Author: Admin

  • लोकसभेत खासदार धानोरकरांच्या प्रश्नावर धक्कादायक वास्तव समोर

    lung cancer in women : चंद्रपूर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग पंजीकरण कार्यक्रमाच्या अभ्यासामध्ये देशातील महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासानुसार, महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ५३% प्रकरणे ‘एडेनोकार्सिनोमा’ या प्रकाराची आहेत, जो “गैर-धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा सर्वात सामान्य हिस्टोपॅथोलॉजिक प्रकार” आहे. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांचा पाठपुरावा यशस्वी, चंद्रपूर मनपात आता IAS दर्जाचा अधिकारी आयुक्त)

    १९८२ ते २०१६ या दीर्घ कालावधीत महानगरांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये लक्षणीय वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या २२८२ अंतर्गत केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. त्यात हि गंभीर आकडेवारी समोर आली आहे. 

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे क्षयरोगाशी (टीबी) मिळतीजुळती असल्याने निदानात होणाऱ्या विलंबाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावर शासनाने स्पष्ट केले की, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत, क्षय रोगाच्या तपासणीदरम्यान कर्करोगाची शंका आल्यास, रुग्णांना त्वरित पुढील निदान व उपचारांसाठी विशिष्ट केंद्रांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कर्करोगाच्या रुग्णांना टीबीसाठी संवेदनशील मानले जाऊन त्यांच्या नियमित तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरात ३९ संस्थांना मंजुरी देण्यात आली असल्याची आकडेवारीही सभागृहात सादर करण्यात आली. lung cancer in women

    फुफ्फुसांच्या कर्करोगाचे एक अप्रत्यक्ष कारण म्हणून वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम लागू केला आहे. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सध्या २४ राज्ये/संघ राज्य क्षेत्रांमधील १३० शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेला हा गंभीर सार्वजनिक आरोग्य विषय आणि त्यावरील शासनाच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. संबंधित समस्या सोडविण्यासाठी शहर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ वायू कृती योजनांच्या माध्यमातून अंमलात आनंत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. 

  • नागपूर हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा; चंद्रपूर व घुग्गुस वासियांसाठी आनंदाची बातमी

    Chandrapur land patta update : चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर आणि घुग्घुस परिसरातील नझूल जमिनीवरील घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून नझूल पट्टेवाटपाची मोहीम तातडीने सुरू करणार असल्याचे सांगत चंद्रपूर–घुग्घुस येथे पट्टे वाटप करण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचे सांगितले आहे. (हे हि वाचा – व्हाट्सअप वर येणाऱ्या ह्या लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा होणार मोठी फसवणूक)

    आमदार जोरगेवार यांच्या मागणीची दखल

    चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने करत असून याचा पाठपुरावा त्यांच्या वतीने केला जात आहे. आ. जोरगेवार यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई आणि चंद्रपूरमध्येही बैठका घेतल्या आहेत.

    दरम्यान नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 55 हजार झोपड्या आणि 12 हजारांहून अधिक घरे नझूल जमिनीवर आहेत. या नागरिकांना कायदेशीर हक्क देण्यासाठी मोजणी करण्याचा खर्च खनिज विकास निधीतून उपलब्ध करावा, यासंदर्भात महसूल मंत्री यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे ही मोहीम तात्काळ सुरू व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. Chandrapur land patta update

    या मागणीवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, चंद्रपूर व घुग्घुस येथील नझूल जमिनीवरील 31 झोपडपट्ट्यांना (भाग) पट्टे देणे शक्य आहे. मात्र त्यासाठी पीटीएस, डबल सर्व्हे आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी आवश्यक तेवढी पीएमसी नेमण्याची आमची तयारी आहे. चंद्रपूर महानगरपालिका या कामासाठी तयार आहे आणि लागणारा निधी खनिज निधीतून मिळेल, असेही ते म्हणाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून नझूल पट्टेवाटपाची मोहीम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले आहे. या घोषणेमुळे चंद्रपूर आणि घुग्घुस परिसरातील नझूल जमिनीवर राहणाऱ्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्र्यांचे आभार मानने आहे. ही मागणी मान्य झाल्यामुळे हजारो कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

