Tag: वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड

  • Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj ahir चंद्रपूरः- वेकोलिच्या विविध क्षेत्राशी निगडीत प्रकल्पग्रस्त शेतकन्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न, समस्यांच्या निवारणार्थ सुनावणी, बैठक व बृहत पत्रव्यवहार व सतत पाठपुराव्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर याना यश मिळाले असून दि. 17 जून 2024 रोजी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील वेकोलि विश्रामगृहात वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक (सीएमडी) व अन्य वरिष्ठांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्वपुर्ण प्रलंबित समस्यांचे निराकरण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली आहे.

    अवश्य वाचा : नीट परीक्षा घोटाळा, चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा मोर्चा

    सदर बैठकीस वेकोलि मुख्यमहाप्रबंधक (भूमि) व (औ.स.) मांजी आमदार सुदर्शन निमकर, विनोद शेरकी, अॅड. इंजी. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, मधुकर नरड, पवन एकरे, माजी सरपंच बंडु रायपुरे, कोलगांवचे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडसकर, लक्ष्मण बोढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    वेकोलि प्रबंधनाने सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पातील नोकरीचे प्रस्ताव या महिनाभरात स्वीकारण्यास अनुमती दिली.

    महत्त्वाचे : 19 जूनपासून चंद्रपुरात पोलीस भरतीचा प्रारंभ, 137 जागेसाठी 22 हजार अर्ज

    Hansraj ahir गोवरी पोवनी प्रकल्पातील आर्थिक मोबदला देयकास अंतिम मंजूरीही जून महिन्यातच देण्याचे मुख्यालयाने मान्य केले. गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन 4 करीता लवकरच प्रस्तावित करण्याचे तसेच भूमि अधिग्रहण प्रकल्पातील ग्रैंड डॉटर (नात) मुलीचा मुलगा/मुलगी व सुनेच्या नोकरीविषयी लवकरच निर्णय होवून अनुकंपा नोकरीत विवाहीत मुलीच्या तसेच मृतक नामनिर्देशीताचा भाऊ, बहीण यांना नोकरी देण्याविषयी मुख्यालयीन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याची माहिती सीएमडी यांनी हंसराज अहीर यांना या बैठकीत दिली.

     

    न्यायालयीन प्रकरणातील प्रलंबित नोकऱ्या मार्गी लावण्यास गुणवत्ता प्राधान्य प्रकरणामध्ये निर्णय घेण्याबाबत ठोस धोरण स्वीकारले जाईल, भूमिगत खाणीतून सुरक्षा प्रहरीकरीता आवेदन केलेल्या कामगारांची कॅडर बदल विषयक सुची प्रकीयाधीन असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही बैठकीत आश्वस्त करण्यात आले.

    Hansraj ahir या व्यतिरिक्त पोवनी, सास्ती, सोनुर्ली गावातील उर्वरीत जमिनीचे अधिग्रहण, सीएमपीडीआयएल द्वारा सव्र्व्हेक्षण करुन तातडीने अंमल करण्याच्या सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी केल्या. यावेळी भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक सातबारा व 2 एकर पेक्षा अधिक तसेच दोन आराजी असल्यास फेरफार प्रक्रियेनंतर 2 नोकऱ्या देण्यास अडचण नसल्याचे ही प्रबंधनाने या बैठकीत स्पष्ट केले. तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात प्रलंबित नोकरी प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्वपुर्ण विषयांवर शिक्कामोर्तब झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.

  • Coal Mine Blasting : चंद्रपुरात नागरिकांच्या घरावर दगडफेक? नागरिक दहशतीत

    Coal Mine Blasting : चंद्रपुरात नागरिकांच्या घरावर दगडफेक? नागरिक दहशतीत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील लालपेठ भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहे. 5 फेब्रुवारीला अचानक नागरिकांच्या घरावर दगडफेक होऊ लागली, अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिक घाबरले, वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घरावर दगड कोसळू लागले होते. Chandrapur coal mine

     

    लालपेठ क्रमांक 4 मध्ये लालपेठ ओपन कास्ट कोळसा खाणीजवळील वस्तीमध्ये रोज होणाऱ्या ब्लास्टिंग ने नागरिकांच्या घराचे नुकसान होत आहे.

