Tag: कबड्डी स्पर्धा

  • Chandrapur Woman Kabbadi Tournaments : कबड्डी स्पर्धेत आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर जेसीबी ने झाला पुष्पवर्षाव

    Chandrapur Woman Kabbadi Tournaments : कबड्डी स्पर्धेत आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर जेसीबी ने झाला पुष्पवर्षाव

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेनतून आयोजित श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवा ला सुरवात करण्यात आली आहे. या महोत्सवा निमित्त जय श्रिराम क्रिडा मंडळ, चंद्रपूर च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. यात दिल्लीच्या महिला संघाने आमदार चषक पटकाविला आहे तर पूरुष गटात विठ्ठल क्रिडा मंळड, चंद्रपूरचा संघ विजयी झाला आहे. विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरित करण्यात आले. Woman kabaddi

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शंडे, मधूरकर बनकर, भास्कर कावळे, शरद बनकर, अमीत लडके, ताहिर हुसेन, राम जंगम, अतुल बनकर, पिंटु गावतूरे, राजेश गुटके, किशोर रायपूरकर, मंगला आखरे, नकुल वासमवार, राशेद हुसेन, कार्तिक बोरेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
    चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. Chandrapur kabaddi tournament

     

    बिनबा वार्ड येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेने या महोत्सवाला सुरवात करण्यात आली होती. तर २ फेब्रुवारी पासून भिवापूर येथील माता नगर येथे कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात परभणी, वासीम, लातूर यासह राज्याबाहेरील दिल्लीच्या दोन महिला संघाने सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत ४० संघ सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामूख्याने उपस्थिती होती.

     

     

    यावेळी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघाने बाजी मारली तर पुरुष खुल्या गटात विठ्ठल मंदिर क्रिडा मंडळ, चंद्रपूरचा संघ विजयी झाला. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, एक उत्तम आयोजन येथे करण्यात आले. यात दिल्लीच्या संघाने सहभाग घेतला हेच श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे यश आहे. या महोत्सवाला आपण चंद्रपूरची अराध्य दैवत माता महाकालीचे नाव दिले आहे. त्यामुळे आता या महोत्सवाच्या माध्यमातून मातेचा नावाचा जयघोष दिल्लीत पोहचला आहे. या भागाच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. येथील मंडळाने कबड्डी मॅटची मागणी केली आहे. ती मान्य आहे. क्रिडा क्षेत्रासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचा आमचा मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले.

     

    नागरिकांच्या वतीने जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आ. जोरगेवार यांचे स्वागत

    मागील चार वर्षात आमदार किशोर जोरगेवार यांनी भिवापूर प्रभागाच्या विकासासाठी जवळपास सात कोटी रुपयांना निधी दिला आहे. या निधीतून येथे मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सुटल्या आहे. या निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांचे क्रिडा महोत्सवात आगमन होताच जय श्रीराम क्रिडा मंडळ व स्थानिक नागरिकांच्या वतीने चक्क पाच जेसिबी मशीन ने आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ही आभार व्यक्त करत येथे आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.

  • अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

    अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

    News34 chandrapur

    वरोराः जयहिंद क्रिडा मंडळ, वरोरा द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप रविवार दि. 21/01/2024 रोजी कॉटन मार्केट वरोरा येथे पार पडला. या स्पर्धेत पुरुष गटात हरियाणा राज्याचा संघ तर महीला गटात मुंबई येथील संघ अव्वल ठरला.

     

    वरोरा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत देशभरातून अनेक संघातून हजेरी लावली होती. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात साई सोनिपत हरीयाणा या संघाने ठाणे महानगरपालिका, ठाणे या संघावर विजय मिळवला. तर मुर्तीजापूर संघाला पुरुष गटात तृतीय पारितोषिक मिळाले.

     

     

    महिला गटात मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाने एमएच स्पोर्टिंग क्लब, पुणे या संघाचा पराभव करुन अव्वल स्थान प्राप्त केले. तर विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. पुरुष गटात विजेत्या ठरलेल्या साई सोनिपत हरियाणा संघाला एक लाख एक्कावन हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या ठरलेल्या ठाणे महानगरपालिका, ठाणे संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच तृतीय पारितोषिक मिळालेल्या मुर्तीजापूर संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

     

    तसेच महिला गटात विजेता ठरलेल्या मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच उपविजेत्या ठरलेल्या एमएच स्पोर्टींग क्लब, पुणे संघाला एक्काहत्तर हजार रुपये रोख व चषक तसेच तृतीय विजेत्या ठरलेल्या विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत चेतन साहू हरियाणा याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून बुलेट गाडी देण्यात आली.

     

     

    तर उत्कृष्ट चढाई बिल्ला(मुर्तीजापूर), उत्कृष्ट जंपर म्हणून आवेद पठाण (ठाणे), उत्कृष्ट पकड म्हणून ढोलू (हरियाणा) यांना वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली. महिला गटात संजना भोई हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून इलेक्ट्रीक स्कुटर देऊन सन्मानीत करण्यात आले. तर पुजा पाटील हिला उत्कृष्ट चढाई, वैष्णवी मेश्राम हिला उत्कृष्ट जंपर तर राखी घानोडे हिला उत्कृष्ट पकड म्हणून सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

     

    यावेळी मंचावर आमदार चषकाच्या आयोजिका आमदार प्रतिभाताई धानोरकर या सोबत आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला कॉग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे, चित्राताई डांगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, विलास टिपले, प्रशांत काळे, मिलिंद भोयर, सुरज गावंडे, प्रशांत भारती, शाकीर मलक, रमजान अली, मदिन कुरेशी, राजू चिकटे, प्रमोद मगरे, बसंत सिंह, मनोज चिंचोलकर यासह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रविण काकडे, सचिव कासीफ खान व त्यांच्या चमून अथक परिश्रम घेतले.