Tag: ओबीसी विरुद्ध मराठा

  • चंद्रपुरात रविवारी ओबीसी समाजबांधवांचा महामोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे , ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही.

     

    सोमवार पासून11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे व 17 सप्टेंबर ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मोडणाऱ्या सर्व जात संघटनेच्या वतीने चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

     

    या दरम्यान दिनांक 16 सप्टेंबर ला शहरात बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, मोर्चात सहभागी व्हावें असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासघाचे महासचिव सचिन राजूरकर, समनवयक डॉ अशोक जीवतोडे, धानोजे कुणबी समाजाचे ऍड पुरुषोत्तम सातपुते, बबनराव फंड, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, प्रा अनिल शिंदे, विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खनके, माळी महासंघाचे डॉ संजय घाटे ,चंद्रपूर माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर , ओबीसी सेवा संघाचे अनिल डाहाके, राजेश बेले,सतीश मालेकर, शाम राजुरकर, शैलेश जुमडे, शाम लेडे, अक्षय येरगुडे , ऍड देवा ,पाचभाई, मनीषा बोबडे, यांनी केले आहे.

  • रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर संघटनेचे जाहीर समर्थन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. तसेच ओबीसींच्या रखडलेल्या विषयांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत.

     

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा मराठा समाजाला जर कुणबी मधून ओबीसी आरक्षण दिले गेले. तर ओबीसी मधील जवळपास अडीच ते तीन हजार जातीतील विद्यार्थ्यांना वरती हा अन्याय होईल म्हणून या रास्त मागणीला घेऊन ते उपोषण करत असून त्यांच्या या उपोषणाला आज कुणबी युवा चंद्रपूर संघटनेकडून जाहीर समर्थन तथा पाठिंबा देण्यात आले. तसेच ओबीसी समाजाला शासनाने कमजोर समजू नये.

     

    जर ओबीसी समाजाविरुद्ध चुकीचे निर्णय घेण्यात आले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात गंभीर उमटतील याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असा इशारा कुणबी युवा चंद्रपूर तर्फे देण्यात आला या वेळेला युवा जिल्हा समन्वयक श्री. राजू कुडे, संदेश खडसे, ॲड. प्रफुल मुरकुटे, सुप्रीत कुडे, विश्वनाथ पाल, सुधीर पिंगे, दिनेश देरकर, मोहन दरेकर तसेच अनेक युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • OBC आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सोबत चर्चा करणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थांकरिता प्रत्येक जिल्हात मुला मुलींकरिता स्वतंत्र वसतीगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

     

    दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण पेंडालाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी टांगे यांच्या प्रकृतीची विचारणा करत त्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या आहे. शिंदे – फडणवीस सरकार ओबीसी समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आंदोलकांच्या भावना आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – एकीकडे गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पाचव्या दिवशी पर्यंत प्रशासनाने रीतसर कानडोळा करत आहे. Maratha vs obc

     

    राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मराठ्यांच्या या मागणीला विरोध करत मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये कारण ते सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, तसेच सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले आहे असे म्हटले आहे.

     

    शिवाय वास्तविक, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरंगे उपोषणाला बसले तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा तापला.परंतु जरांगे यांची मागणी संविधानाच्या कक्षेत बसणारी नसून आम्ही संविधानिक मागणी करीत आहोत असे ओबीसी महासंघाने स्पष्ट केले.

     

    दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी पाहता चंद्रपूरातील ओबीसी समाजातील लोकही मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.येत्या 17 सप्टेंबर ला ओबीसी समाज बांधव मोठया प्रमाणात महामोर्चा काढणार आहे.

     

    या आंदोलनात मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये ही मुख्य मागणी असून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मराठा समाजाच्या उपोषण मंडपास भेट दिली व खुद्द ओबीसींचे मंत्री असताना ओबीसी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसीच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्री शिंदे घेतील काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जालन्यात सुरू असलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतले, मात्र उपोषण मागे घेतले आंदोलन नाही असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

     

    राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं अशी मागणी झाली, त्यावर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    चंद्रपुरात 11 सप्टेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे आमरण उपोषणाला बसले आहे, मात्र 4 दिवस लोटल्यावर सुद्धा त्यांच्या आंदोलनाची साधी दखल घेण्यात आली नाही.

     

    मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गातून नको अशी ठाम भूमिका घेत टोंगे यांनी आंदोलन सुरू केले आहे.

     

    जरांगे यांच्या उपोषणाला अर्ध्या मंत्रिमंडळाने भेट दिली, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या मग ओबीसी समाज बांधवांचे काय? त्यांच्या आंदोलनाची दखल कोण घेणार?

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समनव्यक डॉ. अशोक जीवतोडे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश घेतला, त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले होते.

     

    त्या कार्यक्रमात भाजपचा DNA हा ओबीसी आहे, ओबीसी समाजाला फक्त भाजप न्याय देऊ शकते अशी ग्वाही त्यांनी दिली होती, 15 ऑगस्ट पासून राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात येणार अशी घोषणा खुद्द फडणवीस यांनी केली होती, मात्र आजपर्यंत एक वसतिगृह सुद्धा सुरू झाले नाही.

     

    जातनिहाय जनगणना, स्वाधार योजना, वस्तीगृह व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका अशी मागणी रवींद्र टोंगे यांनी केली आहे.

     

    टोंगे यांच्या मागण्यांना भाजप न्याय देणार काय? की न्यायाची भाषा ही भाषणापुरती मर्यादित होती? भाजपवासी झालेले अशोक जीवतोडे यांनी तरी ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपली कठोर भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायला हवी.

     

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली.

     

    तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील बांधवांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी भेट द्यावी अशी मागणी केली, मराठ्यांना एक न्याय तर ओबीसी समाजावर अन्याय करू नका अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

     

    आरक्षणाच्या ठिणगीने राज्यात 2 समाजात भांडण लावण्याची कामे केली जात आहे, मात्र आरक्षणावर ठोस निर्णय सरकारच्या अंगावर येतो की काय अशी वेळ सध्या आली आहे, कमीतकमी भाजपच्या OBC DNA ने तरी ओबीसींच्या रास्त मागण्याची दखल घ्यावी अन्यथा आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाही.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनात 6 महिन्याचं बाळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करणे या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी, तिसऱ्या दिवशी रविंद्र टोंगे यांची पत्नी व सहा महिन्यांचा अनिस यांनी सुद्धा दिवसभर अन्न त्याग आंदोलनात साथ दिली.

     

    मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह सुरू करावे, जातनिहाय जनगणना व्हावी अश्या ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलनाचे बंड पुकारले आहे.

     

    11 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यातील मंत्री व जनप्रतिनिधी यांनी पाठ दाखवली आहे.

    दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. भाजपचे देवराव भोंगडे, राहुल पावडे, आशिष ताजने कोरपना, मनोज पोतराज, ओबीसी जनगणना परिषद चे बळीराज धोटे, भावसार समाजाचे डॉ नंदकिशोर मैदळकर व त्यांचे सहकारी, तैलीक समाजाचे, ऍड विजय मोगरे, रघुनाथ शेंडे, बबनराव फंड, प्रकाश देवतळे, डॉ विश्वास झाडे, काँग्रेस ओबीसी सेल चे प्रशांत दानव, उमकांत धांडे, प्रा संजय बेले, जनविकास सेनेचे अध्यक्ष पपू देशमुख, घनश्याम येरगुडे, विमल पिदूररकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन जाहीर केले.