Tag: डॉ.अभिलाषा गावतुरे

  • pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

    pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

    Pik vima शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे, याबाबत डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.

    pik vima वीरई ग्राम पंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली. त्या बैठकीत डॉ अभिलाषा गावतुरे या उपस्थित होत्या. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा ची रक्कम जमा झाली नाही हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यांचा अन्याय दुर करण्यासाठी व इतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यानां न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम मिळावी यासाठी यापुढील भूमिका काय राहील यासाठी ही बैठक घेण्यात आली.

    धक्कादायक बातमी : तुझ्या अब्रूचे धिंडवडे उडवीत तुला ठार करणार, अवैध दारू विक्रेत्यांची महिलेला धमकी

    डॉ गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने संबंधित विभागाला संपर्क करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे त्या म्हणाल्या. या सभेत शेतकरी बांधव न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गेडाम,काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रमजी मोहरले, नेताजी सोनुले ,नंदकिशोर वाढई,उत्तम गणवीर, शशिकांत जेंगठे, सुरज गिरडकर, सुखदेवजी वाढई, भुजंग आगळे, रमेश वाढई, बंडू निकोडे ,मोरेश्वर गोंगले ,पुरुषोत्तम गोंगले, सुरेश सोनुले ,सुरेश माहुर्ले, सदाशिव वसाके, संतोष गुडलावार, नंदकिशोर वाढई, प्रशांत जेंगठे, नवनाथ जेंगठे व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जेलभरो आंदोलन
  • Mla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मकर संक्रांतीच्या निमित्याने चंद्रपूर शहर( जिल्हा ) महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने महिला मेळावा तसेच हळदी कुंकू वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक संताजी भवन गिरनार चौक चंद्रपूर येथे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. Mahila congress

     

     

    कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामुभैय्या तिवारी अध्यक्ष चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी,डाँ अभिलाषा गावतुरे सामाजिक कार्यकर्त्या,काँग्रेस चे जेष्ठ नेते महेशभाऊ मेंढे,माजी महापौर संगीता अमृतकर ,ओबीसी प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे,ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, आयोजक तथा शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,माजी नगरसेविका विना खनके,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ अनिता बोबडे, सौ धोबे प्रीती शाहा, पिंपळकर ,गुजरकर यांचे सह महिला काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती. Chandrapur congress

     

    सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ, स्व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ,द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,याप्रसंगी सौ.तृप्ती राजूरकर यांनी अप्रतीम स्वागत नृत्य सादर केले.

     

     

    कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वैशाली कांमडे ,कविता जुमडे यांनी महिलांकरिता छोटे छोटे मनोरंजनात्मक खेळ घेतले, यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला,या खेळात प्रथम आलेल्या स्पर्धकांना आमदार प्रतिभाताईच्या हस्ते बक्षीस देणून प्रोत्साहित करण्यात आले,आयोजक सौ चंदाताई वैरागडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून काँग्रेस पक्ष नेहमीच महिलांचा सन्मान करणारा,शेतकऱयांना,युवकांना गोर गरिबांना न्याय देणारा पक्ष आहे.

     

    आमदार प्रतिभाताई आणि आमच्या नेत्या संध्याताई सव्वालाखे ,आणि रामुभाऊ तिवारी यांच सक्षमआणि प्रेरणादायी नेतृत्व असल्यामुळेच शहरात आम्ही महिलांचं इतकं मोठ संघटन करू शकलो असे सांगितले,याप्रसंगी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी चंदाताई वैरागडे यानि चंद्रपूर खऱ्या अर्थाने महिलांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून महिलांची इतकी मोठी फौज तयार केली असे मनोगतातून व्यक्त केले,याप्रसंगी महेश मेंढे,प्राचार्य नरेंद्र बोबडे, संगीता अमृतकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

     

     

    कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महिलांनी घरातील प्रत्येक व्यवहार समजून घेतला पाहिजे,कुठलीही चांगली वाईट वेळ सांगून येत नाही अश्या वेळी रडत बसण्यापेक्षा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या मानसिकता तयार असायला पाहिजे,आज महिला प्रत्येक्ष क्षेत्रात आघाडीवर आहेत,आपणही मागे न राहता सक्षम बना असे सांगत,महिला अध्यक्ष चंदाताई यांच्या अतिशय उत्तम नियोजमूळे काँग्रेस मेळाव्याला आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने महिलाची उपस्थिती बघून मन भारावून गेल्याचे मनोगतातून सांगितले,मकर संक्रांत निमित्य उपस्थित सर्व महिलांना महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकू तसेच वाण देण्यात आले.तसेच काँग्रेस चे जेष्ठ नेते महेशभाऊ मेंढे यांनी उपस्थित सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या निमित्याने घड्याळ भेट दिली.

