Tag: चिमूर तालुका

  • काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

    काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

    News34 chandrapur

    चिमूर : – गुणवंत चटपकार

    चिमूर सिंदेवाही रस्त्यावरील मासळ ते पिपर्डा रोडवर असलेल्या कोलारा गावांनाजिक फाट्यावर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

     

    माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत इसमाचे नाव आहे, तर मोरेश्वर कुसन चुनारकर (३८) जखमी वेक्तीचे नाव आहे . पिपर्डा येथील हे दोन्ही काका पुतण्या चिमूर येथे प्लांट खरेदी साठी गेले होते.रात्रौला परत स्व गावी पिपर्डा येथे येत असताना हा अपघात घडला आहे.

     

    घडलेल्या अपघाता बद्दल गावात डुकराची धडक कि अज्ञात वाहनाची धडक तर नसेल ना असा तर्क वितर्क लावल्या जातं आहे,जबर धडक दिली. या धडकेत माणिक चुनारकर यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोरेश्वर हा जखमी झाल्याने त्याला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखम गंभीर असल्याने पुढील उपाचारासाठी खाजगी दवाखान्यात चंद्रपूर ला नेण्यात आले आहे.

     

    अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर , पोलिस झिलपे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचणामा केला .प्रेत उत्तरीय तपासनी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत इसमावर पोस्टमार्टम करून प्रेत कुटुंबातील सदस्य कडे देण्यात आले आहे.त्यांच्यावर पिपर्डा येथील स्म्शानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. पिपर्डा येथे दिनांक १८ जानेवारीला राहुल मेश्राम या युवकांने आत्महत्या केली. तर आणि १९ जाणे ला दुर्दैवी अपघात घडला त्यात माणिक चुनारकर मयत झाल्याने पिपर्डा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

    News34 chandrapur

    चिमूर :- गुणवंत चटपकार

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा निकाल दिल्याने शिवसैनिकानमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि आक्रोषाचे रूपांतर मोर्चात झाले. आज दिनांक १२ जाणेवारी रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात. महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर, युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे, संघटक भाऊराव डांगे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीहरी बालाजी देवस्थान येथून राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय जाहीर केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

     

    अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय समोर राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला बेश्रमच्या फुलाचा हार टाकून. प्रतिमा जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर. उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी मोर्चाला संबोधित केले. तर आभार प्रदर्शन तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केले.

     

    यावेळी तानाजी सहारे, शहर प्रमुख नितीन लोणारे, सुनील हिंगनकर, वरोरा महिला आघाडी तालुका प्रमुख सरला मालोकर, वरोरा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, किशोर उकुंडे, राजेंद्र जाधव, विनायक मुंगले, चिमूर तालुका अधिकारी शार्दुल पचारे. सहित शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

  • चिमूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

    चिमूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यातील हिरापूर येथे दुचांकी वाहनाने चारचाकी वाहनाला समोरून धडक दिल्याने दुचाकी वाहक जखमी झाले असून जखमी युवक हीरापुर येथील रहिवासी आहेत. हिरापुर येथील ही दुसरी घटना आहे.

     

    शंकरपुर जवळील हिरापुर येथे शुक्रवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हिरापुर गावातून येणाऱ्या दुचांकीने भरधाव वेगात येऊन चारचाकी वाहन क्रमांक ला धडक दिल्याने दुचाकीवाहक समीर नानाजी रावडे वय 19 व सुमित प्रल्हाद मुनघाटे वय 18 वर्ष दोघेही राहणार हिरापुर गंभीर जख्मी झाले असून. या घटनेची माहिती शंकरपुर पोलिस चौकीला कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी शंकरपुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

     

    प्राथमिक उपचार करून सुमित मुनघाटे याला नागपूर येथील रुग्णालयात तर समीर रावडे याना ब्रम्हपुरी येथे रेफर करण्यात आले. हिरापूर् येथील याच आठवड्यातील हा दुसरा अपघात असून पहिल्या अपघातात एक गंभीर जख्मी तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलिस शिपाई परमेश्वर नागरगोजे करीत आहेत

  • राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    News34 chandrapur

    चिमूर –  वन विभागाच्या जंगलातून अवैध रेती उपसा करणाऱ्या चालत्या तरक्टर वरून मजदुर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास मुरपार मार्गावर घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

     

    चिमूर तालुक्यातील मुरपार – पीटीचूआ जंगलातील मुरपार मार्गावर अवैध रेती उपसा करून नेणाऱ्या ट्रॅक्टर वरून आकाश धनराज सोंनटक्के हा युवक ट्रॅक्टर वर बसून असताना चालत्या गाडीतून खाली पडल्याने ट्रॉलीचे मागचे चक्के त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदना करिता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    प्राप्त माहितीनुसार नाना मेश्राम यांचे मालकीचे बिना नंबर च्या ट्रॅक्टरने ट्रॅक्टर चालक रोशन रमेश जाधव रोज रात्री अवैध रेती उत्खनन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जास्तीत जास्त रेती उत्खनन करण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची माहिती मृत्काच्या नातेवाईकांनी दिली.

     

    मृतक आकाश धनराज सोनटक्के हा युवक 22 वर्षाचा असून आई वडिलांना एकटाच मुलगा होता. वडील अपंग असल्याने व आई शेतमजुरी करीत असल्याने उदरनिर्वाह भगविण्याकरिता आकाश नाना मेश्राम यांचे ट्रॅक्टर वर अवैध रेती उपसा करण्याचे काम करत होता.

     

    आकाशच्यां जाण्याने आई वडिलांवर संकट कोसळले आहे पण अवैध रेती उत्खनन बंद झाले नाही तर पुन्हा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. आता तरी महसूल प्रशासन. वनविभाग जागे होईल का.! की पुन्हा बळी घेण्याची वाट बघणार.