Category: मनोरंजन

बॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टी (Marathi Film Industry) आणि हॉलिवूडमधील सर्व ताज्या मनोरंजन बातम्या (Entertainment News) आणि गॉसिप्ससाठी news34.in च्या या कॅटेगरीला भेट द्या. तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीजचे अपडेट्स, नवीन चित्रपटांचे रिव्ह्यू, वेब सिरीज, टेलिव्हिजन शो आणि संगीत क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा. मनोरंजन विश्वातील आकर्षक आणि विश्वासार्ह माहिती, फोटो आणि व्हिडिओ त्वरित मिळवा.

  • Facebook is down in the world : फेसबुक सह इन्स्टाग्राम डाऊन

    Facebook is down in the world : फेसबुक सह इन्स्टाग्राम डाऊन

    Facebook insta down जगातील सर्वात मोठे समाजमाध्यम 5 मार्च ला रात्री अचानक डाऊन झाल्याने युझर लॉग आऊट व्हायला लागले, अचानक असं काय झालं यावरून युझर हैराण झाले, आणि समाजमाध्यम X वर मिम्स चे वादळ आले. Facebook is down in the world

    Facebook, instagram अचानक डाऊन झाल्याने कोट्यवधी युझर मेटा वर नाराज झाले, आणि x वर #facebookdown trend व्हायला लागले.

    काही युझर ने तर मेटा चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे मार्फ केलेले फोटो शेअर करू लागले ज्यामध्ये झुकरबर्ग हे तार कापताना दिसत आहे, सर्वात जास्त समस्या युझर ना फेसबुकवर आली आहे, लॉगिन न झाल्याने अनेकांनी आपला मोबाईल बंद करून सुरू केला.

    अचानक ही समस्या का उदभवली यावर अधिकृत पणे माहिती पुढे आली नाही.

  • VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture

     

    1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र वनविभागाच्या कोट्यवधीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसला, नागरिकांना बसायला जागा नसल्याने त्यांनी जमिनीवर आपले बस्तान मांडत कार्यक्रम बघितला. Tadoba Festival

     

    ताडोबा महोत्सव कार्यक्रमात VVIP, VIP, GOLD व PREMIUM असे पासेस बनविण्यात आले होते मात्र ते पास सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेचं नाही. Tadoba mahotsav

     

    याबाबत माहिती काढली असता VVIP रांगेत राजकीय पक्षाचे पुढारी बसलेले होते, VIP रांगेत नागरिक सह पत्रकार हे उभे होते, खुर्ची न मिळाल्याने अनेकजण vip रांगेत खालीच बसले. Vip Member

     

    चंद्रपूर मनपाच्या महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या नेत्याने VVIP पासेसचा गठ्ठा जवळ ठेवला होता, त्यांनी ते vvip पासेस आपले कार्यकर्ते व प्रभागातील श्रीमंत नागरिकांमध्ये वितरण केले. भावी महापौर यांच्या या कृत्याने सामान्य नागरिकांना पासेस मिळाले नाही त्यामुळे अनेकांना कार्यक्रम बघण्यापासून मुकावे लागले. Political vip

     

    नागरिकांच्या तोंडातून यावेळी एकच उदगार निघाले “हा कार्यक्रम प्रायव्हेट लिमिटेड आहे की शासकीय?” 3 दिवस चालणाऱ्या का कार्यक्रमाचे एकूण बजेट 9 कोटी रुपये म्हणजे दर दिवसाला 3 कोटींचा खर्च, इतके वर्ष ताडोब्यात असे कार्यक्रम झाले नाही तर मग यावर्षीचं हा इव्हेंट का आयोजित करण्यात आला, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

     

    जनतेच्या करातून केल्या जाणारी कोट्यवधी रुपयांची ही मोठी उधळण सध्या चंद्रपुरात सुरू आहे. विशेष म्हणजे जनविकास सेना व्यतिरिक्त या इव्हेंट ला कुणी ही विरोध दर्शविला नाही.

     

    जनतेच्या हक्कासाठी लढणारे पक्ष आज तोंडात मृग गिळून गप्प बसले आहे, निवडणुकीच्या वेळी याना जनता आठवते मात्र नागरिकांचा काहीएक फायदा नसलेल्या भव्य आयोजनाला यांचा विरोध दिसत नाही.