     

     

    5 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास झालेल्या ब्लास्टिंग च्या तीव्रतेने चक्क दगड नागरिकांना लागले, या भागातील नागरिक वेकोलीच्या दहशतीखाली आहे. Black gold city

     

     

    5 फेब्रुवारीला ब्लास्टिंग मुळे नागरिक रस्त्यावर उतरले त्यामुळे या भागात वाहतूक करणारे ट्रक च्या रांगा लागल्या होत्या काही काळ या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु वेकोली तर्फे एकही अधिकारी त्याठिकाणी न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप्त व्यक्त केला, भविष्यात पुन्हा अशी घटना झाली तर आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिला.

     

     

    वेकोली प्रत्येकदा आपली बाजू पुढे ठेवत आम्ही ब्लास्टिंग साठी आधुनिक तंत्र वापरतो असे सांगतो मात्र प्रत्यक्षात स्थिती ही वेगळी आहे.

  • अरे भाई कोई एम्बुलेंस को बुलाओ, हॉस्पिटल जाना है

    अरे भाई कोई एम्बुलेंस को बुलाओ, हॉस्पिटल जाना है

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरातील वेकोली क्षेत्रात नुकतीच भटाळी कोळसा खाणीत एक दुर्घटना घडली होती, त्यात एक कामगार जख्मी झाला होता , मात्र त्या जख्मी कामगाराला उपचाराकरीता रुग्णालयात नेण्याकरिता वेळेवर खाणं परिसरात एम्बुलेंस उपलब्ध नव्हती. यावेळी लगतच्या उपक्षेत्रातुन एका एम्बुलेंसला कॉल करण्यात आला परंतु त्या एम्बुलेंस चालकाला मार्गच माहित नसल्याने रुग्णवाहिका चालकाने घाईत लोखंडी पोल च्या मधून वाहन काढण्याचा प्रयत्न केला असता रुग्णवाहिका पोल मध्ये फसली.

    त्यांनतर काही वेळाने दुसऱ्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले ,आणि शेवटी त्या जख्मी कामगाराला शहरातील एका खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.

     

    मिळालेल्या माहिती नुसार वेकोली चंद्रपुर क्षेत्रात चालणाऱ्या काही रुग्नवाहिका येथील काही डॉक्टर आणि संबंधित विभागाचे लोक खाजगी कामा साठी वापर करतात, त्यामुळे वेळेवर रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही आणि जर कधी अशी एखादी मोठी दुर्घटना झाली आणि रुग्ण वाहिका उपलब्ध नसेल तर त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे या समस्येकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.

  • चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

    चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात विविध उद्योगांचे जाळे पसरले आहे, मात्र अनेक उद्योगात स्थानिक कामगार नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे.

     

    वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी येथे ओव्हरबर्डन काढण्याच्या कामाचं कंत्राट दक्षिण भारतातील कावेरी कंपनीला मिळाले आहे, मात्र या कंपनीने बाहेरून कामगार आणल्याने स्थानिक कामगारांना काम देण्यास कावेरी प्रबंधन टाळाटाळ करीत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कंपनी प्रशासनाला स्थानिक कामगारांना कामावर घ्या असे सुचविले मात्र त्यांच्या या मागणीवर कंपनीने दुर्लक्ष केले.

     

    कावेरी कंपनीच्या विरोधात 11 डिसेंबर 2023 ला कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेना आंदोलन करणार आहे.

    परप्रांतीय कामगारांना कावेरी कंपनीने कामावर घेतले, मात्र त्यांचं कसल्याही प्रकारचे पोलीस व्हेरिफिकेशन, कामगारांची नोंदणी, उत्खनन साठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्यात आली नसून ते बेकायदेशीर पणे वेकोलीच्या क्षेत्रात चालत आहे.

     

    या सर्व बेकायदेशीर कृत्याचा विरोध व स्थानिक कामगारांवर अन्याय करणाऱ्या कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून 11 डिसेंबर ला कंपनी प्रबंधन विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, आंदोलनाबाबत संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली आहे.

     

    सदर आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या आंदोलनात शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.