Tag: आदिवासी समाज

  • Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य सरकारने धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ओसाड पाड्याचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या पवारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 20 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Forest conservation

     

    कोण आहे चैतराम पवार? जाणून घ्या chaitram pawar

     

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनवासी चैत्राम पवार यांनी 1992 पूर्वीच्या उजाड आणि ओसाड असलेल्या मालरण प्रदेशात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अढळ आशावाद आणि गावातील आदिवासी बांधवांच्या पाठिंब्याने पवारांनी समृद्ध गाव निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला. बारीपाडाच्या यशाने जगभरातील तज्ञांचे लक्ष वेधून घेतले, 78 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ते दुसरे स्थान मिळवले. शिवाय, बारीपाडा प्रकल्पाला IFAD या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मान्यता मिळाली. Maharashtra vanbhushan award

     

    चैत्राम पवार यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये आपला प्रयत्न वाढवला आहे. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागात वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आहेत. Baripada

     

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या वनविभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल चैत्राम पवार यांचे कौतुक केले. राखीव वनक्षेत्र आणि परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन, पर्यावरण विषयक उपक्रमात पवारांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. 3 मार्च रोजी चंद्रपूर येथील ताडोबा महोत्सवात हा पुरस्कार सोहळा होणार असून त्यात चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Chandrapur tadoba festival

     

    ही मान्यता पवारांच्या समर्पणाचा आणि बारीपाड्याला समृद्ध समाजात रूपांतरित करण्यासाठी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचा दाखला आहे. चैत्राम पवार यांचा प्रवास ही एक प्रेरणादायी यशोगाथा आहे जी श्रमशक्ती आणि लोकांच्या अदम्य भावनेचे दर्शन घडवते. पर्यावरण आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना पहिला वनभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करताना महाराष्ट्राला अभिमान वाटतो. Tribal community

  • आदिवासी बांधवांनी केला पालकमंत्री मुनगंटीवार यांचा सत्कार

    आदिवासी बांधवांनी केला पालकमंत्री मुनगंटीवार यांचा सत्कार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आदिवासी समाजातील शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या गरीब बांधवांसाठी शबरी घरकूल योजना मंजूर करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे आदिवासी बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

     

    ना. श्री. मुनगंटीवार यांनी घरकूल योजना मंजूर करून घेतली. या योजनेचा लाभ आता शहरी भागात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो आदिवासी बांधवांना घेता येणार आहे. शबरी घरकूलची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातून ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. आता त्याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे, असे विचारही आदिवासी समाजातील मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

     

    आदिवासी समाजातील विविध संघटना तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष धनराज पुनम कोवे यांच्यावतीने ना. श्री. मुनगंटीवार यांचा आदिवासी पारंपरिक वाद्य ढोलताशाच्या गजरात पुष्पहार, पिवळा शेला घालत सत्कार करण्यात आला.  यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रपूरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित या  कार्यक्रमात मा. ना. मुनगंटीवार यांचा गौरव करण्यात आला.

     

    यावेळी बोलताना मा. ना. मुनगंटीवार म्हणाले, आपण सदैव आदिवासी  समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो. आदिवासी समाजाच्या सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी नेहमी नावीन्यपूर्ण योजना अमलात आणल्या. आदिवासी महिलांना रोजगार मिळावा यासाठी अगरबत्ती प्रकल्प आपण जिल्ह्यात आणला. विर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पुढाकार घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्टवर पाठविण्यासाठी आपण पुढाकार घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशातही शिक्षणासाठी मदत मिळवून दिली. आदिवासी युवकांना रोजगाराभिमुख कार्यक्रमही राबविले.

     

    मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात होत असलेले विकासकामे यावर प्रभावित होऊन शेकडो आदिवासी बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा देऊन मा. ना. मुनगंटीवार यांनी स्वागत केले. पक्ष प्रवेशासाठी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे, माजी महिला बालकल्याण सभापती चंद्रकलाताई सोयाम, अनुसूचित जमाती मोर्चा महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. धनराज कोवे, अनिल सुरपाम यांनी पुढाकार घेतला.