  • चंद्रपूरच्या युवा कुस्तीपटूची मोठी कामगिरी; वेदश्री मॅकलवारला कांस्यपदक

    school wrestling championship : चंद्रपूर, १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूरच्या क्रीडा जगतात एक अत्यंत अभिमानास्पद घटना घडली आहे. येथील कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा, चंद्रपूर येथील १४ वर्षांखालील कुस्तीपटू वेदश्री महेश मॅकलवार हिने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात IAS दर्जाचा अधिकारी आयुक्तपदी)

    वेदश्री माकलवार हिने ८ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत ओरस जिल्हा सिंधदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या ५० किलो वजन गटात तृतीय क्रमांक (कांस्यपदक) मिळवला आहे.

    कठोर मेहनत, जिद्द, बुद्धी आणि कुस्तीच्या शास्त्रोक्त बळाचा अचूक प्रयोग करत तिने हे यश संपादन केले आहे.
    वेदश्रीच्या या यशामागे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेतील प्रशिक्षक श्री.भुपेंन्द्र अवघडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच तिचे वडील महेश मॅकलवार, यांचे विशेष योगदान आणि मार्गदर्शन होते. school wrestling championship

    वेदश्रीच्या या शानदार कामगिरीमुळे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेसाठी , विद्या निकेतन हायस्कुल आणि संपूर्ण चंद्रपूर शहरासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.

    जय बजरंग व्यायाम व क्रीडा प्रसारण मंडळ बाबुपेठ , येथिल सदस्यांनी वेदश्रीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व वेदश्री मॅकलवार हिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा! तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूरचे नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रसंगी जय बजरंग व्यायाम व क्रीडा प्रसारण मंडळाचे सदस्य श्री. सुरेश मॅकलवार, शिर्षल पोटदुखे , सचिन आक्केवार,उमंग हिवरे, योगेश जिवतोडे, हर्षल पोटदुखे , पराग गोंड्रालवार व शंकर नवले हे उपस्थित होते.

  • खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश; चंद्रपूर मनपात IAS अकनुरी नरेश आयुक्तपदी

    IAS officer appointment : चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शहराच्या नियोजित विकासाला योग्य दिशा देण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली महापालिका आयुक्त पदावर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार,अकनुरी नरेश, भाप्रसे यांची महापालिका आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. (हे हि वाचा – देशाला हादरविणारे चंद्रपुरातील अत्याचार प्रकरण)

              खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्राद्वारे ही मागणी केली होती. त्यांनी आपल्या पत्रात चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील प्रशासनात शिस्तीचा अभाव आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे नमूद केले होते. तसेच, विकासकामांना गती मिळत नसून, निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे आणि कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा तसेच रस्ते यांसारख्या मूलभूत गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शहराचा विकास साधण्यासाठी, एक कर्तव्यदक्ष आणि सक्षम IAS अधिकारी नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली होती.  IAS officer appointment

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या लोकहिताच्या मागणीचा विचार करून, शासनाने त्वरित कार्यवाही केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने अकनुरी नरेश यांची नियुक्ती विद्यमान प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या जागी केली आहे. यापूर्वी अकनुरी नरेश हे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उप विभाग, नाशिक येथे कार्यरत होते.

    या नियुक्तीमुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात सुधारणा होऊन भ्रष्टाचार नियंत्रणात येऊन पारदर्शकता वाढेल आणि शहराच्या विकासाला योग्य व दूरदृष्टीची दिशा मिळेल, अशी अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली होती, जी आता पूर्ण झाली आहे.

