Tag: चंद्रपूर लोकसभा

  • Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur Mp Pratibha dhanorkar
    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mukhyamantri-ladki-bahin-yojana-maharashtra-government/

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली.

    Chandrapur Mp Pratibha dhanorkar तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी-पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता 70 कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी-पळसगांव-नंदोरी-भटाळी-चोरा-चंदनखेडा या रस्त्याकरीता 40 कोटी रुपये, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 371 ते पिंपळगांव(सिंगरु) ते तुमगांव वाही या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीता 50 कोटी रुपये, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता 75 कोटी रुपये तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता 46 कोटी रुपये तसेच सास्ती-कोलगांव-कढोली-चढी-निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता 13 कोटी रुपयांची मागणी करुन निधी उपलब्ध करुण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली.
    यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.
  • Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरातील मतदारांना धमकी? याप्रसंगी काय करणार?

    Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरातील मतदारांना धमकी? याप्रसंगी काय करणार?

    Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले.

    हे ही वाचा – अजबचं मला खासदार म्हणून निवडून द्या, मी तुम्हाला व्हिस्की व बिअर देणार

    राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. जाटव बोलत होते. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी आणि राजकीय पक्षांचे / उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. Chandrapur Lok Sabha Constituency

    हे ही वाचा : लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का

    यावेळी श्री. जाटव म्हणाले, जिल्ह्यात किंवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या क्षेत्रात मतदारांवर दबाव टाकणे किंवा धमकाविण्याचे प्रकार निदर्शनास येत असतील, त्याची माहिती त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल. तसेच धमकाविणा-यांवर कडक कारवाईसुध्दा केली जाईल. निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील ॲपचा उपयोग करावा. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    या ॲपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास 100 मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते. निवडणुकीच्या संदर्भातील ऑनलाईन परवानगी करीता ‘सुविधा’ ॲप विकसीत करण्यात आले आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुविधा ॲपचा वापर करावा. ऑफलाईन परवानगीकरीता ‘एक खिडकी’ योजनासुध्दा उपलब्ध आहे, असे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. जाटव यांनी सांगितले.

     

    तर खर्च निरीक्षक श्री. हिंगोनिया म्हणाले, पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष किंवा संघटन 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा खर्च करू शकत नाही. यापेक्षा जास्त खर्च करावयाचा असल्यास ऑनलाईन किंवा धनादेशाद्वारे करता येईल. तसेच उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या नोंदवह्या अतिशय अचूक भराव्यात. खर्चाच्या नोंदवहीची पडताळणी तीन वेळा करणे आवश्यक असून नोंदवहीत बाब निहाय खर्च रोज नमुद करावा, अशा सूचना श्री. हिंगोनिया यांनी दिल्या. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांचे सहकार्य आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात ‘काय करावे’ किंवा ‘काय करू नये’, यबाबतही त्यांनी माहिती दिली. सोबतच 27 मार्च रोजी अंतिम झालेली मतदार यादी, 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा, टपाली मतदान, निवडणुकीसाठी पोलिस कर्मचा-यांची तैनाती व इतर मनुष्यबळ, जिल्हास्तरावर व विधानसभा मतदारसंघ स्तरावर मिळणा-या परवानग्या, ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुरक्षा व्यवस्थापन, स्ट्राँग रुम, पेडन्यूज व जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, उमेदवारांच्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन आदींबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना अवगत केले. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    असे आहेत संपर्क क्रमांक :

                1.मतदार मदत केंद्र / नियंत्रण कक्ष – 1950 (टोल फ्री)

                2.आदर्श आचार संहिता कक्ष – 8788510061

                3.एक खिडकी (सुविधा) कक्ष – 9673042690

                4.सी-व्हीजील / ई.एस.एम.एस – ॲपद्वारे

  • Chandrapur Loksabha Election Symbol : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

    Chandrapur Loksabha Election Symbol : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

    Chandrapur Loksabha Election Symbol चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता 15 उमेदवार एकमेकांविरुद्ध लढाई लढणार आहे, 20 ते 27 मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते, यावेळी एकूण 36 उमेदवारांनी 48 नामनिर्देशन अर्ज दाखल केले, 28 मार्चला झालेल्या छाननीत तब्बल 21 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन अर्ज बाद झाले, व 15 उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले. Chandrapur Loksabha Election Symbol

     

    30 मार्च अर्ज मागे घेण्याची तारीख होती पण कुणीही अर्ज मागे न घेतल्याने आता एकूण 15 उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे आहे.

    याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली. Chandrapur Loksabha Election Symbol

    हे ही अवश्य वाचा – वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने भाजपवर केला हल्ला

    गौडा म्हणाले की अर्ज छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, बसपा चे राजेंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टी अवचित सयाम, जय विदर्भ पार्टी अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पार्टी नामदेव शेडमाके, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पूर्णिमा घोनमोडे, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले, अखिल भारतीय मानवता पक्ष वनिता राऊत, सन्मान राजकीय पक्ष विकास लसंते, भीम सेना विद्यासागर कासरलावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सेवकदास बरके, अपक्ष दिवाकर उराडे, मिलिंद दहिवले, संजय गावंडे यांचा समावेश आहे. Chandrapur Loksabha Election Symbol

     

    सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. लोकसभा क्षेत्रातील एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार 19 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील. Chandrapur Loksabha Election Symbol

    कुणाला मिळाले कोणते निवडणूक चिन्ह?

    प्रतिभा धानोरकर – पंजा, सुधीर मुनगंटीवार – कमळ, राजेंद्र रामटेके – हत्ती, अवचित सयाम – टीव्ही, अशोक राठोड – गॅस सिलेंडर, नामदेव शेडमाके – Saw(आरी), पूर्णिमा घोनमोडे – सिटी, राजेश बेले – रोड रोलर, वनिता राऊत – पेन निब (with seven rays), विकास लसंते – रिंग, विद्यासागर कासरलावर – ऑटो रिक्षा, सेवकदास बरके – बास्केट (containing fruits), दिवाकर उराडे – कोट, मिलिंद दहिवले – बॅट, संजय गावंडे – टायर

    आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांची उपस्थिती होती.

  • Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात या 7 जणांनी भरला उमेदवारी अर्ज

    Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात या 7 जणांनी भरला उमेदवारी अर्ज

    Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application चंद्रपूर : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले.

    हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शक्तिप्रदर्शन

    मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पाटी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया), धानोरकर प्रतिभा सुरेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज (भारतीय जनता पार्टी) आणि अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

    हे ही वाचा : वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार चंद्रपुरात राष्ट्रीय पक्षांना देणार धक्का

    Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शक्तिप्रदर्शन करीत लोकसभा क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. तर इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज साध्यापणाने दाखल केला तर 27 मार्चला शक्तिप्रदर्शन करीत पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

     

    Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल केली आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

     

  • Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवून चंद्रपूर लोकसभा जागा जिंकण्याची संधी देण्याचा विचार करू शकते. त्यामुळे विधानसभेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होतो. Assembly Election

     

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा नवा उमेदवार येणार, की सुधीर मुनगंटीवार उमेदवार होणार? सध्या या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभेच्या जागेवर शिवसेना दावा करू शकते, असा अंदाज आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन बल्लारपूर येथे झाले. त्याच दिवशी भाजपने मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा कार्यक्रम शहरात आयोजित केला होता. Chandrapur lok sabha

     

    नेहा पेंडसेच्या कार्यक्रमाला आणि शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील विरोधाभासी गर्दीने शिवसेनेची ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत, तसतसे पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही जागांसाठी कशी रणनीती आखतात आणि स्पर्धा करतात हे पाहणे मनोरंजक असेल. Bharatiy janata party

     

    राजकारणातील नवे पर्व, कोण आहेत संदीप गिर्हे?

