Tag: कांग्रेस पार्टी

  • congress news : लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण

    congress news : लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण

    congress news तुमसे अच्छी तुम्हारी यादे, तुम चले गये लेकीन यादे रह गयी संतोषसिंह रावत, लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण प्रसंगी वक्तव्य

    Congress news (गुरू गुरनुले) मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री तथा लोकनेते स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांनी सर्वांच्या सहकार्याने मूल येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेस भवनाची निर्मिती केली. स्व.वामनरावजी गड्डमवार हेच मूल येथील काँग्रेस भवनाचे शिल्पकार होते. म्हणून दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कांग्रेस कमिटी कार्यालय मुल येथे स्व. वामनरावजी गड्डमवार साहेबांच्या फोटोचे अनावरण काँग्रेस नेते, सी डी.सी सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.

    राजकीय पुढाऱ्यांनी केली डॉक्टरांची शिकार?

    Congress news गड्डमवार साहेबांना त्यांच्या सैनिकानीच सेनापती केले, नंतर राजा केले. हा इतिहास आहे.परंतु सैनिकांच्या आपसी मतभेदांमुळे सेनापती व राजा निरुत्तर होते म्हणून संघटन मजबूत करीत असताना मतभेद टाळा असा सल्ला आपल्या सैनिकाला रावत यांनी दिला. उपस्थित सर्वांनीच स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला माला व पुष्प वाहून अभिवादन केले. यानिमित्त राजू पाटील मारकवार यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी,दशरथ वाकुडकर,कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,व सभापती राकेश रत्नावार यांनीही गड्डमवार साहेबांच्या राजकीय कर्तबगारीचा इतिहास सर्वांसमोर ठेवला.

    अवश्य वाचा : डॉक्टरांची बदली रद्द करण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर

    कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, सोसायटी सभापती पुरुषोत्तम भूरसे,माजी प्राचार्य बंडू गुरनुले, विवेक मुत्यलवार, डॉ.पद्माकर लेंनगुरे, अतुल गोवर्धन,युवक अध्यक्ष पवन नीलमवार,प्रशांत उराडे, व्यंकटेश पुल्लकवार,संदीप मोहबे,गंगाधर घुगरे,महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, ऊपाध्यक्ष समता बनसोड,सीमा भसारकर मनोज आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.

  • Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व काँग्रेसचे पॉवर फुल नेते विधान सभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा महासचिव राकेश रत्नावार, माजी सभापती, संचालक तथा जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, ग्रामीण नेते राजू पाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा किसान सेल अध्यक्ष दीपक पा. वाढई, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, महासचिव दशरथ वाकुडकर, बंडू गुरनुले, सुमित आरेकर, यांचे सह अनेक ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी यांचे उपस्थितीत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांची निवड त्या -त्या विभागाकडून करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. Congress party

     

    महाराष्ट्र ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी कांतपेठ येथील राजेंद्र वाढई यांची नियुक्ती झाल्याने नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मुल तालुका अनुसूचित जाती(एस.सी.) विभाग तालुका अध्यक्ष पदी चिखली येथील संजय गेडाम, अनुसूचित जमाती. (एस टी.)सेल तालुका अध्यक्षपदी दहेगाव येथील काँग्रेसच सक्रिय किशोर पेंदाम यांची नियुक्ती तर आदिवासी विभाग मुल शहर अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावान, होतकरू संगीत विशारद नेतृत्व असलेले अशोक येरमे, विमुक्त जाती भटकी जमाटी विभाग (एन. टी.) सेल तालुका अध्यक्षपदी गणेश गेडाम मुल यांची निवड झाली. तर मुल तालुका महिला कांग्रेस पदाधिकाऱ्यांनाही ना.वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Vijay wadettiwar

     

    यात ग्रामीण मुल तालुका आदिवासी सेल विभाग तालुका अध्यक्षपदी मरेगाव सरपंच सौ. जोत्सना पेंदोर, मुल शहर महिला कांग्रेस अध्यक्षपदी संयमी निगर्वी संघटन नतृत्वगुन संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व सौ. नलिनी आडपवार , मुल शहर उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका सौ.लीना फुलझेले, मुल शहर महिला सचिव पदी, कांग्रेस निष्ठावान धडाडीच्या पुढाकार घेणाऱ्या वक्तृत्व गुण असलेल्या सौ. शामला बेलसरे यांनी निवड झाली.

     

    तर शहर महिला कोषाध्यक्ष पदी नियमित सक्रिय कार्यरत असलेल्या सौ.राधिका बुक्कावार, शहर उपाध्यक्षपदी धडाडीच्या सौ.समता बनसोड, यांची निवड, तर मुल शहर सचिव पदी सौ. अल्का कामडे, सहसचिव सौ. फर्जना शेख, इत्यादींची निवड करण्यात आली असून महिला तालुका व शहर महासचिव पदावर काही होतकरू सक्रिय नियमित येणाऱ्या महिलांची नियुक्ती तातडीने करण्यात येणार आहे. यांच्या नियुक्तीचे वर्तमान काळात काँग्रेस मोठ्या प्रमाणात व संख्येने उभी करावी व कांग्रेस संघटन मजबूत करावे. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे सर्वांनी पार पाडवी अशी अपेक्षा व्यक्त केले असून उपस्थित सर्व कांग्रेस नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.