Tag: ओला दुष्काळ

  • Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – शिवसेना उबाठा गटाची मागणी

    Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – शिवसेना उबाठा गटाची मागणी

    Heavy Rain चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरु आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गावर आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रहाची मागणी शिवसेना ( उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

    अवश्य वाचा : भर पावसात शिवसेनेचा रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    Heavy rain चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे.निसर्गाच्या जलचक्रावर जिल्ह्यातील शेत हंगाम अवलंबून आहे.मात्र अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.पिकांचे झालेले नुकसान बघून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहे.नदी व नाल्याचे पाणी शेतात साचल्याने शेतपिक हातातून गेले आहे. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटामुळे बळीराजा पूर्णतः खचला आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरातील हा मार्ग पुरामुळे वाहतुकीकरिता बंद

    त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व तत्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा तसेच सर्व पिकांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना ( उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    आरक्षणाचा तिढा सोडवा,खासदार प्रतिभा धानोरकर यांची राष्ट्रपती मुर्मु सोबत भेट

    यासोबतच २०२३ – २०२४ वर्षातील पीक नुकसानीचे रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी,तसेच सरकारच्या घोषणेनुसार कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपयाची रक्कम जमा करून बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,ज्येष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडू डाखरे,विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शहर संघटक तथा माजी नगरसेवक किशोर टिपले,युवासेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव,ज्येष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे, गजू पंधरे,उपशहर प्रमुख मनीष दोहतरे,महेश जिवतोडे, पंकज खापणे,गजानन टोंगे , महादेव विधाते, रूपेश मोडक आदी उपस्थित होते.

  • Ola dushkal : चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – दिनेश चोखारे

    Ola dushkal : चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – दिनेश चोखारे

    Ola Dushkal अतिवृष्टीमुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतमाल पाण्याखाली आले तर शेतकऱ्यांचे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले तर काही पिक माती खाली दबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    अवश्य वाचा : कार पाण्यात वाहत असताना युवकांनी घेतली उडी, बघा चंद्रपूरात असं काय घडलं?

    Ola dushkal सोबत वरोरा व भद्रावती तालुक्यासह संपूर्ण जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पण केली आहे.
    त्यात त्यांनी म्हटले आहे कि,  मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीतुन येथील शेतकरी,शेतमजूर सावरत नाही तोच बँकेकडुन पिक कर्ज काढून तसेच हात उसणवारी रक्कम घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी,रोवणी केली होती.
    मात्र जुलै महिण्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस होत असुनधरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले फुगले आहेत. अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शेतात घुसुन साचुन राहिल्याने उभे धान पिक सडले.

    अवश्य वाचा : राज्यातील आरक्षणाचा तिढा सुटणार? खासदार धानोरकर यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मु यांची भेट


    त्यामुळे शेतकरी पुरते अडचणीत आले असून अतिवृष्टीमुळे जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहुन  वरोरा व भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ भरीव मदत देण्यासह मागील वर्षी अतिवृष्टी, नदीला आलेला पुर व त्यानंतर झालेला रोगाचा प्रादुर्भाव,या संदर्भात करण्यात आलेल्या मोका चौकशीच्या आधारे थकीत नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
    याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.