Author: Admin

  • Shiva Wazarkar Chandrapur : चंद्रपूर चे मिर्झापूर होणार का? आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा संतप्त सवाल

    Shiva Wazarkar Chandrapur : चंद्रपूर चे मिर्झापूर होणार का? आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा संतप्त सवाल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहराची कायदा व सुव्यस्था तसेच शांतता व सलोख्यासाठी ओळख आहे. परंतू सद्या चंद्रपूर शहराला कोणाची नजर लागली हे कळत नाही. शहरात अवैध धंद्यासोबत खुनी सत्र सुरु असून याला वेळीच आवर न घातल्यास चंद्रपूर चे मिर्झापूर होण्यास वेळ लागणार नाही अशी संतप्त भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्व. शिवा वझरकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी दरम्यान व्यक्त केली. Mla pratibha dhanorkar

     

     

    चंद्रपूर शहरात बेरोजगारी वाढत चालली असून काही युवक अवैध धंद्याच्या मार्गातून झटपट पैसा कमविण्याच्या हेतू ने तरुण युवकांना हाताशी धरुन गुंडागर्दी तसेच अवैध मार्गाकडे वळवित असल्याचे चिन्ह सध्या चंद्रपूर शहरात दिसून येत आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात निरपराध शिवा वझरकर या तरुण युवकाला घोळक्याने संघटीत गुन्हेगारीचा वापर करुन हत्या केली.

     

     

    या हत्येचा निषेध व्यक्त करुन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिवा वझरकर यांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आरोपींवर मोक्का कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी आपण येणाऱ्या काळात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन अशा घटना होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने पाऊले उचलावी अशा सुचना करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

     

    या भेटी वेळी कॉग्रेस चे शहर अध्यक्ष रामू तिवारी, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, कॉग्रेस नेते उमाकांत धांडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, संदीप सिडाम, प्रविण काकडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Chandrapur Play Janta Raja : महानाट्य जाणता राजा बघण्यासाठी आता पास ची गरज नाही

    Chandrapur Play Janta Raja : महानाट्य जाणता राजा बघण्यासाठी आता पास ची गरज नाही

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला 2 फेब्रुवारी पासून आले आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत. Janta raja

     

    2 फेब्रुवारीला जाणता राजा महानाट्य उदघाटन कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला, नागरिकांचा नाटकाला मिळालेला प्रतिसाद बघता पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 5 फेब्रुवारीला सदर प्रयोग हा विना पास ने सर्व सामान्य नागरिकांना आयोजित करण्यात आल्याची घोषणा उदघाटन कार्यक्रमात केली. No pass required

     

    राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगला.

     

     

    दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

  • Chandrapur Pollution : रासायनिक द्रव्याच्या नमुन्यामध्ये फेरफार, चौकशी करा – राजेश बेले

    Chandrapur Pollution : रासायनिक द्रव्याच्या नमुन्यामध्ये फेरफार, चौकशी करा – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. Air pollution

     

    प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव आणि प्रभारी वैज्ञानिक अधिकारी श्री. बिपीन भंडारी यांच्यावर M/s. Sunflag Iron and Steel Co. Ltd. बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक द्रव्यांच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा आरोप आहे. 16 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या नमुन्यांच्या विश्लेषण अहवालात हे फेरफार करण्यात आले असल्याचे आरोप आहे. Chandrapur heavy pollution

     

     

    श्री. बेले यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही अधिकारी 2023 पासून पदावर आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक जल आणि वायू प्रदूषणाच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. यामुळे औद्योगिक कंपन्यांना फायदा झाला आहे आणि पर्यावरणाचे नुकसान झाले आहे.

     

     

    या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी श्री. बेले यांनी केली आहे.

