Tag: स्थानिक गुन्हे शाखा धाड

  • Nagbhid forest gambling den raid । 🔥 जंगलात सुरू होती “पत्त्यांची सत्ता”, पोलिसांनी केला ‘गेम ओव्हर’!

    Nagbhid forest gambling den raid

    Nagbhid forest gambling den raid : नागभीड – जंगल परिसरात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने १४ जून रोजी धाड मारीत ३ लक्ष ४८ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमाल सहित दोघांना अटक केली.

    नागभीड तालुक्यातील बोन्ड राजोली जंगल परिसरात काही इसम ५२ पत्त्यांचा जुगार खेळत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जंगल परिसरात धाड मारली असता यावेळी दोन मोबाईल, ६ मोटारसायकल, रोख २७ हजार ८०० रुपये असा एकूण ३ लक्ष ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    राजुरा शहरात महिलेची हत्या

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, प्रो. पोउपनि श्रीनाथ गिराम, भूषण पाटील, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, दिनेश अराडे, गजानन मडावी, प्रशांत नागोसे, प्रफुल गारघाटे, शशांक बदामवार व किशोर वाकाटे यांनी केली.