    चंद्रपूर शहरातील रामनगर भागातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या संदीप गिऱ्हे यांचे जीवन संघर्ष आणि चिकाटीने भरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन त्यांनी लहान वयातच शाळेत असतानाच शिवसेना पक्षात प्रवेश केला. Sandeep girhe

     

    शाखाप्रमुख म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या सध्याच्या पदापर्यंत, गिर्हे यांचा प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. राज्यात राजकीय बदल होऊनही संदीप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत ठाम राहिले. आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ठाकरे गटाने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात, तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लक्षणीय बळ मिळविले आहे. Shiv sena

     

    गिऱ्हे यांच्या संघटन कौशल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना थक्क करून सोडले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संभाव्य पाठिंब्याने संदीप गिऱ्हे यांना मोठा राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची संधी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गिऱ्हे यांच्यासारखा तळागाळातील कार्यकर्ता दिग्गज नेत्यांना आव्हान देणारा पाहिल्यास नवल वाटणार नाही. शेवटी, बदल हा गोष्टींचा नैसर्गिक क्रम आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देता, चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला आमदार निवडून आणण्याची दाट शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. Minister sudhir mungantiwar

     

    संदीप गिऱ्हे यांचे समर्पण आणि संघटनात्मक बांधणीसाठी धोरणात्मक दृष्टीकोन याने निःसंशयपणे या जिल्ह्यात पक्षाच्या वाढत्या प्रभावाला हातभार लावला आहे. शेवटी, संदीप गिऱ्हे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय शक्ती म्हणून झालेला उदय हा त्यांच्या अटूट बांधिलकीचा आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा पुरावा आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शिवसेना पक्ष आगामी निवडणुकीत मोठा प्रभाव पाडण्याच्या तयारीत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या मतदारांची साथ शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मिळत आहे, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला आलेला जनसमुदाय शिवसेनेची वाढती ताकद दाखवीत आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात बेधडक वक्तव्य करीत आहे, त्यांनी सत्तेपुढे गुढघे टेकले नाही, आजही त्यांच्या सोबतीला निष्ठवंतांची फौज उभी आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरे पॅटर्न चालणार असा अंदाज राजकीय विचारवंतांनी वर्तविला आहे.

  • चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.

     

    कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले असून आज सर्व अर्ज नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

     

    इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, शिवा राव, शंतनू धोटे, दिनेश चोखारे, डॉ.हेमंत खापणे दिलीप माकोडे यांचा समावेश आहे.

     

    सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कांग्रेस पक्षाकडून आमदार प्रतिभा धानोरकर हे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

  • हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्र, वणी विधानसभा क्षेत्र व आर्णी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा समन्वयक तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुथ रचना बळकट करीत सुपर वॉरियर्सने आपल्या नियंत्रण क्षेत्रातील प्रत्येकी तीन बुथवर 50 टक्क्याहून अधिक मतदान मिळेल याकरीता प्रभावीपणे कार्य करण्याची सुचना केली.

     

     

    वरोरा येथे दि. 23 डिसे. 2023 रोजी पार पडलेल्या विधानसभानिहाय कोअर कमिटीच्या या बैठकीस वरोरा विधानसभा निवडणुक प्रमुख रमेश राजुरकर, डॉ. भगवान गायकवाड, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, करण देवतळे, रोशनीताई देवतळे, सुनिताताई काकडे यांचेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वणी व आर्णी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी बैठकीस प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरियर्स उपस्थित होते.

     

     यावेळी उपस्थित पदाधिकारी, सुपर वॉरियर्स व बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी महाविजय 2024 चे स्वप्न साकार करण्यास व मा. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सुपर वॉरियर्सनी आवश्यक ते निर्णय व विशेष लक्ष घालून बुथ रचनेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याची सुचना केली.

     

    सुपर वॉरियर्सने महाविजयाचा संकल्प घेत प्रत्येक मुद्दा, विषय समजुन घेवून त्याची तिन्ही बुथवर शत प्रतिशत अंमलबजावणी करण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही अहीर यांनी वरील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील कोअर कमिटी पदाधिकारी वॉरियर्स व उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.