Tag: चंद्रपूर वनविभाग

  • बाबूपेठवासीयांनो सावधान पुढे वाघ आहे….

    बाबूपेठवासीयांनो सावधान पुढे वाघ आहे….

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 20 नोव्हेम्बरला शहरातील बाबूपेठ भागात शनी मंदिरात पूजेसाठी गेलेल्या मनोहर वाणी या व्यक्तीला वाघाने ठार केल्याने या भागात वनविभागाने गस्त सुरू केली आहे.

     

    वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांचा बळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला आहे, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भाग हा जंगलालगत असून अनेकदा या मानवी वस्तीत वन्यप्राण्याने शिरकाव केला आहे.

     

    जुनोना जंगल परिसरात दररोज पहाटे असंख्य नागरिक सकाळी फिरायला जातात मात्र आता त्याठिकाणी वाघाचा वावर वाढल्याने वनविभाग सुद्धा सतर्क झाला आहे.

     

    सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना वनविभाग सतर्क करीत असून जपून….पुढे वाघ आहे….अशी सूचना देताना दिसंत आहे, जंगल परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहे, मात्र जंगल भागात मानवी वावर वाढल्याने त्याठिकाणी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याकरिता नागरिकांनी सकाळी फिरायला जाताना बेसावधपणा बाळगू नये.

  • चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला.

     

    बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला करीत ठार केले.

     

    शनी मंदिर परिसरात तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

     

    कुडे यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली, मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे.

     

    वनविभागाशी चर्चा केल्यावर तपास पूर्ण झाल्यावर वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुडे यांना मिळाले.

     

    बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहे, ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे, सदर दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करीत या परिसरात 2 पिंजरे वनविभागाने लावावे अशी मागणी करण्यात आली, वाघाचा बंदोबस्त न केल्यास राजू कुडे यांनी वनविभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

     

    20 नोव्हेम्बरला घडलेल्या घटनेमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, याठिकाणी दररोज नागरिक मॉर्निंग वॉक करायला जातात.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी

    News34 chandrapur

    बाेडधा (हळदा)- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये 1 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता घडली.सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असुन शेतावर जाऊन धान कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

     

    हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (वय ६०) ही महिला आज सकाळी दहा वाजता धान कापायला गेली. दुपारी तीनच्या सुमारास शेतामध्ये असलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले व डाेक्याचा भाग छिन्नविछिन्न अवस्थेत करून या महिलेला शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये नेले या महिलेच्या साेबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने सदर महिलेचा मृतदेह तिथेच ठेवुन वाघ पळुन गेला.

     

    सदर घटनेची माहिती गावात हाेताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे,वनक्षेत्रसहाय्यक ए.पी.करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासहित दाखल झाले.तसेच मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.

     

    वाघाच्या हल्ल्यात सकाळी गाेऱ्हा जखमी
    बाेडधा येथील प्रल्हाद जयदेव हुलके हा युवक बैल शेतात चारण्यासाठी जात असताना वाघाने बाेडधा शेतशिवारातील वनविभागाच्या राेपवनासमाेरच एका गाेऱ्हावर वाघाने हल्ला करून जखमी केले.

     

    वाघाच्या दहशतीने परिसरातील नागरिक घाबरले असुन शेती करायची कशी , धानपिक कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला असुन तातडीने वनविभागाने या वाघाांचा बंदोबस्त करावा अशी मागणी हाेत आहे.

    वर्ष 2023 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 20 बळी गेले आहे ज्यामध्ये 19 वाघाच्या हल्ल्यात तर 1 बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहे.

  • तो गुरांना घेऊन जंगलात गेला आणि वाघ समोर आला

    News34 chandrapur

    चिमूर – गुरांना जंगलात चराईसाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना रविवारी 29 ऑक्टोबर ला घडली.

     

    चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे राहणारे 45 वर्षीय मधुकर धाडसे असे मृतकाचे नाव आहे.

    दुपारच्या सुमारास विहिरगाव येथील गुराखी व गुरेढोरे मालक यांनी 8 जणांचा समूह बनवीत गुरे चराईकरिता विहिरगाव वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 859 मध्ये गेले.

     

    त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने मधुकर वर हल्ला चढवीत त्याला ठार केले, सदरची माहिती वनविभागाला मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या चमूने मधुकर चा मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालयात आणला, मृतक मधुकर हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यात पहिल्यांदाचं आढळला भला मोठा अजगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे.

     

    चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर येथे जाऊन शेतशिवारातील झाडावरून १४ फुट लांब व २६ किलो वजनाच्या अजगर सापाला अलगद पकडले. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे. याआधी तेरा फुट लांबीचा अजगर याच परिसरात झिरे यांनी पकडला आहे. अजगराची वनविभागा मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी त्याला सोडण्यात आले.

     

    अजगर सापाला सोडतांना वनरक्षक सूधीर ठाकुर, वनरक्षक पवन कुळमेथे, वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लात गुराखी ठार

    News34 chandrapur

    मूल (गुरू गुरनुले): गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे वय 60 रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

    मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे आज 20 ऑक्टोबर ला गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते, दरम्यान दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील नागरीकांना संशय आल्याने त्यांनी जंगलाच्या दिशेने गेले.

     

    यावेळी बडु विट्टल भेंडारे यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचुन पंचनामा करीत आहे.

  • हत्ती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर /सिंदेवाही –  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मंगळवारी सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला.  या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर  (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची नावे आहेत.

     

    मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत  उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील सिंदेवाही तालुक्यांत चिटकी गावालगत शेतात काही नागरीकांना जंगली हत्ती मृत्तावस्थेत आढळून आल. सदर घटनेची माहिती बीट वनरक्षक राठोड यांना देण्यात आली. सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक हे आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी आपल्या चमुसह चमु दाखल झाले.

     

    सदर घटनेची खात्री केल्यानंतर घटना स्थळावर मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव), एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक हजारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी सुरपाम, डॉ. शालीनी लोंढे दाखल झाले. वरिष्ठांच्या उपस्थितीत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हत्तीच्या मृत्तदेहाचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या आघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला.

     

    शेतमालक अशोक पांडुरंग बोरकर व सभोवतालच्या परिसराची झडती घेण्यात आली. यामध्ये प्रकरणात वडिल अशोक पांडुरंग बोरकर व अजय अशोक बोरकर यांचे विरूध्द पी.ओ. आर. क्र. 09130/228231 अन्वये वनगुन्हा नोंदवून दोघे संशयीत बापलेकाला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण तपास ब्रम्हपुरीचे सहायक वनसंरक्षक एम. बी. चोपडे करीत आहेत.

    विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शेत मालकांना आपल्या शेतात विद्युत प्रवाह न सोडण्याचे आवाहन केले होते, अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ड

  • चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा मृत्यू

    News34 chandrapur

    ( प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- आज 3 आक्टोंबर मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

     

    वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता, वनविभाग त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता मात्र आज एक हत्ती मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.