Tag: उदघाटन समारंभ

  • Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागाच्या जिल्हा औषधी भांडार नवीन इमारतीचे तसेच तडाली (ता. चंद्रपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचा-यांच्या नवीन वसाहतीचे लोकार्पण रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission

     

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. national health mission

     

    दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पाच एम्सचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. healthcare infrastructure

     

    यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान व प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अभियानांतर्गत विविध कामांचे डीजीटल पध्दतीने लोकार्पण व भुमिपूजन करण्यात येणार आहे. medical services

     

    या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा औषध भांडार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारत जवळ, चंद्रपूर तसेच तडाली येथील अधिकारी कर्मचारी नवीन वसाहतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. inauguration ceremony

  • सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    भद्रावती – देशात जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसाशी तोडण्याचे काम सुरू आहे. अशातच एक ग्रामीण कलावंत आपल्या महाराष्ट्राची परंपरेचा सांस्कृतिक व सामाजिक वारसा जोपासत टाकळी ता. भद्रावती सारख्या छोट्याश्या गावात पुरोगामी विचारांचे प्रेरणादायी कलावंत निर्मना हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रिय कल्चरल सेंटर उभारत आहे ही वाख्यानेजोगी बाब असून यातून निश्चितच देशातील युवांना देश सेवेची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते भद्रावती तालुक्यातील टाकळी येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

     

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळा प्रसंगी प्रामुख्याने मंचावर उद्घाटक म्हणून वरोरा विधानसभा क्षेत्र आमदार प्रतिभा धानोरकर, सांस्कृतिक मंत्रालय चेयरमन डॉ विनोद इंदुलकर, डॉ निळकंठ कुरसंगे, बापुदास गजभारे, कुशल मेश्राम, डॉ इसादास भडके, इंजि. भास्कर चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खणके, भीम आर्मी महासचिव शंकर मुन, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपूरे, चंद्रपूरच्या माजी महापौर संगीता अमृतकर, गोपाल अमृतकर, टाकळी येथील सरपंच संगीता देहारकर, माजी सरपंच नत्थु पाटील आसेकर, पोलिस पाटील शितल दूरन्गकर उपस्थित होते.

     

    यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधले असून मोजक्या व्यापाऱ्यांच्या नफेखोरीसाठी गोरगरिब जनतेची दिशाभूल करत लूट केली जात आहे. आज देश गुलामगिरीच्या वाटेवर जात आहे.

     

    अश्यातच महाराष्ट्राच्या पुरोगमी विचारांचा प्रसार व प्रचार फार महत्त्वाचा असून गांधी विचारधारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच देशाला तारू शकतात. ही सर्व कल्पना लक्षात घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील एका बोरगाव सारख्या छोट्याश्या गावातून आपल्या कला कौशल्याने नाट्य क्षेत्रात ठसा उमटविनाऱ्या अनिरुद्ध वणकर यांनी जे काम हाती घेतले ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत राहो अशा शुभेच्छा देत त्यांना वेळोवेळी लागणारी मदत आपण करणार असून हे केंद्र भविष्यात नावलौकिकास येईल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी विर योद्धा बिरसा मुंडा या प्रेरणादायी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. सोबतच काही प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात गौरविण्यात आले.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेश्राम प्रास्ताविक अनिरुद्ध वणकर तर आभार प्रवीण भसारकर यांनी मानले.

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर गॅझेटिअरचे प्रकाशन

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर गॅझेटिअरचे प्रकाशन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून प्रथमच मराठीत तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा गॅझेटिअरचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित झाले आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना ठेवण्यात आले होते. बल्लारपूर येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

     

    चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकिंग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्यात आल्याचे गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी सांगितले.

     

     ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे प्रकाशन : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेनिमित्त देशभरातून येणा-या खेळाडूंना चंद्रपुरचे वैभव, सांस्कृतिक वारसा व इतिहास तसेच प्रेक्षणीय स्थळांची माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेनुसार ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ ही हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिका खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचेही प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात करण्यात आले.