Tag: पूर रेषा

  • flood line : आरक्षित व पुररेषा भागात बांधकाम करालं तर…

    flood line : आरक्षित व पुररेषा भागात बांधकाम करालं तर…

    Flood line चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरक्षित व पुररेषा भागात केल्या जाणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली असुन यापुढे सदर परिसरात कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

           
    Flood line आरक्षित तसेच पुररेषा भागात (ब्लू लाईन) कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री अथवा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत सुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद


       आरक्षण क्र.७० व आरक्षण क्र.७१ महाकाली यात्रा मैदान ही भूखंडे आरक्षित आहेत. या भूखंडांवर सुद्धा अतिक्रमण करून बांधकामे केल्याचे आढळुन आल्याने सदर बांधकामे पाडण्याची कारवाई यापूर्वी मनपातर्फे करण्यात आली आहे. यापुढे आरक्षित व ब्लू लाईन परिसरात संभाव्य धोक्याची पर्वा न करता जर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्यास अथवा बांधकाम करण्याची तयारी सुरु दिसल्यास, गिट्टी, विटा स्वरूपाचे साहित्य,बांधकाम मजूर आढळुन आल्यास संबंधित बांधकामाचे साहित्य प्रथमदर्शनी जप्त करण्यात येणार असुन सुरु असलेले बांधकाम पाडण्यात येणार आहे.

    तान्हा पोळ्याला लागले महागाईचे ग्रहण


         बांधकामात सहभागी असणारे जागा मालक, कंत्राटदार,मजूर यांच्यावर व बांधकामास मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. याकरिता मनपाद्वारे विशेष निगराणी पथक तयार केले असून त्यांचे मार्फत सदर परिसराची रोज पाहणी केली जाणार आहे. तसेच आवश्यक असल्यास ड्रोनचा वापर केला जाईल.

  • illegal construction : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

    illegal construction : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

    illegal construction ब्लू लाईन मधील अवैध बांधकामांना मनपाने दणका दिला असुन पूररेषेतील ३ चालुस्थितीतील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. अवैधरितीने उभारण्यात आलेले अर्धस्थितीतील पिलर व भिंतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

    कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू
      illegal construction अमृतसर हवेली हॉटेलमागे,आंबेडकर सभागृहाजवळ मौजा वडगाव सर्वे नंबर ८ व ९ असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे मनपा पथकास पाहणीदरम्यान आढळले. सदर भूखंड हा ब्लू लाईन मध्ये असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या सर्व बांधकामदारांना नोटीस देण्यात आली होती. मात्र विहीत मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने सदर कारवाई करण्यात आलेली आहे.

    राजकारण : उमेदवारी घोषित झाल्यावर चंद्रपुरातील मनसे मध्ये आपसात झालं खळखळखट्याक


        पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा.हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पूररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश मा.न्यायालयाने दिलेले असल्याने सदर बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.      


       सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते,अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. झोन क्र. १ प्रभागातील पूरग्रस्त भागात येणाऱ्या राष्ट्रवादी नगर परिसर,तुळशी नगर,आंबेडकर सभागृह परिसर,वडगाव जुनी वस्ती,सोमय्या पॉलीटेक्नीक, हवेली गार्डन,जगन्नाथ बाबा नगर,अग्रेसन भवन मागील परिसर,वक्रतुंड चौक,सिस्टर कॉलोनी, रहमत नगर, शांतीधाम मागील परिसर इत्यादी भागात पूररेषेत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे नोटीस देण्यात आल्या आहेत. सदर बांधकामे बांधकामदारांनी तात्काळ निष्कासित करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


        त्याचप्रमाणे केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    पूर रेषा कश्या आखतात? ब्लू लाईन म्हणजे काय?

    पूर रेषा कशा आखतात? धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले तर त्या नदीपात्राची पाणीपातळी वाढते. पाणी पातळी जेथे पोहचते ती रेषा ‘व्हाईट लाईन‘ अथवा ‘पांढरी रेषा‘ म्हणून ओळखली जाते. धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा ‘ब्लू लाईन‘ अथवा ‘निळी रेषा‘ म्हणून ओळखली जाते.