     

    पोलीस विभागाने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक रस्ताचं महोत्सवासाठी बंद केला, एकंदरीत कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाने केलेला हा अयशस्वी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र त्याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षीपासून सुरू झालेल्या या इव्हेंट्मुळे शासकीय कर्मचारी सुद्धा वैतागला आहे, कार्यालयातील कामे सोडून त्यांना इव्हेंट्स मध्ये आपली हजेरी लावावी लागत आहे.

  • चंद्रपुरात लायन्स क्लब च्या एक्स्पो चे उदघाटन

    चंद्रपुरात लायन्स क्लब च्या एक्स्पो चे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर- लायन्स क्लब चंद्रपूर तर्फे आयोजित पाच दिवसीय एक्स्पो चे उदघाटन आमदार किशोर जोरगेवार याचे हस्ते बुधवारी पार पडले.
    स्थानिक क्लब ग्राउंड येथील लायन्स एक्स्पो च्या शुभारंभ प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य स्पर्धे द्वारे करण्यात आला.

     

    या वेळी लायन क्लब चे प्रांतपाल बालबीर सिंह वीज, डॉ विलास मुळे, शैलेश बागला, घनश्याम भाई दरबार,दिनेश बजाज, राजू भास्करवार, wबबलू कोठारी, मंचावर उपस्थित होते. माता महाकाली च्या पूजनाने लायन एक्स्पो चा शुभारंभ करण्या आला.

     

    लघु आणि घरगुती व्यवसाय ला चालना मिळावी, व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या एक्स्पो चे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या एक्स्पो मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मंच मिळावा या उद्देशाने विभिन्न स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.

     

    एक्स्पो च्या यशस्वी ते साठी शैलेश दरबार,अजय वैरागडे,विश्वास माधमशेट्टीवार, गोपिकीशन डॉ अपर्णा सोनवलकर,अनु बागला, अंजु गोयल, पूजा जैन, सुनीता जैन,कविता अग्रवाल, जया सातपुते, लक्ष्मी अग्रवाल ,मंजू गोयल,कविता तहीलीयनी, अभिषेक बांगला, निर्मल भंडारी, पंकज खजांची, कोमल मुरारका, सोनल पुगलिया, सोनिया गुप्ता प्रयत्नशील आहेत

  • विदर्भात उच्चशिक्षणाचा होणार जागर, चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणयात्रेचा शुभारंभ

    विदर्भात उच्चशिक्षणाचा होणार जागर, चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणयात्रेचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आदिवासीबहुल व मागास समजला जाणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात देश-विदेशातील नामांकित विद्यापिठे, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती तसेच फेलोशीप याबाबत पुरेसी माहीती नाही. दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळावे, या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातून विदर्भात उच्चशिक्षणाचा जागर करणारी शिक्षणयात्रा सुरु केली आहे.

     

    शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर, जागृत बहुद्देशीय संस्था व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ब्रिटीश सरकारची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त तरुण वकिल, नुकतेच ब्रिटीश सरकारने चेव्हनिंग गोल्ड पुरस्काराने सन्मानित केलेले ॲड.दीपक चटप यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या शिक्षणयात्रेची सुरुवात नुकतीच संविधान दिनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या उपस्थितीतीत करण्यात आली. यावेळी समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या शिक्षण यात्रेचे समन्वयक म्हणून मुख्यमंत्री फेलो राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर हे भूमिका पार पाडत आहे.

     

    लंडनमध्ये कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशात अनेक संधी दीपकला उपलब्ध झाल्या आहेत. या संधीतून वैयक्तिक आर्थिक संपन्नता येईल मात्र शिक्षणाचा उपयोग तळागाळातील घटकांना व्हावा म्हणून त्यांनी विधी, शिक्षण व धोरणनिर्मिती क्षेत्रात रचनात्मक काम करण्याचे ठरविले आहे.

