Tag: ओबीसी वसतिगृह

  • Obc Hostel : ओबीसी वस्तीगृहांना डॉ.पंजाबराव देशमुख यांचं नाव

    Obc Hostel : ओबीसी वस्तीगृहांना डॉ.पंजाबराव देशमुख यांचं नाव

    obc hostel महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वस्तगृहांना डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे-राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी

    Obc hostel दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी ५-००वाजता , देवगिरी वर झालेल्या, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ स्तरीय बैठकीत झालेल्या चर्चेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी , राज्यातील ओबीसी वस्तगृहांना भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याचे अभिवचन दिले.


    या बैठकीत प्रश्नांची सुरुवात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्याचे २९सप्टे.२३च्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्याच मुद्दाला धरुन सुरुवात केली. तसेच केंद्र सरकारने ५०%ची अट शिथिल करण्यसंबधाने राज्य सरकारचे धोरण काय या बाबतीत पाठपुरावा करीत आहोत. शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी ८लाख रु ची अट, तसेच नॉनक्रीमीलेअरची अट या दोन्ही अटी ऐवजी फक्त नानक्रीमीलेअरची अट तेवढी ठेवण्यात यावी यावर अर्थमंत्रालयाकडुन अहवाल आल्यानंतर फक्त एकच अट ठेवण्यात येईल असे सांगितले. या शिवाय ओबीसी वसतीगृहाच्या बाबत जो वेळकाढूपणा सुरू आहे त्यावर लवकर कार्यवाही करण्यात यावी, विद्यार्थी वर्गाच्या भावना तीव्र झाल्या आहेत असे सचिन राजूरकर ह्यांनी सांगितले.

    Obc hostel तसेच ज्या अधिकार्यांचे निलंबन केले आहे त्यांना पुर्वव्रत कामावर रुजू करण्यात यावे ही सुध्दा मागणी लावून धरली. महात्मा फुल्यांचे समग्र साहित्य ५०रु मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, मुलांना सुध्दा १००% शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेऊन जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याची संख्या ७५वरुन १००करण्यात यावी खाजगी कंत्राटी पद्धतीने भरती बंद करून स्पर्धा परीक्षा घेऊन कायम स्वरुपी भर्ती करण्यात यावी. या शिवाय ओबीसींच्या अनेक समस्यांना हात घालून त्या लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे असे सर्वांनी सांगितले.

    या बैठकीत महासंघाचे महासचिव सचीन राजुरकर, समन्वयक डॉ अशोक जिवतोडे,सहसचिव शरद वानखेडे, महिला अध्यक्षा सुषमा भड, कार्याध्यक्षा डॉ शरयु तायवाडे, अँड रेखाताई बारहाते, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, चंद्रपूर येथुन दिनेश चोखारे, प्रा. कुकडे,, अमरावती प्रकाश साबळे, अध्यक्ष कीसान महासंघ,, बुलढाणा विजय ढवंगे,बेलोकार, गोंदिया बबलू कटरे, परमेश्वर राऊत, शकील पटेल, राजु चौधरी, विजय पिदूरकर उमेश शिजनगुडे, संजय मत्ते, सुरेश भांडेकर, दादाजी चुधरी शशिकांत वैद्य, विष्णू इतनकर, डॉ राजेश्वर उकारे अरविंद इंगोले, प्रवीण तायडे, सविता भेदरकर, प्रवीण वानखेडे, गणेश आवारी, दीनदयाळ दमाये, डॉ रामलाल गहाने इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, अकोला,भंडारा, गडचिरोली, वर्धा, येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे व इतर ओबीसी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.बैठक यशस्वीपणे पार पडली,पुढील बैठक मुंबई येथे घेण्याचे सांगण्यात आले.

  • obc hostel : चंद्रपुरात ओबीसी वसतिगृह सुरू होणार

    obc hostel : चंद्रपुरात ओबीसी वसतिगृह सुरू होणार

    obc hostel चंद्रपूर येथील ओबीसी, एन. टी. ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह उर्वरित कामे पूर्ण करून दि. १७ ऑगस्ट पासून सुरू करून तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीची तत्काळ सोडवणूक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    महत्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना

    Obc hostel मंत्रालयातील परिषद सभागृहात ओबीसी, एन. टी. ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागाच्या प्रधान सचिव  विनिता वेद सिंगल, विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ओबीसी सेवा संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल  डहाके, देवा माधव पाचभाई, गोमती  पाचभाई यांच्यासह अन्य प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

    मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर त्यासाठीचे सुयोग्य वातावरण मिळावे,  याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था चांगली असली पाहिजे. त्यामुळे तत्काळ वसतिगृहातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याठिकाणी विद्यार्थी प्रवेश सुरु करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

    वसतिगृह प्रवेशासाठी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन नाही. याबाबत विभागाच्या वतीने स्पष्ट कल्पना जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत विभागाने पोहोचवावी. विद्यार्थ्यांना याबाबत अडचण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

    यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी, एन. टी. ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना सुरू करावी, ओबीसी विद्यार्थिनी प्रमाणे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात १०० टक्के सवलत मिळावी, विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    अनुसूचित जातीसाठी असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा कमी करण्यात आलेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम विभागाने तत्काळ दूर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. या मुद्द्यांसह  ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सर्वच योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने जाहिराती व सोशल मिडियाच्या माध्यमातून मोहिम राबवावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

    यावेळी, मंत्री श्री. सावे म्हणाले की, चंद्रपूर येथील वसतिगृहात फर्निचर सह सर्व सुविधा उपलब्ध करून १७ ऑगस्ट पूर्वी ते सुसज्ज  केले जाईल. याशिवाय, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहातही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

    प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी, विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने जे धोरणात्मक निर्णय आहेत, ते उच्च स्तर समिती आणि मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेतली जाईल, असे सांगितले.