Tag: अनुराग ठाकूर

  • Anurag Thakur : भाजप खासदार अनुराग ठाकूर विरोधात कांग्रेस आक्रमक

    Anurag Thakur : भाजप खासदार अनुराग ठाकूर विरोधात कांग्रेस आक्रमक

    Anurag thakur गुरू गुरनुले मुल – लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी विचारधारेतुन आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी मा. खा. राहुलजी गांधीं यांना जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खा. अनुराग ठाकुरच्या निषेधार्थ मुल तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात गांधी चौक मुल येथे व कांग्रेस कमिटी कार्यालयात आज दिनांक २ आगष्ट २०२४ रोजी नारेबाजी करुन तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

    अवश्य वाचा : गुन्हेगारीवर पोलिसांचा प्रहार, चंद्रपूर पोलिसांनी 6 जणांना केले तडीपार

    Anurag thakur याप्रसंगी सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार सनिती सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले , जिल्हा कांग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर, संचालक किशोर घडसे, अखिल गांगरेडीवार, हसन वाढई, बंडूभाऊ गुरनुले, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, सचिव संदीप मोहबे, संदीप म्हस्के, आशिष गेडाम, महिला तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे,उपाध्यक्ष समता बनसोड, सहसचिव सीमा भसारकर, नाजुका लाटकर, युवक काँग्रेसचे आकाश दहिवले, विश्र्नु सादमवार, आकाश रोहन,संघर्ष उमरे, ईश्वर टिकले,निखिल चीचघरे, उमेश चलाख, राजू गावतुरे, निखिल पांडव, संदीप, मनोज दवणपल्लीवार, यांचेसह तालुका शहर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    काय म्हणाले राहुल गांधी?

    कुणाची किती हिस्सेदारी आहे हे सर्वांना कळायला हवं यासाठी जातिगत जनगणना होणे आवश्यक आहे, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी विनंती राहुल गांधी यांनी संसदेत केली, मात्र त्यांच्या प्रश्नावर भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी जीसकी जात का पता नही असे जनगणना करणी है असे वादग्रस्त विधान केले.

  • Congress : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेवर कांग्रेसने केला जोड्यांचा मारा

    Congress : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेवर कांग्रेसने केला जोड्यांचा मारा

    Congress लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काॅंग्रेस नेते, खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतुन आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकुरनी मा.खा. राहुलजी गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खा. अनुराग ठाकुरच्या निषेधार्थ ब्रम्हपूरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मा.शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले. 

    महत्त्वाचे : पत्रकाराचा मुलगा साता समुद्रापार चमकला

    Congress यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाईफेक करून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. व भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

    बघा जोडे मारो आंदोलनाचा व्हिडीओ

    याप्रसंगी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक नितीन उराडे, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅग्रेस सचिव मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी जि.प.सदस्या स्मिता पारधी, बाजार समिती उपसभापती सुनीता तिडके यांसह तालुका/शहर काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल , सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यासहित राज्यात सुद्धा अनुराग ठाकूर विरोधात कांग्रेस रस्त्यावर उतरले आहे.