Tag: स्वाभिमानी शेतकरी संघटना

  • Farmers problem in Chandrapur : सुधीरभाऊ महोत्सव झाले असेल तर इकडे ही लक्ष द्या – सुर्या अडबाले

    Farmers problem in Chandrapur : सुधीरभाऊ महोत्सव झाले असेल तर इकडे ही लक्ष द्या – सुर्या अडबाले

    Farmers problem in Chandrapur चंद्रपूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे, यावर वनविभाग व औष्णिक वीज केंद्राने तात्काळ पाऊले उचलावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे.

     

    चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राला लागून असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावातील शेतकऱ्यांच्या दुधाळू गायीची शिकार होत आहे, आतापर्यंत कमीतकमी 45 गायीची शिकार वाघाने केली, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. Farmers problem in Chandrapur

     

    गावालगत असलेल्या झुडपातून वाघ येत असल्याचे निदर्शनास आले आहे, झुडपे साफ करण्यासाठी वीज केंद्राने निविदा सुद्धा काढली मात्र काम काही सुरू झाले नाही.

    वाचा – चंद्रपुरात 41 पोलिसांना जेवणातून विषबाधा

    वनमंत्री मुनगंटीवार व औष्णिक वीज केंद्राने यावर लक्ष देत शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे. जर शेतकऱ्यांची समस्या निकाली न काढल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा अडबाले यांनी यावेळी दिला. Farmers problem in Chandrapur

  • Agriculture Policy : चंद्रपुरात शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करा – सुर्या अडबाले

    Agriculture Policy : चंद्रपुरात शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करा – सुर्या अडबाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील शेतकरी त्यांच्या कापूस खरेदीच्या हमीभावाच्या प्रश्नाला तोंड देत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांनी हा मुद्दा उपस्थित करून उत्तरे मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या धोरणानुसार जिनिंगधारकांना शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस खरेदी करणे बंधनकारक आहे. Cotton purchases

     

    मात्र, प्रत्यक्षात या धोरणाची चंद्रपुरात प्रभावी अंमलबजावणी होत नाही. परिणामी, हमीभावाने कापूस खरेदी करण्यास इच्छुक असलेले जिनिंगधारक शोधण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे, कारण ते त्यांच्या कापूस उत्पादनाला योग्य किंमत देऊ शकत नाहीत. Gining holder’s

     

    चंद्रपुर तालुक्यातील घुग्गूस येथील रिद्धी-सिद्धी जिनिंग मध्ये कापूस हमीभावाने घेत नसल्याने 14 फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले शेतकऱ्यांसोबत जिनिंग वर धडकले. Swabhimani farmer’s association

     

    सकाळपासून जिनिंग समोर शेतकऱ्यांचे कापसाचे वाहन थांबले होते, याबाबत अडबाले यांनी जिनिंग मालकासोबत चर्चा केली असता ते म्हणाले की आम्हला इतर जिनिंग मध्ये काय रेट आहे त्याबाबत माहिती आली की आम्ही कापूस खरेदी करू.

     

    7 हजार 20 रुपये ही किंमत शासनाने ठरवून दिली आहे मात्र जिनिंग धारक कापूस 6 हजार 500 रुपयांना कापूस खरेदी करीत आहे.

     

    जिनिंग मालक व सुपरवायझर यांना कापूस हमीभावाने का घेत नाही असा प्रश्न अडबाले यांनी यावेळी विचारला असता ते यावर काही बोलायला तयार नव्हते.

    शासनाने कापूस हमीभावाने खरेदी करावा असे धोरण आखले असताना सुद्धा जिनिंग मालक शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करीत आहे, जर असेच सुरू राहीले तर आम्ही भविष्यात आंदोलन उभे करू असा इशारा अडबाले यांनी यावेळी दिली.