Tag: चंद्रपूर दांडिया उत्सव

  • चंद्रपुरातील भाऊ च्या दांडियात बिग बॉस फेम प्रिन्स नरूला ची हजेरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस फेम अभिनेता प्रिन्स नरुला यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी युथ आयकॉन असलेल्या प्रिन्स नरुलाची एक झलक टिपण्यासाठी चंद्रपूरकर तरुण, तरुणींनी मैदानावर एकच गर्दी केली.

     

    येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षांपासून भरविण्यात येत असलेल्या भाऊचा दांडिया उत्सवाला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आह. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी नच बलिये तसेच रोडीज एक्स २, बिगबॉस ९ चा विजेचा प्रिन्स नरुला याने हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोदी गर्दी केली. त्याची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मैदानावरील युवतींमध्ये चुरस बघायला मिळाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते प्रिन्स नरुला याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. २२ ऑक्टोबर रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत प्रथमेश परब यांची उपस्थिती राहणार आहे.

     

    २४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या दांडिया उत्सवात स्पर्धकांना अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी असून, लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहे

    याप्रांगी माजी आमदार देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, डॉ. विश्वास झाडे, ऍड. विजय मोगरे, वारजूरकर, आदी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.

  • चंद्रपुरात भाऊच्या दांडियाची धूम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे.
    Chandrapur dandiya
    भाऊच्या दांडियात अधिकाऱ्यांची उपस्थिती
    या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक पाठक, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवार, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता गाडेगोणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चौव्हाण, कार्यकारी अभियंता कुंभे, कृषी अधिकारी शंकरजी तोटावार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गोडसेल्वार, दिलीप माकोडे, संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल, उद्योजक चंदू वासाडे, प्रा. कीर्तिवर्धन दीक्षित, प्रा. डोहे यांची विशेष उपस्थिती  होती. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वरील अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते उमाकांत धांडे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस नेते महेश मेंढे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, डॉ. सागर वझे, मोनू चिमुरकर, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, अजय बल्की, सुरज बोबडे, रतन सिलावार, किशोर हेमके यांची उपस्थिती होती.
    या दांडियात आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.
    ———————————————————

    २१ ला प्रिन्स नरुला, २२ ला प्रथमेश परब

    चंद्रपूर शहरात भाऊचा दांडियात धूम आहे. यामध्ये तरुणाईचे आकर्षक झालेले प्रिन्स नरुला हे २१ ऑक्टोबर व प्रथमेश परब हे २२ ऑक्टोबर रोजी येणार आहेत.
    ————————————————————

    मान्यवरांतर्फे बक्षिसांचा पाऊस

    ग्रुप दांडियामध्ये स्वर्गीय राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन तर्फे १ लाख रुपये, कपल करिता स्वातंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलची पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुगलिया परिवारातर्फे ५० हजार रुपयाचे बक्षीस तसेच सोलो (मुलगा) गटाला संवाद प्रतिष्ठानतर्फे ५० हजार, सोलो (मुलगी) ५० हजार, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडून लहान ग्रुपचा मुलांना ११ हजार रुपये व लहान मुलींसाठी ११ हजार रुपये तसेच काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्याकडून ३५ वयावरील (पुरुष) ११ हजार रुपये, ३५ वयावरील (महिला) ११ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
  • चंद्रपुरात थोर स्त्रियांचा जागर करणारा दांडिया उत्सव

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरच्या नानाजी नगर महिला मंडळातर्फे आयोजीत वुमेन्स पाॅवर दांडियाचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते रविवारी 15 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजता थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख,माजी नगरसेविका अनुराधा हजारे, जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे व मनीषा बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.

     

    विशेष म्हणजे या दांडिया मध्ये नऊ दिवस राजमाता जिजाऊ, महाराणी हिराई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,आद्य शिक्षिका फातिमा शेख, प्रथम वैद्यकीय चिकित्सक रख्माबाई राऊत, माता रमाई भिमराव आंबेडकर व मदर टेरेसा या 9 थोर स्त्रियांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच विधानसभेत जनसामान्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार धानोरकर यांचा साडी-चोळी देऊन नानाजी नगर महिला मंडळाच्या सदस्यांनी सत्कार केला.

     

    उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांनी सक्षम होऊन स्वबळावर उभे राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.तसेच नवरात्र उत्सवातून थोर महिलांच्या कार्याचे स्मरण करण्याची संकल्पना समाजातील नवीन पिढीला दिशा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
    या दांडिया उत्सवामध्ये नऊ दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य मुली व महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल अशी भावना यावेळी माजी नगरसेवक देशमुख यांनी व्यक्त केली.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गावंडे या मुलीने केले. यावेळी तिने जिजाऊची वेशभूषा परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व राजमाता जिजाऊ च्या कार्याचे वाचन माधुरी शास्त्रकार तर आभार प्रदर्शन नंदू पाहुणे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नानाजी नगर महिला मंडळाच्या शुभांगी गावंडे,संगीता पाहुणे,मनिषा गावंडे, संगीता वानखडे,अलका लांडे ,जयश्री लांडे,प्रविण बरडे, वैशाली हिवरकर,साधना शेंडे, सपना राणा,कविता भांदककर यांनी अथक प्रयत्न केले.