Tag: चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ

  • Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

    Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

    Journalist Award चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या जेष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अशा कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यावर्षी कर्मवीर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे(नागपूर )व अशोक पोतदार, (भद्रावती)ठरले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा 11 ऑगस्टला मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने,मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तीक लोखंडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.

    News18 lokmat
    उत्कृष्ट वार्तांकन वर्गातून मिळाला पुरस्कार

    योजना : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    Journalist award यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.यात स्व.चांगुणाताई डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती प्रित्यर्थ ना.मुनगंटीवार यांचे तर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार अनिल पाटील(वरोरा पुण्यनगरी), द्वितीय प्रशांत खुळे,(वरोरा तरुण भारत),तृतीय अमर बुद्धारपवार (नवरगाव, पुण्यनगरी), प्रोत्साहनपर पुरस्कार आमोद गौरकार,(शंकरपूर लोकमत),प्रशांत डांगे,(ब्रह्मपुरीमहासागर) यांना दिला जाणार आहे. तसेच चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी स्व.छगनलाल खजांची स्मृती प्रित्यर्थ,अ‍ॅड.प्रशांत खजांची तर्फे शुभवार्ता पुरस्कार साईनाथ कुचनकर(लोकमत चंद्रपूर), स्व सुरजमलजी राधाकीसन चांडक स्मृती प्रित्यर्थ,गिरीश चांडक यांचे कडून मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार निलेश व्याहाडकर(दै. भास्कर, चंद्रपूर) स्व.रामकुंवर सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ,के के.सिंह यांचे कडून शोध पत्रकारिता डिजिटल (पोर्टल) विभाग विजय सिद्धावार(पब्लिक पंचनामा मूल), स्व श्रीमती सुशीला राजेंद्र दीक्षित यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ किर्तीवर्धन दीक्षित यांचे तर्फे उत्कृष्ट वृत्तांकन (टीव्ही) हैदर शेख (टीव्ही 18 लोकमत), इतिहास तज्ञ अशोक सिंह ठाकूर यांचे तर्फे वृत्त छायाचित्र पुरस्कार संजय बांगडे (लोकमत,सिंदेवाही )यांना घोषीत करण्यात आला आहे. तसेच पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या वाटचालीत योगदान देणार्‍या माजी पत्रकारांना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.यात पंकज शर्मा, स्व. गजानन ताजणे, अरविंद खोब्रागडे, प्रशांत देवतळे यांचा समावेश आहे.

  • चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

    चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

    Chandrapur Press club : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची आमसभा (सर्वसाधारण सभा) आज, १७ जानेवारी रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या सभेत २०२३-२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या निवडणुकीत अनुभवी आणि उत्साही पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

    निवडणूक – आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    या निवडणुकीमुळे संघाला नवे नेतृत्व मिळाले असून, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे, सचिव प्रवीण बतकी, संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य रोशन वाकडे, प्रशांत देवतळे,प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई यांची निवड करण्यात आली.

    निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष मजहर अली, पंकज मोहरील, कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारणीत अनेक उत्साही पत्रकारांची निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यासाठी संघाचे माजी अध्यक्ष मजहर अली, पंकज मोहरील, कमलेश सातपुते यांच्यासह संघाच्या सर्व सदस्यांनी व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तरुण आणि अनुभवी पत्रकारांचा समन्वय असलेल्या या नवीन कार्यकारिणीमुळे संघाच्या कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. पत्रकारितेचे उच्च मापदंड कायम ठेवून संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ही कार्यकारिणी सक्रिय राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.