Tag: ताडोबा टायगर

  • चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.

     

    घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर.जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले. सदर वाघ ही मादी असून 1 वर्षाची आहे, शवविच्छेदन केल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया वनविभागाच्या वतीने देण्यात आली असून उत्तरीय तपासणी नंतर सर्व स्पष्ट होणार.

     

    मृतावस्थेत आढळून आलेले वाघाचे शवसडलेल्या अवस्थेत आहे. कदाचित या वाघाचा मृत्यू तीनचार दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

     

    दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू – पहिली घटना चिमूर वनपरिक्षेत्रात 14 नोव्हेम्बरला 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर 18 नोव्हेम्बरला ताडोबा नैसर्गिकरित्या मृत्यू, 10 डिसेंबर ला वरोरा वनपरिक्षेत्रात अपघातात वाघाचा मृत्यू, 14 डिसेंबर पळसगाव येथे नैसर्गिकरित्या मृत्यू, 21 डिसेंम्बरला विजेचा धक्का लागून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला, 24 डिसेंबर ला शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रात घडली आज 25 डिसेंम्बरला सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला.

  • चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

    News34 chandrapur

    प्रतिनिधी | गुरू गुरनुले

    मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे.
    यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.

     

    शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या : शेतकऱ्या वर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

     

    गेल्या दोन दिवसांपासुन मूल तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने संपुर्ण जनजिवण विस्कळीत झालेले आहे. दरम्यान मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले यांनी मौजा ताडाळा तुकुम शेतशिवारातील शेतात पाणी पाहण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम.५२२ कक्षात शेतकऱ्यांचे तुकडे करुन जागीच ठार केले. नागरीकांना सदर घटनेबद्दल माहिती होताच घटनास्थळावर गर्दी केली.

     

    सदर घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजता दरम्यान घडली असून घटनेची माहिती वनविभागाला कळताच घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे, आर. एफ .ओ. राजेश घोरुडे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सर्पमित्र पर्यावरण प्रेमी उमेश झिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार व अनेक ग्रामस्थ तसेच क्षेत्र सहाय्यक खणके, मस्के, वनरक्षक राकेश गुरनुले, एफ.डी.सी. एम.चे कर्मचारी कूमरे, गवई, कर्मचारी दाखल झाले असुन वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडुन मृत्यदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.

     

    मृतदेह हाती लागताच उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठविण्यात आले, वनविभागाने मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 30 हजार रुपयांची मदत केली. परंतु शेतशिवांरातील वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. यापूर्वी मौजा चीचाळा येथील गुऱ्हे चांरण्यासाठी नेलेल्या दोन इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

  • वाघाचा गुराख्यावर हल्ला, आणि गुराख्याने वाघाच्या दिशेला भिरकावली काडी आणि…

    News34 chandrapur

    चिमूर – सोमवारी चैती बिट कोलारा कोअर वनक्षेत्राजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली.

     

    नेहमीप्रमाणे कोलारा निवासी गुराखी 57 वर्षीय शंकर दोने हे गुरांना चारासाठी जंगल परिसरात गेले होते, कोलारा गेट परिसरातून शंकर जात असताना त्याठिकाणी झुडपात वाघ दबा धरून बसला होता, संधी मिळताच वाघाने शंकर वर हल्ला केला.

     

    अचानक झालेल्या या हल्ल्यात शंकर घाबरला मात्र हिंमत न हरता शंकर ने जवळ असलेल्या काडीने वाघावर प्रहार केला, काडीचा मार बसल्यावर वाघाने जंगलात धूम ठोकली.

     

    मात्र या हल्ल्यात शंकरच्या शरीरावर जखमा झाल्या, काही वेळात परिसरातील गुराख्यानी शंकर च्या दिशेने धाव घेत त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

     

    घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस डुबे यांनी भेट दिली. महिला वनरक्षक बी बी सोयाम , गेट व्यवस्थापक अविनाश गणवीर व गावकर्यांनी दवाखान्यात भेट दिली वन्यजीव कोलारा कोअर यांनी तातडीची मदत जखमीला दिली. जखमीला पूढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करन्यात आले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृत्यू

    News34 chandrapur

    मूल :- तालुक्यांतील फीस्कुटी येथील पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करतात. आज मंगळवार ला सकाळी ७:३० चे दरम्यान महीला मजुर नींदन करण्यासाठी त्याचे शेतात गेले असता त्यांना तीथे एक वाघ मृतावस्थेत आढळला.

    त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. माहीती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता दोन ते अडीच वर्षाची वाघीण असल्याचे निदर्शनास आले.

    नुकतेच रविवारी सायंकाळी मूल-सिंदेवाही मार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली होती. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला असतानाच आज फिस्कुटी शेतात अडीच वर्षाची वाघीण मृत अवस्थेत आढळली आहे. त्याचा तपास वनविभाग करीत आहे.