Tag: भाजप

  • Telecommunications : नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

    Telecommunications : नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

    Telecommunications गुरू गुरनुले मुल – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुलं नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली.

    अवश्य वाचा : पाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक, ताबा सुटला अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले गढूळ पाणी

    Telecommunications नंदकिशोर रणदिवे हे मुलं तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मुलं नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणुनही कामकाज बघितले आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा दुरसंचार विभागातील अडचणी आणि दुरसंचार विभागाच्या ग्राहकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडण्यासाठी त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा हया उद्देशाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारीं सोपवीण्यात आली.

    त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष नाम. हंसराज अहिर यांना दिलें आहे. नंदकिशोर रणदिवे यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन त्याचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. रणदिवे हे मागील अनेक वर्षांपासून भाजप पक्षात सक्रियपणे काम करीत आहे, त्यांची कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा बघता त्यांना त्या कामाचे फळ मिळाले आहे.

    नंदकिशोर रणदिवे हे नाव मूल तालुक्यातील सर्वांना परिचित असलेले नाव आहे, राजकारण असो की समाजकारण यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो, रणदिवे हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम बघतात, त्यांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे.  त्यांच्या नियुक्तीमुळे मूल तालुक्यातील भाजप पदाधिकारी सदस्यांनी त्यांचा अभिनंदन मारीत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

    दुरसंचार विभागातील नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी मला थेट संपर्क करावा असे आवाहन रणदिवे यांनी केले आहे.

  • 4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

    4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

    News34 chandrapur

    मुंबई : देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यामुळे पुन्हा एकदा यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालंय.

     

    मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलाय. या राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी प्रचारप्रमुख म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मागणी येत असल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत फडणवीस यांच्या 3 राज्यांमध्ये 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत. त्यामुळे देशातल्या भाजपच्या आश्वासक नेत्यांपैकी एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    कुठे झाल्या सभा?

    मध्यप्रदेशमध्ये 18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर असे 3 दिवस 3 दौरे झाले आहेत. धार, इंदोर, महू, बुरऱ्हाणपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी एकूण 8 सभा आणि रोड शो देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. तर, छत्तीसगडमध्ये 30 ऑक्टोबरला 1 दिवस 1 दौरा झाला. धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो फडणवीसांनी केले. राजस्थानमध्ये 14 सप्टेंबर 1 दिवस 1 दौरा पार पडला. केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर येथे एकूण 5 सभा फडणवीसांनी घेतल्या. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत.

     

    देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती का?

    भाजपने मध्यप्रदेशसह इतर तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा मनसुबा आखलाय. या सगळ्याच राज्यांमधल्या प्रचारात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. पण, भाजपच्या या प्रचाराचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आहे. कारण, देवेंद्र फडणवीस स्वतः या राज्यांमध्ये जाऊन झंझावाती प्रचार दौरे करतायत. बिहार, गोवा या राज्यांमध्ये भाजपला बळकट करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कळीची भूमिका पार पाडली होती. गोव्यात अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणला होता. तर, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त जागा भाजपने मिळवल्या होत्या.

     

    बिहारच्या प्रचाराची धुरा देखील फडणवीस यांनीच पेलली होती. त्यामुळे देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता पक्षातूनही तितकीच ताकद मिळतेय. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. दरम्यान, सध्याच्या निवडणूक प्रचार सभा आणि दौरे करताना फडणवीस यांना स्थानिकांनाकडूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती.

  • माजी नगरसेविकेच्या वाढदिवशी नागरिकांना मिळाली शासकीय योजनांची माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 7 सप्टेंबरला बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी शिबिर आयोजन करण्यात आले होती . 7 वेगवेगळ्या योजनाची शिबिर होती.

     

    या शिबिराला भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष श्री राहुलजी पावडे, भाजपा चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नगरसेवक श्याम कनकम , नगरसेवक प्रदिप किरमे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य यश बांगडे प्रामूख्याने भेट दिली.

     

    या शूभप्रसंगी माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, “वार्डातील प्रत्येक विधवा महिला, अपंग व्यक्ती, 65 वर्षपूर्ण झालेल्या आधार नसलेले जेष्ठ नागरिक, पथविक्रेते, अनाथ मूल हे सर्व नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मी शिबिर राबवली. यात मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित दर्शविली व त्या प्रत्येक लोकांना ज्यांनी शिबिरात अर्ज केले त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देईल अशी ग्वाही दिली.

     

    यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा सोशल मीडिया चंद्रपूर विधानसभा प्रमुख नंदकिशोर बगूलकर, भाजपा यूवमोर्चा जिल्हा सचिव मनिष पिपरे, सौ मंजूषा पोटदूखे, सौ नेहा नरताम, सौ निता वैरागडे, सौ अनिता चौधरी, सौ उज्वला दिघोरे, भाजपा अनूसूचित जाती बाबूपेठ मंडळ उपाध्यक्ष विवेक शिंदे, भाजपा सोशल मीडिया शक्ती केंद्र प्रमुख विनोद पेन्लीवार, राकेश सोनटक्के, प्रथम चौधरी, विशाल बनारसे,हर्षल घोटेकर, सुमित मडावी, तन्मय चव्हाण, इत्यादी व्यक्तींनी कार्य केले.