  • बसपा माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा भाजपा प्रवेश

     Sudhir Karangal Joins BJP चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे भारतीय जनता पक्षात महत्त्वपूर्ण प्रवेश घडला. बहुजन समाज पार्टीचे इंडस्ट्रियल प्रभागाचे सलग तीन दा नगर सेवक राहिलेले माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोम, तसेच प्रकाश देवतळे, सुमित गुप्ता, हर्ष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

         गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. कॉंग्रेससह इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाचा संघटनात्मक विस्तार वेगाने वाढत आहे. (हे हि वाचा – मोरवा विमानतळासाठी ६ कोटी मंजूर, मुनगंटीवार यांचा पाठिंबा)

        आज सुधीर कारंगल यांनीही ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश करून भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे. Sudhir Karangal Joins BJP

               यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमांवर उभा असलेला पक्ष आहे. आम्ही विकास, पारदर्शकता आणि लोकहित यांना प्राधान्य देणारे समाजकारण करतो. सुधीर कारंगल यांसारख्या समाजाभिमुख नेत्याचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

        गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आमच्यात सामील झाले आहेत. हा विश्वास आम्ही विकासकामांद्वारे आणि जनसेवेच्या माध्यमातून मिळवला आहे. असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • मोरवा–विमानतळ मार्ग उन्नतीला ६ कोटींची मंजुरी; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    Morwa Airport Road Upgrade : चंद्रपूर, दि.१२ डिसेंबर २०२५ (News३४) -राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून मोरवा ते मोरवा विमानतळ मार्गाच्या सुधारणा व उन्नतीसाठी तब्बल ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतूक सुलभता लक्षात घेता अत्यावश्यक असलेल्या या कामासाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.

    मोरवा विमानतळ परिसरात नागपूर उडान क्लबच्या DGCA-अनुमोदित प्रशिक्षण सुविधा कार्यरत आहेत. सुरक्षित आणि आधुनिक विमान संचालनासाठी दर्जेदार रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, विमानतळाच्या आधुनिकीकरणासोबत जोडणाऱ्या मार्गाचे उन्नतीकरण अत्यावश्यक झाले होते. यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे मागणी करत सविस्तर पाठपुरावा केला होता. (हे हि वाचा – १४ वर्षीय मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार)

    रस्ता सुधारणा झाल्यानंतर वैमानिक प्रशिक्षण, विमानतळ सेवा, तसेच स्थानिक रहदारी या सर्वांना मोठा दिलासा मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्याच्या विमानतळ विकासाला नवी गती मिळणार आहे. Morwa Airport Road Upgrade

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, मोरवा विमानतळाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून चंद्रपूरच्या भविष्यातील प्रगतीचा कणा आहे. विमानतळाशी जोडणारा मार्ग सुरक्षित, मजबूत आणि दर्जेदार झाल्यावर प्रशिक्षण संस्था, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या संधींना व्यापक चालना मिळेल. चंद्रपूरला आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावे आणि येथील तरुणांना हवाई सेवा क्षेत्रात नवी दारे खुली व्हावीत, हे माझे सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

  • चंद्रपूर शहर महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासनासाठी आयएएस दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करा

    Chandrapur municipal commissioner : चंद्रपूर, दि. १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सध्या कार्यरत आयुक्त हे केवळ चार्जवर असून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच शहरातील विकास प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेत तात्काळ पूर्णवेळ आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

    व्यापक क्षेत्रफळ, वाढते प्रशासनिक दायित्व आणि निवडणुका न झाल्यामुळे निर्माण झालेल्या स्थगित परिस्थितीमुळे अनेक नागरिकाभिमुख सुविधा व विकासकामांना गती मिळत नाही. शहराची लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेता अनुभवी आयएएस अधिकारी असणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर स्वनियंत्रण राहील, निर्णयप्रक्रियेला वेग येईल आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळेल.

    सध्या निवडणुका न झाल्यामुळे शहरातील अनेक प्रकल्प, मूलभूत सुविधा व विकास आराखडे अर्धवट स्थितीत आहेत. नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी निदर्शनास आणले.

    चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पूर्णवेळ आयुक्त नेमणे आवश्यक असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केली.

  • नायलॉन मांजामुळे धोका वाढतोय; चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

    police crackdown manjha : चंद्रपूर ११ डिसेंबर (News३४) – मकरसंक्रांती पूर्व पतंगप्रेमी आतापासून पतंगोत्सव सुरु करतात मात्र यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नायलॉन मांजाची विक्रीवर आळा यावा याकरिता चंद्रपूर पोलीस विभागाने मूल व दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई केली.