     

    कार्यक्रमाला महिलांची भरगच्च उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन तेजु पोडे,मीनल वैरागडे यांनी तर आभार मीनाक्षी गुजरकर यांनी मानले.शेवटी सर्व महिलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  • Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

    Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला, आजचे अर्थसंकल्प निव्वळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केले अशी प्रतिक्रिया डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

     

    अतिश्रीमंत उद्योगपतींच्या गरीब देशात प्रस्तुत केलेलं २०२४ चे बजट व १० वर्षाच्या आर्थिक वाटचालीचे रिपोर्ट कार्ड म्हणजे समोरच्या निवडणुका लक्षात घेऊन सामाजिक न्याय, आर्थिक सहिष्णुता, महिला सन्मान, विकसित भारत सारख्या शब्दांची नुसती लखोरी अर्थमंत्री निर्मला सितारमन कडून वाहिली गेली.

     

    दरवर्षी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, विद्यार्थी यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा बजट मुळातच कुठले ठोस योजना व त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही. अर्थमंत्री आरोग्याच्या बाबतीत उपलब्ध मानवी संसाधन व पायाभूत सेवांना बळकट करण्यापेक्षा नवे फसवे स्वप्न दाखवीत आहेत. शेतकऱ्याला हमी भाव नाकारून सन्मान योजनेच्या नावाखाली भीक देणे म्हणजे बळीराजाचा अपमान आहे. Union finance minister nirmala sitaraman

     

    शिक्षणाला बजेट नाकारुन,चांगल्या दर्जाचे प्राथमिक व उच्च शिक्षण नाकारून युवकाना स्किलइंडिया सारखे फसवे कार्यक्रम म्हणजे वेठबिगारी ला लावण्याचा प्रकार आहे. जर २५ टक्के लोक गरिबी रेषेच्या वर आले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले तर ८० कोटी लोकांना मोफत राशन ची देण्याची गरज का पडत आहे? या देशातील बहुसंख्य असलेला ओबीसी, एससी,एसटी यांचा देशातील उद्योग व देशातील साधन संपत्तीवर किती हिस्सा? महाज्योती, सारथी योजनेसाठी पुरेसा बजट नाही. Budget 2024

     

    उच्चशिक्षणामध्ये महिलांचे प्रमाण वाढले पण व्यावसायिक शिक्षण घेऊन किती महिला सक्षम झाल्या याचे आकडे नाहीत! गेल्या ५ वर्षात प्रवेश मिळविलेले १३००० बहुजन विद्यार्थी IIT सारख्या संस्थांमधून बाहेर का फेकल्या गेले त्याचे उत्तर नाही! एकीकडे शाळा चालविणे व युवकाना पगार देणे परवडत नाही म्हणून शाळा बंद व नोकऱ्या कंत्राटी करणे , महांगाई वर न बोलणे , विकासाच्या नावावर फक्त भंपक बाजी करणे या सगळ्यागोष्टीला जनता कंटाळली आहे व हे बजट विकासाचे बजेट नसून फक्त इलेक्शन बजेट आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

  • DBT योजनेचा फुग्गा फुटला

    DBT योजनेचा फुग्गा फुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुमुल जिल्हा आहे. आदिवासींच्या विकासासाठी व प्रगतीसाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी असताना व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अनेक योजना कार्यरत असताना केवळ राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे या जिल्ह्यातील अनेक आदिवासीं विद्यार्थी महिना उलटूनही डीबीटी न मिळाल्यामुळे अनुदानापासून वंचित म्हणजेच शिक्षण व विकासापासून वंचित राहण्यासाठी बाध्य झाले आहे.

     

    ५ वर्षापूर्वी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही अनुदान देणारी योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. पण गेल्या तीन वर्षापासून नेहमीच बजेट नसल्याचा कारण देऊन या विद्यार्थ्यांना नियमित अनुदानापासून वंचित ठेवण्यात येते आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचा जेवण, शालेय साहित्य व त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाअभावी त्यांच्या अडचणीत वाढ होते.

     

    आदिवासी विद्यार्थ्यांकडून हे सतत लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा शासन व प्रशासन पातळीवर याबद्दल संवेदनशीलता नाही. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, व पूर्वीची वस्तीगृहात मेस व शालेय साहित्य पुरवणी केल्या जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

     

    या मागणीसाठी आज हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांचा मोर्चा हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या प्रांगणात पोहोचला. यावेळी उपस्थित सर्व अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. प्रकल्प अधिकारी मुरुंगणाथम एम यांनी वरच्या पातळीवर दूरध्वनीद्वारे संपर्क केला व या विद्यार्थ्यांची अनुदान लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. पण विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन घेऊन आपल्या वस्तीगृहात परत जावे लागले.

