Tag: चंद्रपूर महामोर्चा

  • Save Reservation : चंद्रपुरात आरक्षण वाचविण्यासाठी सर्व जातीय संघटनांचा महामोर्चा

    Save Reservation : चंद्रपुरात आरक्षण वाचविण्यासाठी सर्व जातीय संघटनांचा महामोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 7 फेब्रुवारीला चंद्रपुरात आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला, सर्व जातीय संघटनांनी मिळून आरक्षण वाचविण्यासाठी मोर्चा काढला. Grand march

     

    सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीमधिल नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. Save reservation

     

    महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 व 26 जानेवारी 2024 रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन अधिसुचना काढल्या. या अधिसुचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले व जातवैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात अनुसूचित जाती,अनुसुचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मुळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे, या अधिसूचनेविरोधात आगामी विधानसभा अधिवेशनात आम्ही आवाज बुलंद करू अशी माहिती धानोरकर यांनी यावेळी दिली.

     

    सध्या देशात सर्व जातीचे आरक्षण संपविण्याचे काम सरकारद्वारे सुरू आहे, आजच्या मोरच्यातून हा सरकारला इशारा आहे, बहुजन जागा झाला तर तुमची सत्ता खेचून टाकणार ही ताकद आज समाज दाखवीत आहे.

  • Grand March Chandrapur : आरक्षण वाचवायचं तर चंद्रपुरातील महामोर्चा मध्ये सहभागी व्हा

    Grand March Chandrapur : आरक्षण वाचवायचं तर चंद्रपुरातील महामोर्चा मध्ये सहभागी व्हा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 व 26 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयांमुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथिल झाल्याने ओबीसी, एससी, एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गात बोगस लोकांची घुसखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Save reservation

     

    सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गाचे आरक्षण धोक्यात आले असुन या निर्णयांच्या विरोधात दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात जिल्ह्यातील ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मोर्चाचे संयोजक सचिन राजुरकर यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केले. Grand march chandrapur

     

    राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब, दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसूदा काढला आहे. हा मसुदा आरक्षण मिळणाऱ्या सर्वच प्रवर्गातील नागरिकांसाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतो. Sage soyare

     

    त्यामुळे ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे सुध्दा घटनाबाह्य आहे. शासनाच्या या अन्यायकारक भूमिकेचा विरोध नोंदविण्याकरिता तसेच 27 डिसेंबर 2023 राजपत्र रद्द करणे व ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी सोबत सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकणार आहे. Cast validity

     

    महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 मध्ये बदल करणासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्या मुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते , म्हणून राजपत्र रद्द करण्याच्या आणि ओबीसी (विजा, भज, विमाप्र ) “अनुसूचित जाती / जमाती व इतर समाजाची जात निहाय जनगणनेच्या मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Chandrapur News: ते राजपत्र रद्द करा, जातनिहाय जनगणना करा – सचिन राजूरकर

    Chandrapur News: ते राजपत्र रद्द करा, जातनिहाय जनगणना करा – सचिन राजूरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचना मध्ये बरेच बदल केली आहे व ओबीसी ( विजा , भज, व विमाप्र ) अनुसूचित जाती/ जमाती, इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 ला ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूची जमाती, विजा, भज व विमाप्र समजा तर्फे महामोर्चाचे आयोजन केले आहे, मोर्चाची नियोजन बैठक धनोजे समाज सभागृह वडगाव रोड,चंद्रपुर येथे ऍड पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Gazette of Maharashtra Govt

     

    महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम २००० मध्ये बदल कारणासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्या मुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते , म्हणून राजपत्र रद्द करून घेण्यासाठी आणि ओबीसी ( विजा , भज , विमाप्र ) “अनुसूचित जाती /जमाती व इतर समाजाची जात निहाय जनगणनेच्या मागण्यांवर महामोर्चा निघणार आहे.cast wise census

     

     

    या बेठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ,आदिवासी विकास परिषद,आदिवासी संघर्ष कृती समिती(सर्व जमाती व संघटना संलग्नीत), बहुजन समता पर्व व सर्व SC,ST, OBC, VJ ,NT &SBC समाजातील संघटना तर्फे सचिन राजूरकर, डॉ संजय घाटे, नंदू नागरकर, दिनेश चोखारे , अनिल धानोरकर , प्रमोद बोरीकर, जयदीप रोडे,राजेश नायडू, विजय नळे, राजू अडकीने, मनीष चौधरी, दिनेश कष्टी, देवराव सोनपित्तरे, रणजित डवरे,अजय बलकी, योगेश बोबडे, एस बी मटाले , राजू मारांडे, अरुण देऊलकर, निळकंठ पावडे, सुनील आवारी, उमेश काकडे, शाम लेडे ,अशोक बनकर,प्रा सूर्यकांत खणके , प्रा शिंदे सर, रवींद्र टोंगे, प्रमोद बोरीकर, सतीश भिवगडे , कृष्णा मसराम, विनोद ताजने, देवा पाचभाई,मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, स्नेहल चौथाले उपस्थित होते.

  • शासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर

    News34 chandrapur
    चंद्रपूर – शासकीय नोकरीचे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदविला.

     

    महाराष्ट्र शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज चंद्रपुरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या स्वयंस्फूर्तीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात दीक्षाभूमी परिसरातून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

     

    यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

     

    खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा निर्णय हा त्वरित मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी एकजूट झाले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या मोर्चात पाठिंबा दर्शवण्यासाठी सहभागी झाले.

     

    विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी काही राजकीय पक्षाच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा आमच्या पक्षाचा आहे असे दर्शविले होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाईने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

    शिक्षण व नोकरी बचाव समितीद्वारे आयोजित ह्या मोर्च्यात हजारोच्या संख्येत तरुणाई सामील झाली.

    आश्वासन नको, अध्यादेश काढावा

    कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेने चंद्रपुरातील आंदोलनकर्त्यांचे समाधान झालेले नाही. राज्यातील युवकांविषयी तळमळ असेल, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच सप्टेंबर महिन्यात काढलेले सर्व शासन निर्णय, परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही सांगण्यात आले.

     

    तरुणाईची मुख्य मागणी

     

    उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरी हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणाचा हक्क आहे. मात्र, राज्य शासन बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे परवाने वाटप करीत आहे. शासनाने सदर आदेश तत्काळ रद्द करून सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्‍वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, एनपीएस रद्द करून शिक्षक-राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एमपीएससी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे, आयबीपीएस, टीसीएस किंवा इतर खासगी संस्‍थामार्फत विविध पदाच्या स्‍पर्धा परीक्षा न घेता सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाद्वारे घेण्यात याव्‍या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्‍पर्धा परीक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्‍पना रद्द करणे, राज्‍य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्‍त पदे व अनुदानित संस्‍थेमधील शिक्षक- प्राध्यापकांची रिक्‍त पदे तत्काळ भरावी आदी मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

    जन आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्‍यातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, राज्‍य कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा अन्‍यथा शिक्षण-नोकरी बचाव समिती जिल्‍हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करून राज्‍यव्‍यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने देण्यात आला.

    जनआक्रोश मोर्चात शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरचे सर्व सदस्य यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विविध विभागातील शासकीय कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर हे मोर्चात प्रामुख्याने सहभागी झाले होते.

    मोर्चातील मागण्यांवर विद्यार्थ्यांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला. त्यानंतर विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील युवक-युवतींच्या हस्ते निवासी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व सदर मागण्यांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शेवटी शपथ घेऊन राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.