    १० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने केली, मुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना नायलॉन मांजा बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. (हे हि वाचा – बल्लारपूर मध्ये देशी कट्ट्याचा सुळसुळाट)

    नागोसे मोहल्ला मूल या भागात राहणाऱ्या २० वर्षीय साहिल नागोसे यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा ३४ मग प्लास्टिक चक्री किंमत १७ हजार रुपये जप्त करण्यात आला. आरोपी साहिल नागोसे वर पोलीस स्टेशन मूल मध्ये कलम २२३, २९२, ३३६ व ५६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. police crackdown manjha

    दुसऱ्या कारवाईत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधी संघर्ष बालकाकडून मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजा mono kite fighter ३० मग प्लास्टीकी चक्री किंमत ३० हजार रुपये जप्त करण्यात आला. विधी संघर्ष बालकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाचा अवैध साठा करून ठेवला होता. या प्रकरणी एकूण ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि दुर्गापूर पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोउपनि संतोष निंभोरकर, धनराज करकाडे, अजित शेंडे, प्रफुल गारघाटे, पोउपनि प्रवीण बिंकलवार, शार्दूल, मोरेश्वर गोरे, मंगेश शेंडे व सोनल खोब्रागडे यांनी केली.

    जिल्ह्यात कुठेही व्यापारी नायलॉन मांजा विक्री करीत असले किंवा साठवणूक केला असेल त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

  • १४ वर्षीय मुलीवर पोलिसांनी केला अत्याचार; ५० वर्षांनंतरही न्यायाची लढाई

    Mathura Rape Case 1972 Chandrapur : चंद्रपूर, दि. 11 डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे 1972 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार प्रकरणातील पीडिता मथुरा ताईंना आजही आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत स्वतः नवरगावला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. हलाखीच्या आणि अर्धांगवायूग्रस्त अवस्थेत राहत असलेल्या मथुरा ताईंसाठी डॉ. गोऱ्हे यांनी आवश्यक तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी संतोष थिटे अतिरिक्त जिल्हाधिकारी, किशोर घाडगे एसडीओ, विजया झाडे तहसीलदार, आत्मज मोरे गट विकास अधिकारी व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या. (हे वाचा – चंद्रपूर शहरात घरफोडीच्या मालिका सुरु)

    डॉ. गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मथुरा ताईंना वैद्यकीय उपचार, पेन्शन, अन्नधान्य, घरकुल, आर्थिक ठेव तसेच सर्व संबंधित कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळवून देण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने तत्परता दाखवत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या असून आजच्या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी त्याचा सविस्तर आढावा घेतला. पुढील सहाय्य, पुनर्वसन आराखडा आणि देखरेख यंत्रणा याबाबत अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सखोल चर्चा केली.

    याप्रसंगी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मथुरा ताईंच्या प्रकरणाचा उल्लेख माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही केला होता. त्या काळी पीडित महिलेला न्याय नाकारला गेला आणि त्यानंतर ‘कस्टोडियल जस्टिस टू विमेन’ कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही विद्यार्थी व स्त्री मुक्ती आंदोलनात दीर्घ संघर्ष केला. जवळजवळ वीस वर्षांच्या लढ्यानंतर हा महत्त्वाचा कायदा देशाला मिळाला. त्या स्त्रीच्या वेदनेतून कायदा बदलला, पण आज त्या स्वतःच गंभीर विपन्नावस्थेत आहेत—ही बाब निश्‍चितच वेदनादायी आहे.”

    मथुरा ताईंच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या मुलांना स्थिर रोजगार, घरकुल आणि आवश्यक शासकीय लाभ तातडीने देण्याचे निर्देश दिले. “कुटुंबासमोर वारंवार कागदपत्रांची मागणी करून अडथळे निर्माण करू नयेत. ग्रामसेवकाला नोडल अधिकारी नेमून प्रत्येक शासकीय भेटीची नोंद व फोटो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे बंधनकारक करावे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. Mathura Rape Case 1972 Chandrapur

    प्रकरण काय?

