Tag: बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल

  • Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचा शेवटचा टप्पा पूर्ण

    Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचा शेवटचा टप्पा पूर्ण

    Railway Flyover आमदार किशोर जोरगेवार यांनी ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. बुधवारी त्यांनी शेवटच्या काँक्रीटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा विकास रत्न पुरस्काराने सन्मान


     Railway Flyover यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अतिरिक्त सहायक आयुक्त बोबाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता जावळे आदींची उपस्थिती होती.
      बाबुपेठकरांची अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्णत्वास यावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. काम शेवटच्या टप्प्यात असताना निधीअभावी काम रखडले होते. या निधीची व्यवस्था करण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी सतत प्रयत्न करून ५ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
     Railway Flyover सदर निधी प्राप्त होताच पुलाच्या बांधकामाला गती मिळाली असून, येथे रंगकाम आणि विद्युत रोषणाई पोल लावण्यात आले आहेत. उर्वरित पुलावरील शेवटचे काँक्रीटीकरणही आज पूर्ण करण्यात आले आहे. नियमानुसार पुढील काही दिवस हे काँक्रीटीकरण असेच ठेवण्यात येणार आहे; तोपर्यंत उर्वरित पूरक कामे पूर्ण केली जाणार आहेत.
      दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी काँक्रीटीकरणाबाबतची माहिती घेतली आणि आवश्यक निधी मिळवून दिल्यामुळे काम अपेक्षित गतीने सुरू असल्याचे सांगितले. ही गती मंदावणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. युद्धपातळीवर काम करून पुल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचेही निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी बाबुपेठ येथील नागरिकांसह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Kishor Jorgewar : बाबूपेठ उड्डाणपूल महिन्याभरात सुरू होणार – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar : बाबूपेठ उड्डाणपूल महिन्याभरात सुरू होणार – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor jorgewar बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले. शेवटच्या टप्यातील काम निधीअभावी रखडल्याचे लक्षात येताच आपण ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता युद्धपातळीवर काम करून महिन्याभरात काम पूर्ण करत उड्डाणपुल नागरिकांसाठी सुरू करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    योजना : माझी लाडकी बहीण योजना, बँक खाते आधार सोबत लिंक करा


      Kishor jorgewar आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता विवेक अंबुले यांच्यासह रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    राजकीय : चंद्रपुरात गोळीबार, पालकमंत्री मुनगंटीवार यांचं महत्वाची प्रतिक्रिया


                 बाबूपेठ उड्डाणपूल चंद्रपूरातील प्रमुख समस्यांपैकी एक समस्या होती. हा पूल व्हावा यासाठी बाबूपेठ वासीयांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. दर पाच मिनिटाला येथील रेल्वेगेट बंद होतो. येथून मध्य रेल्वे लाईन आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईन आहे. परिणामी दोन्ही गेट बंद राहत असल्याने नागरिकांना तासंतास येथे उभे राहावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता.


                  ही बाब लक्षात घेता येथे रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमध्ये हा पूल अडकला. अखेर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रेल्वे विभागाच्या तिसऱ्या रुळाच्या कामासाठी पुन्हा या पुलाचे काम मंदावले होते. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न करत सदर पुलाच्या कामाला गती दिली. मात्र पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना निधीअभावी सदर काम पुन्हा एकदा रखडले होते.

    अशक्य आता शक्य होणार


                  यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कामाला लागणारा ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सदर निधी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. काल बुधवारी सदर कामासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार मुंबईहून थेट बाबूपेठ उड्डाण पुलाच्या पाहणीसाठी चंद्रपूरात दाखल झाले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे.

    आता येथील कामाला गती देण्यात यावी, युद्धपातळीवर हे काम पूर्ण करून महिन्याभरात सदर पुल नागरिकांच्या सेवेत सुरू करावा असे निर्देश अधिकार्यांना दिले आहे, यावेळी निधी मंजूर केल्याबद्दल बाबूपेठ येथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. याप्रसंगी शेकडो बाबूपेठ वासीयांची उपस्थिती होती.

  • Babupeth Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल येणार पूर्णत्वास

    Babupeth Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल येणार पूर्णत्वास

    Babupeth Railway Flyover चंद्रपूर आणि बाबूपेठ शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बाबूपेठ उड्डाण पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे.

    अपघात मित्रांचा : चंद्रपुरात भीषण अपघात, 4 मित्रांचा जागीच मृत्यू

     Babupeth Railway Flyover बाबूपेठ रेल्वे उड्डाण पूल ही चंद्रपूरातील मोठ्या समस्यांपैकी एक आहे. येथे उड्डाण पूलाचे बांधकाम व्हावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. ते  निवडून आल्यानंतर या कामाला गती मिळाली होती. मात्र, अतिक्रमणधारक आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला होता. दरम्यान, बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असतानाच निधीअभावी काम पुन्हा एकदा रखडले.

       आ. किशोर जोरगेवार यांनी १० जुलै २०२४ रोजी मनपा अधिकाऱ्यांशी बैठक घेत उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या स्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि तातडीने पाठपुरावा सुरू केला.

