Tag: जटायू संवर्धन प्रकल्प

  • Now Jatayu Conservation Project : ताडोब्यात 3 गिधाडांचा मृत्यू

    Jatayu Conservation Project

    Jatayu Conservation Project चंद्रपूर – 21 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ताडोबा येथील बोटेझरी जंगलात राज्यातील जटायु संवर्धनाचा महत्वाचा प्रकल्प साकारण्यात आला होता.

    प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पांढरी पाठ असणारे 10 जटायु पक्षी हरियाणा राज्यातील पिंजोर जिल्ह्यातून आले मात्र नोव्हेंबर महिन्यात 3 जटायू चा मृत्यू झाल्याने वनविभागात चांगलीच तारांबळ उडाली आहे. Jatayu Conservation Project

    86 हजारांची कायमस्वरूपी नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या पिंजोर (हरयाणा) येथील गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे 10 गिधाड पक्षी रीतसर शासनाची परवानगी घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रिरीलीज अव्हीयारी मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते. साधारणत: 3 महिन्यानंतर त्यांना निसर्ग मुक्त करणार होते मात्र तसे काही झाले नाही. Jatayu Conservation Project

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात सोडलेल्या 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात हरियाणा राज्यातील पिंजोर येथून आणण्यात आलेल्या धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरट्यावर असलेल्ल्या 10 गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस लावून बोटेझरी येथे सोडण्यात आली होती. Jatayu Conservation Project

    वनविभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी पाठविले आहे. या गिधाडांची संख्या कमी झाल्याने निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी या अद्यावत  तंत्रज्ञानाने  अभ्यासातून गिधाडांचे संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केल्या जाणार आहेत.  Jatayu Conservation Project

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील २१ जानेवारी २०२४ ला जटायु संवर्धन केद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्रामध्ये बिएनएसएस (BNHS) या संस्थेच्या पिंजोर येथील संशोधन केद्रातील धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या १० पाढऱ्या पुठ्यांचे गिधाडे (White-rumped vulture) आणण्यात आले होते. त्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्री-रिलीज एवेयरीमध्ये (Pre-realise Aviary) तज्ञांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते.

    या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्रातील वातावरणाची सवय व्हावी या हेतून प्री-रिलीज  एवेयरीमध्ये ठेवण्यात आले. या गिधाडांचा मागील ६ महिन्याचा दैनदिन व शुक्ष्म अभ्यास बिएनएसएस (BNHS) संस्थेच्या वैज्ञानिकांनी केला. या सर्व गिधाडांना निसर्ग मुक्त करणे आवश्यक होते.

    त्यामुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानीकांनी सर्व १० गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस (GSM Transmission Tracking Device) लावले. सदर डिव्हाईस युरोपमधून आयात करण्यात आली होती. Jatayu Conservation Project

    सदर जिपीएस लावल्यानंतर काही दिवसांच्या निरीक्षणानंतर या गिधाडांना निसर्गमुक्त करून या तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांचे रोजचा दैनदिन हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

    तसेच या अभ्यासातून गिधाड संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केल्या जाणार असल्याने 21 जानेवारी 2024 ला ताडोबातील बोटेझरी जंगलात 10‍ गिधांडाना सोडण्यात आले. त्यैकी 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरूवारी उजेडात आली आहे.

    वनविभागाने मृत गिधाडांचे शव एकत्रित करून शवविच्छेदनासाठी नागपुरात प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ही सर्व गिधाडे पांढ-या पाठीच्या प्रजातीची होती.  निसर्गातील स्वछतादूत गिधाडांची संख्या कमी झाली होती. निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.

    उद्देश काय होता?

    जटायु (गिधाड) हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. गावाच्या वेशीवर टाकल्या जाणा-या मृत प्राण्यांना खाऊन गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवत असे. भारतात जटायुच्या 9 प्रजाती आढळतात. सन 1990 मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती पणआता ती संख्या कमी होऊन केवळ 50 हजारांवर आली आहे. जटायु प्रजाती नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन कारणीभूत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायु या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन जटायुंच्या शरीरात जाते आणि परिणामी जटायु मरण पावतात. जटायुची संख्या कमी होणे जैवविविधता व निसर्ग चक्रालाघातक आहे.