Tag: अनियंत्रित वाहतूक

  • Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोठारी- गोंडपिपरी मार्गावरील आक्सापुर येथील हनुमान मंदिर जवळ हायवा ट्रकने दोन दुचाकींना सामोरा-समोर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. Big accident in chandrapur

     

     

    रविवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकी क्रमांक Mh34AG 3224 व MH33 K6739 धारक मुलचेरा गडचिरोली येथून चंद्रपूर कडे येत होते, त्याचं वेळी चंद्रपूर वरून हायवा ट्रक क्रमांक Mh40 CM 3233 हा चंद्रपूर वरून सुरजागड येथे अतिवेगाने जात होता, हनुमान मंदिर आकसापूर येथे हायवा ट्रक ने दोन्ही दुचाकी धारकांना जबर धडक देत तब्बल 100 मीटर फरफटत नेले. Surjagad company

     

    हा अपघात इतका भयावह होता की एका दुचाकी धारकांचे धड अलग झाले, यामध्ये अमृत सुनील सरकार वय (32) वर्ष रा. कालीनगर मुलचेरा, शैलेंद्र कालिदास रॉय (63) विजयनगर मुलचेरा, मनोज निर्मल सरदार (43) कालीनगर मुलचेरा मृतकाचे नाव असून ट्रकचालकाने अपघात केल्यावर घटनास्थळावरून पसार झाला.

     

     

    विशेष म्हणजे सुरजागड कंपनी सुरू झाल्यापासून आजपर्यंत गोंडपीपरी तालुक्यात असंख्य अपघात झाले आहे, यामध्ये अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला, सुरजागड येथून वाहतूक करणाऱ्या जड वाहनाच्या वेगावर कुणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे गोंडपीपरी येथील नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

     

     

    सदर अपघाताचा तपास कोठारी पोलीस निरीक्षक राजकीरण मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्रीनिवास जाधव, राजूरकर, टेम्भुर्णे व उपरे करीत आहे.

  • चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

    चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 2 महिन्यापासून चंद्रपूर शहरात होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे, या कालावधीत तब्बल 12 जणांनी आपला जीव गमावला, या अपघातांची असंख्य कारणे आहे, मात्र शहरातील वेगात वाढणारे अतिक्रमण सुद्धा या अपघाताला तितकेच जबाबदार आहे.

     

     

    यावर चंद्रपूर जिल्हा युवासेनेने गंभीर दखल घेत 8 दिवसांच्या आत प्रियदर्शिनी चौक ते ट्रायस्टार हॉटेल चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा वेढा काढण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त, वाहतूक नियंत्रक शाखा व जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.

     

     

    प्रियदर्शिनी चौक ते हॉटेल ट्रायस्टार चौक मधील रस्त्यावर दुचाकी शोरूम धारकांचे रस्त्यावर वाढत असलेले अतिक्रमण व सोबत वरोरा नाका चौकातील फास्टफूड सेंटर व जिम समोर पार्किंग नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक वाहने उभे करीत अपघाताला आमंत्रण देत आहे.

     

     

    प्रशासनाने 8 दिवसाच्या आत सदर अतिक्रमण काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाची झोप उडविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिला आहे.

    यावेळेस युवासेना उपजिल्हाधिकारी रिजवान पठाण शहर अधिकारी,शहाबाज शेख शिवा वजारकर,पराग कूत्तरमारे सुरज रॉय यावेळी यांची उपस्थिती होती

  • चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

    चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 4 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या चंद्रपूर शहरातील अपघाताच्या मालिकेत 12 नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली नाही. त्याचा परिणाम आज पायदळ चालणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला.

     

    सप्टेंबर महिन्यात नागपूर रोडवर शिक्षिकेचा अपघात, त्याचदिवशी सायंकाळी आदर्श पेट्रोल पंप समोर दुचाकी अपघात, बंगाली कॅम्प चौकाआधी ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकाच दिवशी शहरात 3 नागरिक अपघातात ठार झाले होते.

     

    त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाबूपेठ येथे बापलेकाचा मृत्यू, रामसेतू पुलाजवळ 2 युवकांचा मृत्यू, नागपूर रोडवरील विद्या निकेतन शाळेसमोर 2 युवकांचा मृत्यू, नगीनाबाग येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू, नोव्हेम्बर महिन्यात वरोरा नाका चौकात युवकाचा अपघातात मृत्यू तर आज 20 नोव्हेम्बरला पायदळ चालणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

     

    2 महिन्यात तब्बल 12 नागरिकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, महामार्गावर होणारे अपघात आता शहरापर्यंत पोहचले आहे, अपघात होण्याची कारणे News34 ने आधीच प्रकाशित केली होती, त्या वृत्तांनंतर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्टंट करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करीत स्वतःची पाठ थोपटली.

     

    शहरातील मार्गावर वाढणारे अतिक्रमण, अतिवेगात दुचाकी वाहन चालविणारे युवक व अल्पवयीन मुले यांच्यावर परिवहन विभाग व वाहतूक विभागाचे लक्ष नाही, त्यामुळेचं शहर अपघातयुक्त बनले आहे.

     

    20 नोव्हेम्बरला शहरातील रामनगर पोलीस स्टेशन समोरून छत्तीसगड निवासी 32 वर्षीय टिकम पटेल हे पायदळ जात असताना आंध्रप्रदेश डेपो मधील बस क्रमांक AP01Z0084 ही चंद्रपूर बस स्थानक कडे अतिवेगात जात असताना एसटी बस पटेल हा बसच्या मागील चाकात अडकला, या अपघातात पटेल यांचा जागीच मृत्यू झाला.

    रामनगर पोलिसांनी बस चालक 52 वर्षीय स्वामीदास गोदरी ला अटक केली असून पुढील तपास करत आहे.