    योजना : या लाडक्या बहिणीलाचं मिळणार 3 हजार रुपये

    अखेर नगर विकास विभागाच्या वतीने बाबूपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, आणि त्याचा जीआरही शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असूनही केवळ निधीअभावी रखडलेले बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम आता पूर्ण होणार आहे.

          आ. किशोर जोरगेवार यांनी याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर बैठका घेत कामाला गती देण्याचे प्रयत्न केले होते. बाबूपेठ रेल्वे रुळ हा येथील नागरिकांसाठी मोठी समस्या होती. येथे उड्डाण पूल तयार करण्याची येथील नागरिकांची ५० वर्ष जुनी मागणी होती. निवडून आल्यावर त्यांनी या प्रस्तावित कामाला गती दिली. मात्र, रेल्वे विभागाअंतर्गत पुलाच्या तिसऱ्या भागाच्या कामामुळे विलंब झाला होता. आता हे काम पूर्ण झाले असून केवळ पालिकेअंतर्गत करण्यात येणारी कामे अपूर्ण आहेत.यासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देता आला याचा आंनद आहे असल्याचे म्हणत  “दिक्षाभूमी नंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठीही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मला समाधान वाटत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

  • Railway Over Bridge : 3 महिन्यात बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा अन्यथा – खासदार प्रतिभा धानोरकर यांचा इशारा

    Railway Over Bridge : 3 महिन्यात बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा अन्यथा – खासदार प्रतिभा धानोरकर यांचा इशारा

    Railway over bridge चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा ईशारा खासदार धानोरकर यांनी  अधिकाऱ्यांना दिला. बाबुपेठ उड्डाण पुलाच्या संदर्भाने आज खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह या प्रलंबित उड्डाण पुलाला भेट दिली.

    अवश्य वाचा : आमदाराने घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

    खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र सुरु केले असून 20 जुन रोजी निर्माणाधिन असलेल्या व ८ वर्षांपासून रखडलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाण पुल जनतेच्या सेवेत सुरु न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा उपस्थित  अधिकाऱ्यांना दिला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    Railway over bridge सदर पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून या पुलाच्या अभावी अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलाची प्रतिक्षा समग्र बाबुपेठ वासीयांना असून अधिकारी मात्र या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात खासदार धानोरकर यांच्या कडे तक्रारी प्राप्त झाल्या नंतर खासदार धानोरकर यांनी तातडीने पाहणी करुन उर्वरीत कामाचा आढावा घेतला.

     

    यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता श्री. टांगले, महिला कॉग्रेस च्या शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगर सेवक पितांबर कश्यप, सोहेल रजा, प्रशांत भारती यांसह बाबुपेठ मधील अनेक नागरीकांची उपस्थिती होती.

  • लवकरचं बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल सुरू होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 24 तासामधून दररोज तब्बल 18 तास बंद राहणाऱ्या बाबूपेठ रेल्वे फाटकाचा त्रास आता संपणार आहे, कारण रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता निम्मे राहिले असून येत्या काही महिन्यात बाबूपेठ मधील नागरिक उड्डाणपूलावरून जाणार आहे. Babu peth railway flyover

     

    अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचे भूमिपूजन तब्बल 7 वेळा करण्यात आले होते, मात्र अधिकृत उदघाटन व्हायला बराच कालावधी लोटून गेला.

     

    भूमीपूजन झाल्यावर सुद्धा संथगतीने या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते, कासवगतीने आपला प्रवास पूर्ण करीत हा रेल्वे उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात आहे.

     

    13 सप्टेंबर ला रेल्वे विभागाने चांदा फोर्ट व मुख्य रेल्वे लाईन वरून उड्डाणपूल यशस्वीरीत्या क्रॉस केले.

     

    येत्या 2 ते 3 महिन्याच्या आत उड्डाणपूल वरील रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे, मागील अनेक वर्षपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाची मागणी नागरिकांनी केली होती मात्र राजकीय वरदहस्त आलेल्या विशेष व्यक्तीचे दुकान वाचविण्यासाठी अनेकदा उड्डाणपुलाचा प्रस्ताव नाकारल्या गेल्या होत्या.

     

    मात्र काही वर्षांपूर्वी विशिष्ट व्यक्तीचे दुकान प्रशासनाने वाचविले मात्र दुकान वाचले म्हणून शासनाने गरिबांचे कंबरडे मोडून टाकत त्यांच्या घरावर बुलडोजर चालविला, उड्डाणपुलाचे काम सुरू झाले, मागील 4 वर्षांपासून ते काम सतत सुरू आहे, कधी निधीची अडचण तर कधी रेल्वेची या गुंतागुंतीत काम संथगतीने सुरू होते.

     

    या कालावधीत दाताला ब्रिज तयार होऊन सुरू सुद्धा झाला मात्र नेहमीप्रमाणे बाबूपेठ वर संथगतीच्या कामामुळे अन्याय झाला.

     

    4 वर्षांनी काम अखेर पूर्णत्वास येत आहे, आता बाबूपेठ वासी रेल्वे फाटकाला लवकरच राम राम करतील यावर शंका नाही.