     

    यावेळी माणिक सोयाम, शालिकराव उईके, सोमाजी कातलाम, गोपाळ मसराम, भारत सोयाम, रामू मेश्राम, सुनील तलांडे, बाबाराव मंगाम, केशव कुभरे, राजू कुमरे, मुकेश सुरपाम, किसन मंगाम, मधुकर गावंडे, शंकर सोयाम, इंदिरा चौधरी, यशोदा आत्राम, आशा आत्राम, सुनंदा उईके, वर्षा आतराम, शोभा मडावी, सरीता शिडाम आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा महामंत्री ब्रीजभूषण पाझारे, रामपाल सिंह, रुद्रनारायण तिवारी, बंडू गौरकार, रवी लोणकर, दिनकर सोमालकर, विठ्ठल डुकरे, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, अरविंद मडावी, शुभम गेडाम, यशवंत शिडाम, किशोर आत्राम, गीता गेडाम, मायाताई उईके, ज्योती गेडाम, शीतल आत्राम, तृष्णा गेडाम, जयश्री आत्राम, लिनाताई कुसराम, तानेबाई मेश्राम, मोनिका मडावी, सीमा मडावी, अनिता पुसाम, प्रवीण गेडाम, खेमराज कोडापे आदी उपस्थित होते.

  • चंद्रपुरात रावण दहनाला विरोध

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आदिवासी समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतरही रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉट येथे रावणदहन पार पडले. तब्बल दहा ते अकरा तास पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आदिवासी बांधव महिला पुरूषांना पोलिसांनी रात्री सोडले. पोलिस स्टेशन पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत पैदल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.
    मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरात बहादे प्लॉटमध्ये विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. याकरीता रावणाची प्रतिकात्मक प्रतिमा सकाळी तयार करण्यात येत होती.

    घुग्घूस शहरातील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी येऊन रावण दहनास प्रचंड विरोध केला. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत आहेत. त्यांचे दहन करण्यता येत असल्याने आदिवासी समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावणदहन करू नये अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली. तसेच शासन, प्रशासन, नगर परिषद, पोलिस स्टेशन व मंत्री महोदयांना निवेदन देऊन रावणदहनला परवानगी देण्यात येवू नये अशी मगाणी करण्यात आली होती. सकाळी आदिवासी बांधवांनी रावणदहनाला विरोध करीत घुग्गुस शहरात निषेध मोर्चा काढला. दिवसभरतणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये याकरीता घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी येऊन शंभरावर आदिवासी बांधव, मुलामुलींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यांची भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यातच आली होती. शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून चोख पोलिस बंदोस्त ठेवला होता.

     

    आदिवासी बांधवांच्या विरोधानंतर घुग्घूस येथील रावणदहन होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिवसभर आदिवासी बांधव पोलिस ठाण्यात स्थानबध्द असल्याने रावणदहन विरोधाचे वातावरण शांत झाले होते. त्यामुळे सायंकाळी रावणदहनाची बहादे प्लॉटवर तयारी करण्यात आली. बहादे प्लॉटवर रावणाची प्रतिमा उभी करण्यात आली. सायंकाळ पासून त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. पोलिस बंदोबस्तात रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉटवर उभारण्यात आलेल्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. दिवसभर पोलिस ठाण्यात ठेवलेलया शंभरावर आदिवासी महिला पुरूषांना रात्री सोडण्यात आले.

     

    महिलांना आठच्या तर नऊच्या सुमारास पुरूषांना सोडण्यात आले. त्यांची दिवसभरात भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. आदिवासी बांधवांना दहा ते अकरातासांनी रात्री सोडल्यानंतर पोलिस स्टेशनपासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत त्यांनी पैदल मार्च काढला. या ठिकाणी एका छोटेखानी सभेची आयोजन करून शासन प्रशासन यांच्या विषयी संताप व्यक्त करीत रावणदहनाच्या घटनेचा निषेध केला.

    यावेळी आदिवासी बांधवांनी, रावणदहन होऊ नये तसेच ही प्रथा बंद व्हावी याकरीता आदिवासी बांधवांनी शासन प्रशासन नगर पालिका, पोलिस स्टेशन तसेच घुग्घूस दशहरा उत्सव समितीला लेखी निवेदन देऊन रावणदहन करू नये तसेच प्रशसान परवागनी देऊ नये अशी मागणी केली होती.

     

    रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. गावात तंटे भांडण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रावणदहनाला परवानगी देऊ नये ही आमची मागणी आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शांतता व सुव्यवस्था ठेवण्याकरीता आम्हाला दिवभर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यामध्ये लहानमुलेही होती. आमच्या विरोधानंतरही झालेल्या रावणदहन घटनेचा निषेध व्यक्त करीत रावणदहन प्रथा बंद करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी यावेळी केली.