    26 मार्च 1972 रोजी (तत्कालीन चंद्रपूर जिल्हा) देसाईगंज पोलीस ठाण्यात (सध्या गडचिरोली जिल्हा) गणपत व तुकाराम या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी 14 वर्षीय मथुरा वर अत्याचार केला होता, अपहरणाची तक्रार मथुरा ने दिली होती, सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी मथुरा ला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते, याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी मथुरेवर अत्याचार केला होता. अत्याचार प्रकरणात पुरावे नसल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय उलटवित आरोपींना दोषी ठरविले, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करीत आरोपी पोलिसांची सुटका केली होती, या निर्णयानंतर 1979 च्या काळात देशभरात संताप उसळला होता, देशव्यापी आंदोलन झाले, जनतेच्या दबावाने वर्ष 1983 मध्ये अत्याचार कायद्यात मोठे बदल करण्यात आले, या घटनेचा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाषणात उल्लेख केला होता.

    त्या पुढे म्हणाल्या, “अनेक लोक कागदपत्रे घेऊन जातात; पण त्याचा उद्देश मथुरा ताईंना कळत नाही. आता येणाऱ्याने ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असावे. विधिमंडळ हे माणसांसाठी आहे; म्हणूनच अधिवेशन सुरू असतानाही मी इथे आले. ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, त्या स्त्रीला समाजाने न्याय दिलाच पाहिजे. मथुरा ताईंच्या नावाने मदतीचा गैरवापर होऊ नये, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.”

    माध्यमांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक करत त्या पुढे म्हणाल्या, “न्याय नेहमी न्यायालयातूनच मिळतो असे नाही; काहीवेळा कायदे बदलूनही न्याय द्यावा लागतो. महिलांच्या चळवळीच्या इतिहासातील हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.”

    डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सक्रीय पुढाकारामुळे मथुरा ताईंच्या स्वास्थ्य, सुरक्षेसाठी सातत्याने देखरेख ठेवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • चंद्रपूरच्या रेल्वे समस्या सोडवा – आ. किशोर जोरगेवार

    Superfast train Chandrapur : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील सुरू असलेल्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रवाशांच्या सर्व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी हा प्रश्न सभागृहात पुन्हा मांडत राज्य सरकारने या मागण्यांचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे तातडीने करावा अशी मागणी केली. (हे वाचा – मुंबई, पुणेसाठी डेली ट्रेन हव्या, खासदार धानोरकर यांची लोकसभेत मागणी)

    सभागृहात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले,
    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी संख्या प्रचंड आहे. विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक तसेच उद्योग क्षेत्राच्या वाढत्या गरजांमुळे रेल्वे सुविधांचा विस्तार अत्यावश्यक झाला आहे. त्यामुळे या मागण्या केवळ प्रवासी संघटनांच्या नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या आहेत.

    यावेळी त्यांनी चंद्रपूर–मुंबई दैनंदिन सुपरफास्ट सेवा, चंद्रपूर–नागपूर शटल सेवा, गोंदिया दुरंतो एक्स्प्रेसची सुरुवात चंद्रपूरहून करण्याची गरज, तसेच चंद्रपूर–कोलकाता अशी चंद्रपूरची माता महाकाली ते कलकत्ता ची महाकाली थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. या सर्व मागण्या जनहिताच्या असून तातडीने अमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. Superfast train Chandrapur

    आमदार जोरगेवार यांनी राज्य सरकारला या मागण्या त्वरित केंद्र शासनाकडे पाठवून चंद्रपूरकरांच्या दीर्घकालीन अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.

     

    “चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्यात आयरन-आधारित मोठा उद्योग उभारा — आ. किशोर जोरगेवार

    नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की या परिसरात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता असून याचा व्यापक फायदा स्थानिक विकासाला होणार आहे.

    या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये आयरन-आधारित मोठा उद्योग उभारण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. Chandrapur iron industry

    ते म्हणाले, चंद्रपूरचे भौगोलिक स्थान, खनिजसंपत्ती आणि उपलब्ध संसाधने पाहता आयरन उद्योगासाठी हा भाग सर्वाधिक उपयुक्त आहे. असा उद्योग उभा राहिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल आणि या भागात औद्योगिक वाढीस मोठे चालना मिळेल. या विषयात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी सभागृहात केली.