Tag: चंद्रपूर ताडोबा जंगल

  • Dangerous Animal Attack : चंद्रपूर जिल्ह्यात 17 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

    Dangerous Animal Attack : चंद्रपूर जिल्ह्यात 17 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – मूल तालुक्यातील मारेगाव येथे आशिष राजू दुधकोवार (वय 17) या तरुणावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर रस्त्यावरील मारेगावजवळील शेतात घडली. Leopard attack

     

    मिळालेल्या माहितीनुसार, आशिष एमआयडीसी परिसरातील पृथ्वी कंपनीजवळील विश्वेश्वर कोंडू पेंदोर यांच्या शेतात शेळ्या चरत होता. दुर्दैवाने तो झुडपात गेला असता, तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला झाल्यावर आशिषने जोरात आरडाओरडा केला मात्र बिबट्याने तरुणाला गंभीर दुखापत करून बिबट्याने घटनास्थळ सोडले. Wildlife conservation

     

    आशिषला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांच्यासह वनविभाग घटनास्थळी पंचनामा करत आहेत. coexistence between humans and animals

     

    तरूणाच्या कुटुंबाने वन परिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सावली यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंतीही केली आहे. बिबट्याचे हल्ले दुर्मिळ आहेत परंतु ते अत्यंत धोकादायक असू शकतात, विशेषत: जंगलाच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी. अशा प्रदेशांतील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ही घटना वन्यजीव संरक्षणाची गरज आणि मानव आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्वाच्या महत्त्वाची आठवण करून देणारी आहे.