  • Convocation ceremony :  डॉ.अपर्णा ढेले (कासराळे) आचार्य पदवीने सन्मानित

    Convocation ceremony : डॉ.अपर्णा ढेले (कासराळे) आचार्य पदवीने सन्मानित

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झालेल्या ३७ व्या दीक्षांत समारंभात डॉ. अपर्णा मन्मथ ढेले (कासराळे) यांना कृषी विस्तार शिक्षण विभागातील संगमनेरी शेळी वरील “Adoptation Of Management Practices and Utility Perception Of Sangamneri Goat Rearers and Non Discriptive Goat Rearers- A comparitive Study” या प्रबंधासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू श्री.प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते पदवीदान समारंभात आचार्य पदवी (PhD) बहाल करुन सन्मानित करण्यात आले.

     

     

    आचार्य पदवी प्राप्त करनाऱ्या डॉ.अपर्णा ढेले ( कासराळे) ह्या सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील बँक ऑफ इंडिया बेंबाळ शाखेत कृषी अधिकारी या पदावर असून मुल तालुका कृषी अधिकारी मूल श्री. प्रशांत कासराळे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांना लहान पणापासून अभ्यासाचं व्यासंग असून त्यांच्यात जिद्द,चिकाटी, परिश्रम घेण्याची त्यांच्या अंगी गुण असल्याने एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सेवा करीत असतानाही त्यांनी अभ्यासासाठी आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून अभ्यास केला आणि आपला प्रबंध विद्यापीठाकडे सादर करुन हे यश प्राप्त केले आहे.

     

    डॉ.अपर्णा ढेले ह्या मुल तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांच्या सुविज्ञ पत्नी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या प्राध्यापक वृंदामधे, कुटुंबीयासमवेत इतर शुभचिंतक, मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

  • Chandrapur Janta Raja : चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून वादाचे महानाट्य

    Chandrapur Janta Raja : चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून वादाचे महानाट्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात 2 फेब्रुवारी पासून सांस्कृतिक मंत्रालय व चंद्रपूर मनपाच्या वतीने जाणता राजा महानाट्याला सुरुवात झाली मात्र त्या महानाट्य आधी चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून नव नाट्य नागरिकांना मुख्य मार्गावर बघायला मिळाले. Janta raja play

     

    2 फेब्रुवारीला दुपारी भाजप व यंग चांदा ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली. Chandrapur political drama

     

    स्थानीक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या समोर नाटक बघायला येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य स्वागत गेट उभारले, त्याठिकाणी 2 बाजूने स्वागत गेट उभारण्याची परवानगी आमदार जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती मात्र त्यावेळी भाजप व आमदार जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागत गेट लावण्यावरून नवा वाद सुरू झाला.

     

    दोन्ही गटाच्या बाचाबाची नंतर एकीकडे आमदार जोरगेवार यांचे स्वागत गेट तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री मुनगंटीवार यांचे स्वागत गेट लावण्यात आले.

  • Shiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

    Shiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आठवडाभरापूर्वी घडलेल्या शिवा वझरकर या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपातील आरोपी स्वप्नील काशिकरच्या कार्यालयातून शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या घटनेने चंद्रपूर महानगरात खळबळ उडाली आहे. Chandrapur news

     

    25 जानेवारी ला चंद्रपुर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील अरविंदनगर परिसरात ७-८ इसमांनी मिळून शिवा वझरकर या इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. या घटनेने चंद्रपुर महानगरात एकच खळबळ माजली होती. सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहून या घटनेचा तपास गुन्ह्याचा पोलीस अधिक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता वेगवेगळी पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आठ आरोपीतांना अटक केली. Shiva wazarkar chandrapur

     

     

    अटकेतील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर विविध गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यात आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याचा रेतीचा तसेच ट्रांसपोटींगचा व्यवसाय आहे. यातील मृतक हा यापुर्वी स्वप्नील काशिकर याचे कडेच ठेकेदारीचे काम करायचा. पुढे चालून वर्चस्वाच्या तसेच पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून स्वप्नील काशिकार याचे ऑफीसचे समोरील मोकळ्या जागेतच शिवा वाझरकरची हत्या करण्यात आली.

