Tag: गणेश उत्सव

  • Ganesh festival in dubai : दुबई येथे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात

    Ganesh festival in dubai : दुबई येथे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात

    Ganesh festival in Dubai चंद्रपूर – सर्वानी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. तेव्हा पासून महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्तानाच नव्हे तर हिंदुस्ताना बाहेर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे यामध्ये दुबई देखील मागे नाही.


    Ganesh festival in Dubai यंदा इन्सपायर इवेंट्स आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, आमरोली योग पीठ, सांस्कृतिक मंडळ व मित्र परिवार यांनी दुबई येथे प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे. वेस्टझोन प्लाझा हाँटेल, अपार्टमेंट कुवैत स्ट्रीट ,मनखुल दुबई शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी श्रीमंत ढोलताशे पथकांच्या वारणा मध्ये गणरायाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर दिवसभर भजन व सामुहिक गणेश जाप ,दुपारी आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी आरती, गणेश भजन व जागरण हे कार्यक्रम संपन्न झाले.

    योजना दूत बनून महिण्याला कमवा 10 हजार रुपये

    रविवारी आठ सप्टेंबरला गणेश पूजन, आरती, सामुहिक गणेश जाप,संस्कृती मराठी मंडळाचे सामुहिक अर्थवशीर्ष पठन, संध्याकाळी आरती आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक गणेश विसर्जन व सांगता आरती करण्यात आली अशी आमरोली योगपीठाच्या संचालिका डॉ. शिल्पा अमृतलाल चन्ने यांनी दिली.

  • Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

    Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

    Ganesh utsav 2024 चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून आज जोरगेवार कुटुंबाने सहपरिवार गणरायाची पूजा केली.

    Ganesh utsav 2024 दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची दुसरी पिढी ही परंपरा उत्साहाने पुढे नेत आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

      जोरगेवार कुटुंबीयांनी गणेशोत्सवाची महती मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांच्या या उत्सवाला ९४ वर्षांची परंपरा असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहेत.

    अवश्य वाचा : आता आपणही बनू शकता, मुख्यमंत्री योजनादुत, असा करा अर्ज

     गणेशोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी, जोरगेवार कुटुंबीयांनी गणरायाची आरती केली आणि गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंबाचे आणि समाजाचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. जोरगेवार कुटुंबीयांची गणेशोत्सवाची ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि समाजाभिमुखतेचा अनोखा संगम आहे. गणपतीच्या या आगमनाने त्यांच्या निवासस्थानी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांसह नागरिकांनी सहर्ष गणरायाचे दर्शन घेतले.

    Lord ganesha

     गणेशोत्सवाच्या या पारंपरिक सोहळ्याचे ९४ वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल जोरगेवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आगामी वर्ष नागरिकांसाठी सुख, समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायापुढे केली आहे.

  • Ganesh festival : चंद्रपुरात एकाचं ठिकाणी उपलब्ध होणार श्री गणेश मूर्ती

    Ganesh festival : चंद्रपुरात एकाचं ठिकाणी उपलब्ध होणार श्री गणेश मूर्ती

    Ganesh festival उत्सव काळात श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. 

    अवश्य वाचा : राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयाचा बल्लारपूर विधानसभेवर दावा

     Ganesh festival  येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्वास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.


        यावेळी खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

    करिअर : चंद्रपुरात होमगार्ड भरती प्रक्रियेला सुरुवात

    यावर उपाय म्हणुन यावर्षी मनपाने चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली असुन त्यामुळे नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे. येथे प्रत्येक विक्रेत्यासाठी १० बाय १२ आकाराच्या स्टॉल्सची उभारणी केली जाणार असुन विद्युत व्यवस्था,मंडप, फिरते शौचालय,प्रशस्त वाहन पार्कींग व्यवस्था व पूजा साहित्य व सजावट साहित्यांचीही दुकाने येथे उपलब्ध असणार आहेत. बचतगट व इतर मार्फत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याने संपुर्ण प्रदर्शनीला आनंद मेळाव्याचे स्वरूप येणार आहे. त्यामुळे नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे.  


         मूर्तिविक्रेत्यांना स्टॉल्ससाठी गुरुवार २६ ऑगस्ट पासुन नोंदणी करता येणार असुन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय व झोन ३ कार्यालय येथे नोंदणी कार्यालय सुरु करण्यात येत आहे. ७३९१०४२४५१,७३९१०४२४५० या क्रमांकावर संपर्क करूनसुद्धा नोंदणी करता येणार आहे.गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथुन मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.