     

    विद्यार्थी आपल्या समस्यां घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आल्याचे समजतात डॉ अभिलाषा गावतुरे यांनी सुद्धा धाव घेतली. त्यांचा प्रश्न किती गंभीर आहे व तथा सोडवणे का आवश्यक आहे हे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच कुठलाही आदिवासी वस्तीगृहातील एकही विद्यार्थी उपाशी राहता कामा नये ही गंभीर बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन देखील दिले तसेच डीबीटी न आल्यामुळे कुठल्या ही आदिवासी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि शाळा सोडून गावाकडे जाऊ नये, स्वतःचे शैक्षणिक नुकसान करून घेऊ नये.

     

    त्यांचा जेवणाचा व शालेय शिक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू असे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केले. त्यांच्यासोबत नितेश कुळमेथे व इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.

    ज्या जिल्ह्यात आदिवासींनी निर्माण केलेली वनसंपदा आहे आणि या जिल्ह्याला वैभव व संस्कृती जडणघडण ज्यांच्यामुळे आहे त्या समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या वनसंपदेवर लाखोची उलाढाल होऊन वनविभाग व इतर विभाग लाभार्थी बनले आहेत आज त्याच वनातील आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे हे इथल्या राजकीय व प्रशासकीय लोकांसाठी सुद्धा शरमेची बाब आहे.

     

    एकीकडे आदिवासींचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मंडळ आणि योजना तयार कराव्यात पण त्यांचा विकास तर सोडाच पोटात अन्न द्यायला जर सरकारकडे पैसा नसेल तर खरंच विकास कुणाचा होत आहे असा गंभीर प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला! राजकारणी तुपाशी तर जनता उपाशी हे चित्र चंद्रपूरला नेहमीच बघायला मिळतं. हा प्रश्न तत्काळ निकाली निघावा असे निवेदन डॉक्टर अभिलाषा गावतूरे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

  • बल्लारपूर विधानसभा उमेदवाराची घोषणा?

    बल्लारपूर विधानसभा उमेदवाराची घोषणा?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  वाढदिवसाच्या बॅनर वरून ban evm हा संदेश नागरिकांना देण्याचे काम गावतुरे दाम्पत्यानी केल्याने सदर बॅनर ची जिल्हाभरात चर्चा होती, मात्र गावतुरे यांच्या वाढदिवशी बॅनर काढल्याने आता विविध चर्चा रंगल्या आहे.

     

    डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढत्या राजकीय वजनाला घाबरून सूडबुद्धीने पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर हटविले व स्वतःचे बॅनर लावले
    क्रीडा महोत्सवाचे बॅनर काही दिवसापासून लागलेले असताना 21 तारखेलाच बल्लारशाच्या नगरपालिकेतून एक नोटिफिकेशन काढून 22 तारखेला लागलेले डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर फक्त काढणे म्हणजे डॉक्टर अभिलाष गावतुरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका पालकमंत्र्यांनी घेतला की काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला असेच वाटते.

     

    आणि क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करत स्वतःच्याच जाहिरातीचे मोठ्या मोठ्या फोटोचे फलक जिल्हाभरामध्ये झळकावणे ही मोदी स्टाईल सुद्धा जनमानसामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

     

    बॅनर वर केवळ स्वतःचेच नाही तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व भाजपाच्या बोधचिन्ह कमळाचे फोटो लावलेले आहेत जसा काही हा सरकारी क्रीडा मंत्रालयाचा कार्यक्रम नसून भाजपाचा एक कार्यक्रम आहे. भूमिपुत्र ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यामुळे प्रचंड रोष आहे आणि तो ते बॅनर पुन्हा काढूही शकत होते पण पालकमंत्री या संविधानिक पदाचा मान राखत त्यांनी असे असंवैधानिक काम न करण्याचे ठरवले
    पण यानिमित्ताने आपल्या विरोधातला दणकट उमेदवार कोण आहे याची घोषणा तर पालकमंत्री तर करीत नाही ना ? असे भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

  • बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग सीसीडीटी आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार 2023 चे मानकरी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

     

    महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षण तसेच त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पद्धतीने मुलाचे कार्य पार पाडत आहेत.

     

    हे काम यशस्वीरित्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यन्दा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

    त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखा च्या वतीने डॉ अभिलाषा गावतुरे, डॉ वैंकट पंगा तसेच डॉ सीमा शर्मा, डॉक्टर अश्विनी भारत, डॉ सरताज शेख, डॉ देवेंद्र लाडे यांनी स्मृतिचिन्ह देऊन विवेक जॉन्सन यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर नेहमीच आपल्या चांगल्या कामात आपल्या सोबत राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही सुद्धा डॉ गावतुरे यानीं यावेळी दिली.

  • बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी – डॉ.अभिलाषा बेहरे

    बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी – डॉ.अभिलाषा बेहरे

    News34 chandrapur

    मूल – भारताच्या स्वातंत्रलढ्यात आदिवासी शहिदवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर होते .बिरसा मुंडाचे उलगुलांन म्हणजे सामान्य जनतेच्या विद्रोहाचे प्रतीक होते.त्यामुळेच समस्त बहुजन समाजाचे ते आदर्श आहेत असे प्रतिपादन जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती मूल च्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले.

     

    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. वासुदेव आत्राम ,उदघाटक म्हणून प्रा. विजय लोनबले ,प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ.समीर कदम तसेच मुख्य अतिथी मा. डॉ.राकेश गावतुरे, मा. प्रब्रम्हानंद मडावी मा. मुकेश गेडाम, मा.प्रियंका गेडाम.मा. अशोक येरमे यांचीही समायोचित भाषणे झाली

     

    कार्यक्रमाची सुरुवात गुजरी चौक गोटूल येथील सल्ला-शक्ती स्थळाची पारंपरिक पूजा करून भव्य रॅली कन्नमवार सभागृहापर्यंत काढण्यात आली.

     

    त्यानंतर प्रबोधन कार्यक्रम पार पडले.महिलांनी स्वागतगीत तर वंदनगीत चिदानंद सीडाम आणि गौरव सिडाम यांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे संचलन अरविंद मेश्राम तर आभार तेजस मडावी यांनी मानले.

     

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिदानंद सीडाम,मिथिलेश गेडाम,यश मडावी,मुकेश कनाके,नितीन कनाके, महेश आत्राम, गौरव सीडाम,राकेश कनाके, महेश आत्राम,विकी कुमरे तसेच बिरसा मुंडा बचत गट,राणी हिराई गट इत्यादींनी सहकार्य केले.

  • चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

     

    हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, हे विशेष.

     

    कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन मागील 2 दिवसापासून बंद आहे, शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कामगारांच्या आंदोलनाचा लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडच्या सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

     

    भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मनपाला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संपावर बसलेले कामगार यांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शहरात कचरा संकलनाला सुरुवात होईल, आंदोलनामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     

    घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू राहिले तर शहरातील नागरिक आपल्या घरातील कचरा चंद्रपूर मनपा कार्यालयात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला आहे.

    मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी छाया सोनूले, संगीता पेटकुले, काळूबाई चौधरी, आदींची उपस्थिती होती.

     

    कामगारांच्या हक्काच्या मागणीवर मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे ही गंभीर बाब असून त्यांची मागणी रास्त आहे, कामगारांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

  • मूल येथे सत्यशोधक परिषद संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मूल – मुल येथे सत्यशोधक समाजाच्या दीडशे व्या स्थापना दिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषा गावतुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार इथून आलेले सुप्रसिद्ध व्याख्याते सुरेश झाल्टे हे होते.

     

    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गनांमध्ये सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, माळी मिशन राजकीय समिती प्रमुख महाराष्ट्र राज्य इंजिनिअर वासुदेवराव चौधरी अमरावती, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन भेदे, प्रसिद्ध साहित्यिक आणि लेखक प्रबर्मानंद मडावी, अखिल भारतीय महिला माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सोनुले, ज्ञानज्योती फाउंडेशन सावलीचे अध्यक्ष दिनकर मोहूर्ले, सद्गुरु डोले, दीपक वाडी, बेंबळ डॉक्टर पद्माकर लेनगुरे, विदर्भ तेली महासंघाचे महासचिव गंगाधर कुंनघाडकर, ओबीसी विचार मंच कैलास चालक इत्यादी मानव मंचावर उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट प्रशांत सोनुले प्रस्तावना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबुले यांनी केली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश मोहरले मनीष मोहूरले पाटील वाळके रामदास सोनुले रोहित निकुरे श्रीकांत शेंडे आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

     

    याप्रसंगी बोलताना व्याख्याते सुरेश झाल्टे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या उगमापासून त्या शतक चळवळीचा संपूर्ण इतिहास काळाच्या पडद्याआड आणि इतिहासात उल्लेख न केलेल्या सर्वशोधकांचे या चळवळीला योगदान आणि एकूणच फुले शाहूं आंबेडकरी चळवळीचे या देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये योगदान विशद केले.

     

    हिराचंद बोरकुटे यांनी सांगितले की आजचा ओबीसी समाज जर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी चालला तर त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्या सहज सुटू शकतात.

     

    डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी या कारणासाठी आणि ज्या उद्देशासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली आणि शूद्र अतिसूद्रांना मनुवादी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष उभा केला तो संघर्ष आजच्या बहुजन समाजाला इथल्या आजच्या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध आणि शासन प्रशासन व्यवस्थेविरुद्ध उभा करण्याची गरज प्रतिपादित केली.

     

    खासकरून शिक्षण क्षेत्राचे झालेले होत असलेले कंत्राटीकरण आणि सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपण उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.