     

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करण्याचा संकल्प या यात्रेतून असल्याचे मत समन्वयक अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले. २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिन ते २६ जानेवारी २०२४ गणतंत्र दिन या दोन महिन्याच्या काळात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसह विदर्भातील १२ वी पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचून देश-विदेशात पदव्युत्तर शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती, फेलोशीप बाबतची माहिती आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘शिक्षण यात्रा : एज्युकेशन टू इम्पावरमेंट’ या कृतीयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबाबत देश विदेशात उपलब्ध शिष्यवृत्ती, कोर्सेस, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक क्षमता व कौशल्ये आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

     

    या शिक्षणयात्रेतून येणाऱ्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी सज्ज होतील व शैक्षणिक चळवळ तयार होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केले. सुमती फाऊंडेशन, जागृत संस्था यांचे विशेष सहकार्य या यात्रेला लाभले आहे. त्यासोबतच पाथ फाऊंडेशन, पाॅलीलाॅ नेटवर्क फाऊंडेशन, सत्यशोधक कलेक्टीव, संकल्प फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या विशेष सहकार्याने शिक्षणयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात उच्चशिक्षणाची चळवळ चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील विद्यार्थी-युवकात निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

     

    मी लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेवून नुकताच भारतात परतलो आहे. विदर्भातील विद्यार्थी क्षमतावान आहे. मात्र माहितीचा अभाव, पुरेसे मार्गदर्शन न मिळणे, आर्थिक अडचणी आणि शिक्षणाबाबतची निरुत्साहता विद्यार्थ्यांत वाढताना दिसते. शिक्षण संधीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेणे मला महत्वाचे वाटले.

    – ॲड.दीपक चटप
    आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर, यु.के

  • नागरिकांनो महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग सेवेचा लाभ घेतला का?

    News34 chandrapur

    चंद्रपूर /जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतची पुढील प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

     

    ‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार महावितरणकडून ग्राहकसेवा देण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरण आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलामध्ये नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. तथापि दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे वीजग्राहकांचा मोठा वेळ वाचणार आहे. आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत या तत्पर सेवेचा जुने घर किंवा दुकानाच्या खरेदीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

     

    नोंदणी व मुद्रांक विभागाने (आयजीआर) मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ मध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा बिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत ६० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास ‘एसएमएस’द्वारे कळविले जात आहे व प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्काचे इन्व्हाईस महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

     

    एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज नाही. तर एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल. याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून ‘एसएमएस’ द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे. तथापि, ‘एसएमएस’ पाठविल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी लागेल.

     

    जागेच्या खरेदीपूर्वी थकबाकी तपासून घ्या- जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक / ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी वीजबिलाची थकबाकी तपासून घेणे आवश्यक आहे.

  • अमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ला सुरुवात

    News34 chandrapur

    वृत्तसेवा – Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी, ग्राहक या सेलची आतुरतेने वाट पाहतात, कारण Amazon सेलमध्ये सर्वात कमी किमतीत मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅझेट खरेदी करण्याची ऑफर दिली जाते. अशा परिस्थितीत ग्राहक वर्षभर या विक्रीची प्रतीक्षा करतात.

     

    तथापि, डिस्काउंट ऑफरची अधिकृत घोषणा विक्रीच्या दिवशी केली जाईल. परंतु तुम्ही SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि EMI वर कोणतेही उत्पादन खरेदी केल्यास, तुम्हाला थेट 10 टक्के सूट मिळू शकेल.

     

    ग्राहकांना मोबाईल डिव्‍हाइसेस आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याचा अर्थ, तुम्ही 1000 रुपयांचे उत्पादन 600 रुपयांना खरेदी करू शकाल.

    Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 मध्ये, खरेदीदार काही मोहक आयफोन डीलचा लाभ घेऊ शकतात. iPhone 13 ₹45,999 च्या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे, तर iPhone 14 तुमचा ₹61,999 मध्ये असू शकतो. तुम्ही मोठा iPhone 14 Plus शोधत असल्यास, त्याची किंमत ₹70,999 आहे आणि उच्च-स्तरीय कामगिरी शोधणाऱ्यांसाठी, iPhone 14 Pro ₹1,19,990 मध्ये उपलब्ध आहे. iPhone 14 Pro Max ची ₹१,७७,९९९ मध्ये विक्री होत आहे.

