Tag: प्रकल्पग्रस्तांच विरुगिरी आंदोलन

  • भूसंपादन करार रद्द करण्याच्या मागणीवर अंबुजाचे प्रकल्पग्रस्त ठाम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार राजुरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रकल्पग्रस्त तसेच कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्या सोबत उपविभागीय कार्यालयात घेतलेल्या बैठकीत 98 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला नाही.त्यामुळे अंबुजा सिमेंट कंपनीचा भूसंपादन करार रद्द करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांचे नेते जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी बैठकीत लावून धरली. यावेळी बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवून समोरील कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी माने यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले.

     

    सविस्तर असे की 6 ऑक्टोबर रोजी अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या जवळ टाॅवर वर चढून 16 तास आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रकल्पग्रस्त, कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी यांचेसह नियोजन भवनात बैठकीचे आयोजन केले होते.

     

    98 बेरोजगार प्रकल्पग्रस्त यांना नोकरी देण्याच्या संदर्भात 15 दिवसांत योग्य ती माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाला दिले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी राजुरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कक्षात प्रकल्पग्रस्तांना अंबुजा सिमेंट कंपनीत नोकऱ्या देण्याबाबत बैठक बोलण्यात आली.

     

    या बैठकीला राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांचे सह कोरपण्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर, प्रकल्पग्रस्तांचे नेते पप्पू देशमुख,अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रतिनिधी, अनिल वर्मा ,के.सुब्बु ,श्रीकांत कुंभारे ,महेंद्र ठाकरे , नितीन झाडे तसेच प्रवीण मटाले, सचिन पिंपळशेंडे ,आकाश लोडे,निखिल भोजेकर ,चंदू झाडे, तुषार निखाडे,अविनाश विधाते,कमलेश मेश्राम, विकी मेश्राम,शंभू नैताम,भोजी सिडाम इत्यादी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

     

    यापूर्वी उपजिल्हाधिकारी भूसंपादन व पुनर्वसन यांनी केलेल्या चौकशीत अंबुजा सिमेंट कंपनी व्यवस्थापनाने भूसंपादन कराराचा भंग केल्याचे सिद्ध झाले आहे. शासनाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून दीड वर्षाचा कालावधी लोटला. मात्र जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून या प्रकरणात चाल-ढकल करण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करीत आहे. 98 प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकऱ्या देण्याबाबत कंपनी व्यवस्थापन गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याने बैठकांचा फार्स करण्या ऐवजी शासनाने अंबुजा सिमेंट कंपनीचा भूसंपादन करार रद्द करण्याची दीड वर्षापासून प्रलंबित असलेली कारवाई तातडीने पूर्ण करावी ही प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.
    पप्पू देशमुख
    संस्थापक अध्यक्ष-जनविकास सेना

  • 98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत 15 दिवसांत माहिती द्या – जिल्हाधिकारी गौडा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या 6 प्रकल्पग्रस्तांनी टॉवरवर चढून 16 तास केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने आज 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जटाले, राजुरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, कोरपन्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर तसेच जमीन शाखेचे नायब तहसीलदार सचिन पाटील, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, अंबुजा सिमेंट कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख अनिल वर्मा,जानवे व जनविकास सेनेचे इमदाद शेख, अक्षय येरगुडे व महिला आघाडीच्या प्रमुख मनिषा बोबडे उपस्थित होते.
    यावेळी आकाश लोडे , प्रवीण मटाले , सचिन पिंपळशेंडे , निखिल भोजेकर , चंदू झाडे , सुनील बुटले , कमलेश मेश्राम, विष्णू कुमरे, संजय मोरे , संदीप वरारकर, अविनाश विधाते , तुषार निखाडे , नागू मेश्राम , भिकू मेश्राम, सत्यपाल किनाके, रवी पंढरे इत्यादी प्रकल्पग्रस्त सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    प्रकल्पग्रस्तांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकरीत प्राधान्य देणे गरजेचे होते.मात्र अंबुजा सिमेंट कंपनीने रोजगाराची मागणी करणाऱ्या 98 प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सिद्ध झाले. त्यामुळे कंपनीविरुद्ध ‘कारवाई का करण्यात येऊ नये’ अशा प्रकारचा कारणे दाखवा नोटीस शासनाने कंपनीला बजावला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले.