     

    पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान स्वप्नील काशिकर याचे ऑफीसची झडती घेतली असता त्याचे ऑफीसचे सोफ्यातून एक लोखंडी तलवार, एक एअर गन, ऑफीस टेबलचे खाली एक लोखंडी तलवार, एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा मिळून आला. सदरचा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेण्यात आला. सदर शस्त्रसाठा कुठून आणला याबाबत आरोपीतांकडून सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

     

    ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सपोनि. नागेशकुमार चतरकर, सपोनि. किशोर शेरकी, सपोनि. विकास गायकवाड, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. सुधिर मत्ते, पोशि. नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे, प्रमोद कोटनाके, चापोहवा. प्रमोद डंभारे, चापोशि. रूषभ बारसिंगे यांनी केली.

  • Chandrapur Wcl News : एक ही डिस्पैच नम्बर के दो आदेश, चंद्रपुर वेकोलि कार्यालय का मामला

    Chandrapur Wcl News : एक ही डिस्पैच नम्बर के दो आदेश, चंद्रपुर वेकोलि कार्यालय का मामला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोल इंडिया की अनुषंगी कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मे कार्यरत कर्मचारियों द्वारा लिपिक ग्रेड 3 के लिए आवेदन किये थे। उक्त पद के लिए 4 फरवरी को परीक्षा हेतु 28 कर्मचारियों को परीक्षा के दिन कार्यमुक्त करने के आदेश वेकोलि चंद्रपुर क्षेत्र के प्रशासन विभाग द्वारा 29/30 जनवरी को निकाला था ।
    जिसमे 29 जनवरी की तारीख प्रिंट और 30 जनवरी की तारीख हाथोंसे लिखा गया है।

     

     

    आदेश में खास बात यह है कि एक ही दिन एक ही डिस्पैच क्रमांक के दो अलग अलग आदेश निकाले है। जिसमे 27 कर्मचारियों की संख्या वाले आदेश में 28 नंबर दर्शाया गया जिसे गौर से देखने पर यह पता चला कि अनुक्रमांक 7 के बाद 9 दर्शाया गया और एक कर्मचारी का नाम हटाया गया औऱ उस आदेश पर कार्मिक प्रबंधक / प्रशासन द्वारा साइन किया यह आदेश अब सवालो के घेरे में आ चुका है। अधिकारियों को गिनती सीखने की जरूरत होने की चर्चा कर्मचारियों में है

     

    क्योंकि एक ही कार्यालय आदेश की कॉपी दोबारा निकाली गई, खास बात यह है कि वरिष्ठ अधिकारी इतनी बड़ी गलती को नजरअंदाज कैसे कर सकते है।

  • Congress News :  तालुका काँग्रेसच्या वतीने हळदीकुंकू स्नेहमिलन महिला मेळावा सप्पन्न

    Congress News : तालुका काँग्रेसच्या वतीने हळदीकुंकू स्नेहमिलन महिला मेळावा सप्पन्न

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मूल तर्फे हळदी कुंकू आणि स्नेह मिलन मेळावा तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला.

     

    सदर मेळाव्याचे उद्घाटन राजमाता आई जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्नेह मिलन सोहळ्याचे अध्यक्षा सौ. ममता रावत, प्रमुख मार्गदर्शक सोनाली रत्नावार, माजी जी.प. सदस्या मंगला आत्राम, पल्लवी कन्नमवार, रश्मी गांगरेड्डीवार, सौ. चेतना येनुरकर, चंदा कामडी, माधुरी गुरनुले, यांनी मनोगत व्यक्त करतांना कांग्रेस मजबूत करावे असा सल्ला दिला. तसेच कांग्रेस विचार सरणीच्या महिलांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करून येत्या निवडणुकीत स्त्रीशक्ती दाखऊन द्यावी असे मनोगत मंगला आत्राम यांनी केल्या.
    उपस्थित महिलांना काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी हळदी कुंकू लावून भेट वस्तू भेट दिल्या.