    OnePlus Nord CE 3 Lite 5G (Chromatic Gray, 8GB RAM, 128GB Storage) सुपर फास्ट चार्जिंग युक्त 19 हजार 999 रुपयांचा मोबाईल फक्त 17 हजार 499 रुपयात

     

    Apple iPhone 13 (128GB) वर तब्बल 30 टक्क्यांची सूट 69 हजार 900 रुपयांचा आयफोन फक्त 48 हजार 999 रुपयात

     

    Fire TV Stick Lite with all-new Alexa Voice Remote Lite बघा ऑनलाइन चित्रपट व वेबसिरीज चा धमाका, 3 हजार 999 रुपयांचे फायर टीव्ही स्टिक केवळ 1 हजार 799 रुपयांमध्ये, 55 टक्क्यांची मिळतेय सूट, आजच खरेदी करा..

     

    Redmi 108 cm (43 inches) F Series 4K Ultra HD Smart LED Fire TV L43R8-FVIN (Black) 51 टक्क्यांची सूट, 42 हजार 999 रुपयांचा टीव्ही फक्त 20 हजार 999 रुपयात आजच खरेदी करा amazon indian festival मधून
  • अभिनेत्री गायत्री जोशी यांचा अपघात

    News34 chandrapur

    वृत्तसेवा – शाहरुख खानची स्वदेस को-स्टार गायत्री जोशी आणि तिचा बिझनेसमन पती विकास ओबेरॉय यांचा नुकताच इटलीमध्ये कार अपघात झाला, ज्यामुळे एका वृद्ध स्विस जोडप्याचा दुःखद मृत्यू झाला.

    गायत्री जोशी व तिचा पती विकास ओबेराय हे इटलीमध्ये प्रवास करीत असताना अचानक लक्झरी कार चा ताफा रस्त्याने जाऊ लागला, जोशी यांच्या लक्झरी कार ने मिनी ट्रक ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ट्रक ला धडक दिल्याने असंख्य कार रस्त्यावर पलटी झाल्या.

     

    या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला, अभिनेत्री गायत्री जोशी व तिचा पती विकास ओबेराय हे किरकोळ जखमी झाले आहे.

    कोण आहे गायत्री जोशी?

    1999 च्या फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत गायत्री जोशी अंतिम पाच उमेदवारांपैकी एक होती. तिने सन 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब जिंकला आणि सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर तिला मुकुट घातला गेला. तिने जपानमध्ये मिस इंटरनॅशनल 2000 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

    काही म्युझिक व्हिडिओंमध्ये अभिनयासोबतच जोशी यांनी काही काळ जाहिरातींचे मॉडेल म्हणूनही काम केले आहे. ते जगजित सिंग यांच्या ‘कागज की कष्टी’चे लेखक आहेत; आणि हंस राज हंसच्या ‘झांझरिया’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘स्वदेस’ या चित्रपटात त्यांनी काम केले, जो त्यांचा आतापर्यंतचा एकमेव चित्रपट आहे. या चित्रपटातून तिने शाहरुख खानसोबत डेब्यू केले आणि आजही लोकांना हा चित्रपट आवडतो. पण यानंतर ती ग्लॅमर इंडस्ट्रीत कधीच दिसली नाही.

     

    गायत्री जोशी यांनी बॉलिवूडचा कायमचा निरोप घेताच वर्षभरातच तिचे नशीब सुधारले. कारण तिने 2005 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती विकास ओबेरॉय सोबत लग्न केले होते. तिचे पती सध्या 65 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत आणि गायत्री जोशी देखील त्यांच्यासोबत श्रीमंत लोकांच्या श्रेणीत सामील झाल्या आहेत.

     

    गायत्री जोशी यांचे पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यांचे मार्केट कॅप सुमारे 30,000 कोटी रुपये आहे. 52 वर्षीय विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती 3.5 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सनुसार, तो सध्या 65 व्या क्रमांकाचा श्रीमंत भारतीय आहे. आता ही ४६ वर्षीय अभिनेत्री पती विकास आणि दोन मुलांसह मुंबईत राहते. आता तो केवळ फिल्मी दुनियेपासून दूर नाही तर सोशल मीडियावरही सक्रिय नाही.

    आज इतक्या वर्षांनी अपघाताच्या घटनेमुळे गायत्री जोशी पुन्हा चर्चेत आल्या आहे.