     

    अदानी समूहाने नुकतीच कंपनी अधिग्रहित केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत पुरेशी माहिती नसल्याची बाजू अंबुजाच्या मानव संसाधन विभागाचे अधिकारी अनिल वर्मा यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. यावर ‘व्यवस्थापन बदलले तरी कार्यालय बदलत नसते’ असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यवस्थापनाला खडसावले.पंधरा दिवसाच्या आत 98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश त्यांनी कंपनीला दिले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबद्दल पुढील दिशा ठरणार आहे.

    अंबुजा सिमेंट कंपनी मधील 98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत आज बोलावलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सकारात्मक भूमिका घेतली.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा नव्याने पल्लवीत झालेल्या आहेत. अंबुजा सिमेंट कंपनीचे व्यवस्थापन सतत जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करत असल्याची बाब लक्षात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कंपनीविरुद्ध नेमकी भूमिका घेतली.प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा अंबुजा सिमेंट कंपनीचा भूसंपादन करार रद्द करण्याची शासन स्तरावर प्रलंबित असलेली कारवाई पूर्ण करावी ही प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.
    -पप्पू देशमुख-
    संस्थापक अध्यक्ष-जनविकास सेना

  • 15 तासांनी प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन मागे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्याने रात्री आठच्या सुमारास विरूगिरी आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून कंपनी परिसरातील टॉवरवर चढून सहा तरूणांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता.

    आंदोलकांमध्ये आकाश लोडे, अविनाश विधाते, तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे यांचा समावेश आहे. भूसंपादन कराराचे उल्लंघन करणाऱ्या अंबुजा कंपनीचे भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना जमीनी परत द्याव्या नाहीतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये स्थायी नोकरी द्यावी आदी मागण्यां आंदोलनादरम्यान करण्यात आल्या होत्या.

     

    कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीच्या मराठा सिमेंट कंपनीने शासनासोबत केलेल्या भूसंपादन करारातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्थायी नोकरीमध्ये प्राधान्य न देता प्रकल्पग्रस्त आदिवासी व गैर-आदिवासी शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवले. त्याऐवजी स्थानिक रहिवासी असल्याचे खोटे दाखले तयार करून बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना डावलल्याने स्थानिक तरूण व प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

     

    कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वंचीत ठेवल्याने संतापलेले सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी पिंपळगाव येथील आकाश लोडे, अविनाश विधाते, उपरवाहीचे तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर व लखमापूर येथील सचिन पिंपळशेंडे यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजता कंपनी परिसरातील मोबाईलच्या उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.

     

    पहाटे पाच ते सायंकाळी 8 वाजतापर्यंत सहा युवक विरूगिरी स्टाईलने टॉवरवर आंदोलन करीत होते. उपविभागीय अधिकारी यांन या आंदेालनाची दखल घेत घटनास्थळी दाखल झाले. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांना प्राधान्याने घेऊन नागपूरात या विषयी आठवडाभरात बैठक लावून न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अंबुजा सिमेंट प्रकल्पग्रस्तांचं विरुगिरी आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात मोठे उद्योग अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मात्र हे सर्व उद्योग कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्याचे काम करीत आहे, गडचांदूर येथील अंबुजा सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांनी 6 ऑक्टोबर ला सकाळपासून विरुगुरी आंदोलन सुरू केले आहे.

    3 कामगार गगनचुंबी टॉवर वर चढून आंदोलन करीत आहे, अंबुजा सिमेंट कंपनी अडाणी समूहाकडे गेल्याने त्यांनी भूसंपादन कायद्याचे उल्लंघन केले, ही सर्व बाब 4 वर्षांपूर्वी चौकशीत सिद्ध झाली मात्र त्यावर काही कारवाई केल्या गेली नाही.

     

    4 वर्षापूर्वी शासनाने कंपनीला कारवाईची नोटीस सुद्धा पाठवली मात्र कारवाई फक्त कागदोपत्री मर्यादित राहिली, सरकार सर्व नियम धाब्यावर बसवून अंबुजा सिमेंट कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, भूसंपादन करार रद्द करीत प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकरी च्या मागणीसाठी सकाळपासून प्रकल्पग्रस्तांनी टॉवर वर चढत विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे.

     

    अंबुजा गो बॅक, अडाणी गो बॅक ची नारेबाजी कामगार करीत असून आम्हांला न्याय द्या अन्यथा आम्ही जीवाचे बरेवाईट करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.