     

    यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना काँग्रेसने सुरु केलेल्या शासनाच्या योजनाच्या माध्यमातुन महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास साधावा. अडचंणं आल्यास आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे अभिवचन यावेळी महिलांना दिले. कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस पक्षांचे तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, शामलता बेलसरे, समता बनसोड, राधिका बुक्कावार, यांनी परिश्रम घेतले. संचालन माजी नगर सेविका लीना फुलझेले यांनी केले तर आभार शामलता बेलसरे यांनी मानले. हळदी कुंकुम स्नेह मिलन सोहळ्याला शेकडो महिला उपस्थित होते.

  • OBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी

    OBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्रात सर्वाधिक सकल ओबीसी समाजाची संख्या असताना मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्या गेले आहेत. त्यावेळी मराठ्यांनी कुठेही स्वतःच्या आरक्षणाबाबत मागणी केलेली नाही. याचे कारणही सबळ आहे.

     

    मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे.उन्नत आहे. म्हणून आरक्षणाचा मुद्दा केंद्र व राज्य शासनासमोर पुढे केलेला नाही. आता मात्र ओबीसींना मिळणाऱ्या सवलती घेण्याच्या दृष्टीने ओबिसीमधे आपला समावेश करावा म्हणून जरांगे पाटलांना पुढे करुन आरक्षणासाठी रस्त्यावर उपोषण व आंदोलन सुरु केले. आणि मराठ्यांच्या आंदोलनाला राज्य शासन घाबरून म्हणा किंवा शासन करतेच मराठे असल्याने ओबीसी संवर्गातील समावेश असलेल्या असंख्य जातीचा विचार न करता ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचे अध्यादेश काढला.

     

     

    हे न्यायाला धरुन नसून केवळ ओबीसींवर अन्याय करणारे आहे. करीता ओबीसीचे राष्ट्रीय नेते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात शासनाने नुकताच मराठ्यांच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला मसूद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात हरकती नोंद व मसुद्याची होळी करण्यासाठी मुल येथे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांचे नेतृत्वात सकल ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा काढून काढलेला अध्यादेश त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी असंख्य ओबीसी समाज बांधव व महिलांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

     

    निवेदन देताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी जी.प. सदस्य प्रा.रामभाऊ महादोरे, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, राकाचे तालुका अध्यक्ष प्रा. किसान वासाडे, डॉ.पद्माकर लेनगुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, प्रा.सुधीर नगोषे, ईश्वर लोनबले, राकेश मोहूर्ले, कैलाश चलाख, सीमा लोनबले,अमित राऊत,शमलता बेलसरे,समता बनसोड, यांचेसह समता परिषदेचे समस्त पदाधिकारी, शेकडो महिला युवक ओबीसी बांधव उपस्थित होते.

  • Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

    Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

    News34 chandrapur

    बल्लारपुर – आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत.

     

     

    गावात कायदेशीर वाळू उपलब्ध नसून अवैध वाळू मात्र मुबलक प्रमाणात मुबलक दरात उपलब्ध कशी होत आहे?, असा प्रश्न देखील पुप्पलवार यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. शहरात आजकाल एक टाटा एस भरून अवैध वाळू तीन ते चार हजार रुपया दरात विक्री केली जात आहे. बल्लारपूर शहरातील जनते समोर “मरता क्या ना करता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी बल्लारपूर शहरातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

     

     

    बांधकामासाठी जनतेला कायदेशीर वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद कोण करणार याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? शहरात अवैध वाळू विक्रीला कोण प्रोत्साहन देत आहे? शहरात अवैध वाळू कोठून येत आहे? कोणाद्वारे याचा पुरवठा केला जात आहे , हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न पडतो आहे. अशाप्रकारे शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील रेती समस्येबाबत आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.