  • सामी हॉटेल्सचा आयपीओ आजपासून उघडला

    News34 chandrapur

    मुंबई  – सामी हॉटेल्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सदस्यत्वासाठी गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तीन दिवसांची बोली प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी संपेल. कंपनीने तिच्या समभागासाठी प्रति इक्विटी शेअर 119-126 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

     

    पहिली सार्वजनिक ऑफर

    गुंतवणूकदार 119 इक्विटी शेअर्ससाठी एका लॉटमध्ये आणि त्यानंतर अनेकांमध्ये बोली लावू शकतात. SAMHI हॉटेल्सचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 35 रुपयांच्या प्रीमियमवर होते. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत बाजार आहे ज्यामध्ये IPO शेअर्सची सूची होईपर्यंत खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते.

     

    कंपनी बाबत सविस्तर माहिती

     

    सामी हॉटेल्स हे भारतातील एक प्रसिद्ध हॉटेल मालकी आणि मालमत्ता व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे, जे 31 मार्च 2023 पर्यंत देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या ऑपरेशनल कीजच्या यादीत आहे. स्थापनेपासून केवळ 12 वर्षांमध्ये, कंपनीने 3,839 की चा पोर्टफोलिओ स्थापित केला आहे.

     

    भारतातील 12 प्रमुख शहरी केंद्रांमध्ये 25 कार्यरत हॉटेल्स. बेंगळुरू, हैदराबाद, NCR, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि इतर प्रमुख शहरांमधील मालमत्तांसह, SAMHI हॉटेल्सने या प्रदेशांमधील दर्जेदार निवासाच्या वाढत्या मागणीचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. हॉटेल्सचे मोक्याचे स्थान व्यवसाय जिल्हे, पर्यटन स्थळे आणि वाहतूक केंद्रांमध्ये सहज प्रवेश सुनिश्चित करते, ज्यामुळे ते व्यवसाय आणि विश्रांती प्रवास करणाऱ्यांसाठी एक पसंतीचे पर्याय बनतात.

    10 ऑगस्ट, 2023 रोजी, कंपनीने ACIC अधिग्रहण पूर्ण केले, 31 ऑपरेटिंग हॉटेल्समध्ये 4,801 की पर्यंत पोर्टफोलिओचा विस्तार केला. हे संपादन SAMHI हॉटेल्सची सतत वाढीसाठी बांधिलकी आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाच्या वाढत्या मागण्यांशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शवते.

  • तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं सत्य

    News34

    मुंबई/ नुकत्याच ott वर प्रदर्शित झालेल्या ताली या वेबसिरीज च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली गौरी सावंत यांनी वृत्त वाहिनीवर दिलेली मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे.

     

    तृतीयपंथी यांच्या जीवन शैलीवर त्यांनी प्रकाश टाकत अनेक गुपित उघड केली आहे. यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे तृतीयपंथी दाढी कशी करतात? यामागील त्यांनी सत्य सांगितले आहे.

     

    दाढी करणे हे अनेकांसाठी नित्याचे काम आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रान्सजेंडर महिलांसारखे तृतीयपंथी ही प्रक्रिया कशी नेव्हिगेट करतात? गौरी सावंत, एक प्रमुख कार्यकर्त्या आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्या, या विषयावर प्रकाश टाकतात.

     

    गुरू किंवा गुरू शोधणे ही त्यांच्याकडे असलेली चैनी नाही यावर सावंत भर देतात. त्याऐवजी, ते उपलब्ध असलेल्यांकडून शिकतात. बहुतेक लोकांना त्यांच्या पालकांच्या घरी साडी कशी घालायची किंवा व्यवस्थित बसायचे हे शिकवले जात असताना, सावंत यांच्या गुरूंनी तिला या पारंपारिक पद्धतींची गुंतागुंत शिकवली. मात्र, जसजशी दाढी वाढू लागते, तसतसे नवे आव्हान निर्माण होते.

     

    चेहऱ्यावरील केस काढणे सोपे काम नाही, विशेषतः महिलांसाठी. एका वेळी एक केस उपटण्यासाठी चिमटा वापरण्याचा अनुभव सावंत सांगतात. ती स्पष्ट करते की ही प्रक्रिया वेळखाऊ पण आवश्यक आहे. शरीरात पुरुष संप्रेरकांची उपस्थिती चेहर्यावरील केस काढणे अधिक आव्हानात्मक बनवते. सावंतचे गुरू धीराने या तंत्राचे प्रात्यक्षिक करतात, तिच्या मांडीवर झाकण ठेवून काळजीपूर्वक प्रत्येक केस मुळापासून काढून टाकतात.

