जपुया” या मुख्य उद्देशपुर्ती करिता असून आपला नैसर्गिक वारसा (जल, जंगल, जमीन, नदी, तलाव, वन्यजीव) व ऐतिहासिक वारसा (गड, किल्ले, मंदिरे, स्मारक व समाध्या) यासोबत शेतकरी, गावकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे हिताचे प्रश्न करिता इको-प्रो चा लढा सुरू असून प्रत्येकांनी स्वतःची लढाई स्वतः लढावी, त्यांना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी म्हणून सातत्यपूर्ण संयमाने लढे सुरू ठेवले पाहिजे म्हणून इको-प्रो चा लोकजागृतीकरिता लोकलढा सुरू आहे.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन वारसा असलेला चांदागड किल्ला-परकोट जे इको-प्रो ने सतत 1020 दिवस स्वच्छता करीत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करीत स्थानिक पर्यटनाला एक दिशा दिली आहे. मात्र पुरातत्व विभाग व राज्य शासन कडून तसेच जिल्हा प्रशासन कडून स्थानिक पर्यटन विकास करिता अद्याप हवे तसे लक्ष दिले गेलेले नाही. एखादी संस्था जेव्हा निस्वार्थ भावनेतून व लोकसहभागातून काही करीत असेल तर त्यास आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे ठरते. या सात वर्षाच्या सातत्यपूर्ण कार्यात सतत पाठपुरावा करीत असलेल्या मागण्या संदर्भात आज किल्ला भिंतीवर बसून ‘बैठा सत्याग्रह’ तर श्रमदान करीत स्वच्छता सत्याग्रह करण्यात आले.

     

    या आंदोलनावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले यांच्या नेतृत्वात अब्दुल जावेद, अभय अमृतकर, ओमजी वर्मा, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, कुणाल देवगिरकर, विजयहेडाऊ, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण, चंदू आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.