Tag: अपघाताची मालिका

  • चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

    चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ऑक्टोबर पासून सुरू झालेले रस्ते अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून 16 नोव्हेम्बरला वरोरा नाका चौकात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

    जटपुरा प्रभागातील नगीनाबाग येथे राहणारा 27 वर्षीय सोहेल शेख या युवकाचा रस्ते अपघातात नाहक बळी गेला.

     

    गुरुवारी रात्री 10 ते साडेदहा वाजताच्या सुमारास सोहेल हा आपल्या मित्रांसोबत दुचाकी वाहन क्रमांक Mh34 BJ5111 ने घराकडे जात होता, वरोरा नाका चौकापूर्वी असलेले जिम व फास्ट फूड सेंटर समोर ट्रक ला ओव्हरटेक करतेवेळी सोहेल यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक क्रमांक RJ 11 GB 0726 ला धडकला, यामध्ये सोहेल चा मृत्यू झाला, अपघात झाल्यावर अनेकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली मात्र पोलीस 45 मिनिटे उशिरा पोहचली, यावेळी महिला डॉक्टरने सोहेल ला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाचू शकला नाही.

     

    चंद्रपूर शहरात मागील महिन्यापासून सुरू झालेल्या अपघाताच्या मालिकेतील 8 वा बळी होता, या अपघाताला कारणीभूत कोण आहे? यावर उपाययोजना कधी होणार? नागरिकांचे नाहक बळी अजून किती दिवस? प्रशासनाने अपघाताची गंभीर दखल घेत यावर ठोस नियंत्रण करण्याची गरज आहे.

  • चंद्रपुरात पोलिसांच्या वाहनाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाला धडक दिली. यात युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. हा अपघात महानगरातील रहेमतनगर परिसरात घडला. प्रणील प्रमोद चिंचोळकर (२९) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर शहरात आठवडाभरात 7 मृत्यू झाले आहे.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रणील हा दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीजे ७८२० या क्रमांकाच्या दुचाकीने बिनबा गेटकडून सिस्टरकॉलनीकडे येत होता. तर शहर पोलिसांचे वाहन क्रमांक एमएच ३४/६०६६ हे सिस्टरकॉलनीकडून बिनबागेटमार्गे शहर पोलीस ठाण्याकडे जात होते.

     

    रहेमतनगर येथील मस्जिदजवळ समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून प्रणील पुढे जाण्यासाठी निघाला. एवढ्यात समोरून दुसरे वाहन आल्याने प्रणीलने ब्रेक मारले. त्यामुळे गाडी घसरून प्रणील हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या शहर पोलिसांच्या वाहनाच्या मागील चाकात आला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

     

    दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठीगर्दी केली. त्यामुळे या मार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक फाल्गून घोडमारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मृतक प्रणील हा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूर शहरात अपघाताची मालिका सुरुचं, 1 युवक ठार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात धूम स्टाईल दुचाकी वाहन चालविणाऱ्या चालकाचा धुमाकूळ सतत वाढत आहे, याचा परिणाम 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 8 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला, सदर घटनेला 2 दिवस पूर्ण होत नाही तर पुन्हा दुचाकी अपघातात एका युवकांला आपला जीव गमवावा लागला आहे.

     

    22 ऑक्टोबर ला शहरातील दाताला कडे जाणाऱ्या रामसेतू पुलाजवळ दुचाकीस्वार 2 युवक भरधाव वेगात वाहन चालवीत होते, रामसेतू पुलाच्या खाली उतरल्यावर एका वृद्धाला दुचाकीस्वारांनी जोरदार धडक दिली, तो वृद्ध इसम गंभीर जखमी झाला मात्र त्या युवकांमधील एकाला आपला जीव गमवावा लागला.

     

    जिजाऊ लॉन च्या आधी असलेल्या डिव्हायडर ला त्या 2 युवकाची दुचाकी जोरदारपणे आदळली, यामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.

    दोन्ही युवक हे चंद्रपुरातील लहुजी नगर निवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

     

    चंद्रपूर शहरात दुचाकी स्वरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, मात्र यावर नियंत्रण करणारी वाहतूक शाखा जणू अनियंत्रित झाली की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

    19 ऑक्टोबर ला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाच्या आढावा वाढते अपघात कसे कमी करता येणार याकडे लक्ष देण्याची निर्देश दिले होते.

     

    मात्र त्यांनतर सुद्धा शहरात अपघाताची जणू मालिका सुरू झाली असे चित्र निर्माण झाले आहे.

    महामार्गावर होणारे अपघात अनियंत्रित आहे मात्र आता शहरात होणारे अपघात गंभीर समस्या बनली आहे.

     

    विशेष म्हणजे चंद्रपूर वाहतूक शाखेत 2 पोलीस निरीक्षक आहे, त्यानंतरही सुद्धा शहरात दुचाकी स्वारांचा धुमाकूळ सुरूचं आहे, आता तरी वाहतूक शाखेने यावर तात्काळ तोडगा काढत अश्या अनियंत्रित दुचाकीस्वारांवर नियंत्रण घालावे अन्यथा भविष्यात शहरातील अपघात पोलिसांसमोर आव्हान उभं करतील हे निश्चितचं.