Tag: आरोग्य शिबीर

  • Chandrapur Health Camp : येणाऱ्या काळात आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur Health Camp : येणाऱ्या काळात आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन चंद्रपुरातील सिटी शाळेत 28 जानेवारीला करण्यात आले आहे.या शिबिराचे सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. Health camp chandrapur

     

    यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचेसह भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार होते.

     

     

    महाआरोग्य शिबिरात सकाळी 9 वाजतापासून विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांनी आपली नोंदणी केली, त्यानंतर नागरिकांची आरोग्य तपासणी सावंगी मेघे मधून आलेल्या तज्ञ डॉक्टरांनी केली. Savangi meghe

     

    कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्य ही सेवा म्हणून करण्याचा आम्ही संकल्प केला आहे, काही महिन्यात चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयाची इमारतिमध्ये आपल्याला चांगला उपचार मिळेल अशी व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे.

     

    आपल्या शरीरात विविध आजार घर करू लागले आहे, कारण आपण आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहे, आईच्या हातचं जेवण सोडत आपण ऑनलाइन हॉटेलमधील जेवण करायला लागलो आहे, त्यामुळे विविध आजाराला सुद्धा आपण यासोबत आमंत्रण देत आहोत, सध्या कॅन्सर चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे, मात्र आपण यावर उपचार करणे शक्य होईल यासाठी आपन किमोथेरपी ची मोफत व्यवस्था केली आहे.

     

     

    आयोजित महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला.

  • अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

    अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

    News34 chandrapur

    कोरपना – 23-24 नोव्हेंबर 2023 रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड , युनिट – माणिकगढ सिमेंट वर्क्स तर्फे नंदाप्पा आणि मरकागोंडी ग्रामपंचायत मधील नंदाप्पा, मरकागोंडी, माताडी आणि गोंडगुडा गावात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 270 पुरुष, महिला आणि लहान मुलांची तपासणी करीत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.

     

    विविध आरोग्य विकार तपासले गेले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माणिकगड तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड युनिट हॉस्पिटलच्या प्रभारी डॉ.सौ.रुपाली यादव व त्यांच्या संघाने शिबीर यशस्वी केले. यासोबतच चंद्रपूर येथील टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉ. सूरज, डॉ. ट्विंकल आणि त्यांच्या संपूर्ण संघाने कर्करोग, रक्तदाब आदी आजारांवर निदान केले.

     

    रोगांचे निदान करून ग्रामस्थांना सल्ला देण्यात आला. शिबिरादरम्यान सर्व ग्रामस्थांची विविध प्रकारे चाचणी करण्यात आली तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करून त्यांना योग्य ते समुपदेशनही करण्यात आले. विविध सहाय्यक कर्मचारी आणि माणिकगढच्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी केल्यानंतर औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आणि पुढील उपचार आवश्यक असलेल्या आजारांसाठी रुग्णांना योग्य सल्लाही देण्यात आला.

     

     

    या मोफत वैद्यकीय शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ.रुपाली यादव यांनीही महिलांमध्ये निरोगी शरीर आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व याविषयी ग्रामस्थांचे ज्ञान वाढवले. या कार्यक्रमात पंचायतीचे नागरिक, आघाडीच्या कार्यकरत्यांनी सहभाग घेतला तरया शिबिराला यशस्वी करण्याकरिता माणिकगड सी. एस.आर. च्या संघाने अथक प्रयास केलेत.