     

    दोन रुपयांच्या ब्लेडने मुंडण करणे आणि केस मुळापासून उपटणे यातील फरक सावंत अधोरेखित करतात. शेव्हिंगला दररोज पुनरावृत्तीची आवश्यकता असताना, मुळापासून केस उपटणे दीर्घकाळ टिकणारे परिणाम देते, अंदाजे 15 दिवसांनी पुन्हा वाढ होते.

     

    हे मौल्यवान धडे ट्रान्सजेंडर समुदायातील गुरूंनी दिले आहेत. ते ट्रान्सजेंडर महिलांसमोरील अनन्य आव्हाने समजून घेतात आणि त्यांना आत्मविश्वासाने जगामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवतात.

  • Breaking Barriers: Empowering Women in Bulgaria

    बल्गेरियातील वधू बाजार प्रामुख्याने कलैदझी समुदायाद्वारे आयोजित केला जातो, जो केवळ त्यांच्या स्वत:च्या समुदायातील सदस्यांना सहभागी होण्याची परवानगी देतो.  हे वधू आणि वर यांच्यातील सांस्कृतिक सुसंगतता आणि सामायिक अनुभवांची पातळी सुनिश्चित करते.  याशिवाय, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठीच वधू विक्रीला परवानगी आहे.

    हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे व्यवहार सक्तीचे विवाह नाहीत, तर त्या तरुण स्त्रियांसाठी मार्ग प्रदान करण्याचा एक मार्ग आहे ज्यांना अन्यथा संधी मिळाली नसती.  या बाजारासाठी सरकारची परवानगी बल्गेरियामध्ये स्वीकारलेली प्रथा म्हणून त्याचे अस्तित्व आणखी प्रमाणित करते.

    Introduction

    Welcome to our blog post! Today, we want to shed light on a unique tradition that has been taking place in Bulgaria for years – the bride market. While this practice may raise eyebrows, it is important to approach it with an open mind and consider the cultural context in which it exists. Our aim is to highlight the resilience and strength of the women involved, and the potential for positive change in their lives.

    The Empowerment of Choice

    In the small town of Stara Jagor, Bulgaria, a unique market takes place. This is not your typical market, as it is dedicated to the sale of brides. However, it is essential to understand that this practice primarily caters to families who are financially struggling and unable to afford elaborate weddings for their daughters.

    At this bride market, families bring their daughters, and potential suitors come to choose a bride. The girl’s family then negotiates a price until both parties are satisfied. Once a deal is reached, the bride is handed over to the groom, and they begin their life together.

    While it may be challenging to comprehend this tradition, it is crucial to acknowledge that the girls’ families have made a conscious decision to participate. They believe that this route offers a better future for their daughters, ensuring economic stability and a supportive partner.

    Behind the Scenes

    The bride market in Bulgaria is primarily organized by the Kalaidzhi community, who only allow members of their own community to participate. This ensures a level of cultural compatibility and shared experiences between the bride and groom. Additionally, the selling of brides is only permitted for families facing financial hardships.

    It is important to note that these transactions are not forced marriages, but rather a way to provide a pathway for young women who may not have had the opportunity otherwise. The government’s permission for this market further validates its existence as an accepted practice in Bulgaria.

    A Path to Empowerment

    Looking beyond the initial shock, we can find hope in the potential for positive change in the lives of these women. By participating in the bride market, they are given a chance to break free from the cycle of poverty and create a better future for themselves.

    It is vital to understand the cultural nuances and historical context of practices like the bride market in Bulgaria. As we move forward, it is our responsibility to support the empowerment of women by advocating for equal opportunities, education, and economic independence.

    Conclusion

    While the bride market may seem unconventional to many, it is crucial to approach it with an open mind and consider the cultural complexities at play. Our hope is to encourage dialogue and foster understanding, ultimately working towards a more inclusive and equal society. By supporting the empowerment of women, we can pave the way for positive change and a brighter future for all. Let us stand together on this journey towards equality.