Author: Admin

  • Nitin Gadkari In Chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नितीन गडकरी मैदानात

    Nitin Gadkari In Chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नितीन गडकरी मैदानात

    Nitin Gadkari In Chandrapur चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी ०६ एप्रिल २०२४ रोजी राजुरा येथे सकाळी १०.०० वाजता व पांढकवडा (जि. यवतमाळ) येथे दुपारी १.०० वाजता केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

    केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या जाहिर सभेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. Nitin Gadkari In Chandrapur

    देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री म्हणून मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र विकास कामांचा तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा धडाका लावून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रचार दौरे आणि सभांमधून त्यांच्या कामावर नागरीकही समाधान व्यक्त करून समर्थन देत आहेत. Nitin Gadkari In Chandrapur

     

    चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळावी तसेच जिल्ह्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास यावेत, याकरिता विकासाला अर्थात मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना साथ देण्याचे आवाहन समर्थकांकडून करण्यात येत आहे.

  • Complaint of code of conduct violation : चंद्रपुरात आदर्श आचारसंहितेचा फज्जा, आप ची तक्रार

    Complaint of code of conduct violation : चंद्रपुरात आदर्श आचारसंहितेचा फज्जा, आप ची तक्रार

    Complaint of code of conduct violation चंद्रपूर – पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे जात असून सध्या विविध नागरिक उमेदवारांच्या समर्थनार्थ पक्षात प्रवेश घेत आहे.

     

    गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विजय आईनचवार व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण पोटदुखे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला, प्रवेश केल्यावर आपण आता महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मदत करायला हवी हा विचार मनात घेऊन त्यांनी चक्क महाविद्यालयात उमेदवार मुनगंटीवार यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविले. Complaint of code of conduct violation

     

    याबाबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना आचारसंहिता उल्लंघन बाबत तक्रार केली आहे.

    5 एप्रिलला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा सप्ताह तरंग 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, आणि या कार्यक्रमात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलाविले आहे. Complaint of code of conduct violation

     

    याबाबत महाविद्यालय प्रशासनाने नोटीस सुद्धा जारी केले आहे, या कार्यक्रमात मुनगंटीवार यांना बोलावणे म्हणजे सरळ आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची बाब मयूर राईकवार यांनी म्हटले आहे.

    हे अवश्य वाचा : हवामान खात्याने दिला इशारा, चंद्रपुरात येणार उष्णतेची लाट, सतर्क रहा

    तक्रारीनुसार, शासकीय निधी प्राप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणुकीच्या काळात राजकीय कार्यक्रम आयोजित करणे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे या बैठकीच्या आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मयूर राईकवार यांनी केली आहे. Complaint of code of conduct violation

    क्रीडा सप्ताह “ तरंग 2024” या शिर्षकाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नोटीस संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य Dr.प्रवीण पोटदुखे यांनी जारी केले असून सदर कार्यक्रमात नुकतेच BJP पक्षात प्रवेश घेतलेले माजी कुलगुरू Dr.विजय आईंचवार, अध्यक्ष SPMS ट्रस्ट तसेच बीजेपी व इतर NDA घटक लोकसभा दल उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार यानी सदर कार्यक्रमात विध्यार्थ्यांना संबोधित करणार आहे. Complaint of code of conduct violation

     

    सदर महाविद्यालय UGC, महाराष्ट्र शासन व इतर शासकीय यंत्रणे मार्फत अनुदान व निधी संकलन करत असते या व्यतिरिक्त सदर महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद व शिक्षकांना सुद्धा सरकार कडून वेतन मिळते अश्या स्थितीत सदर महाविद्यालय निवडणुकीच्या वेळी प्रचार करण्यासाठी वापरता येत नाही.

    या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत संबंधित महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद तसेच शिक्षकांना निवडणूक कर्तव्यासाठी सुद्धा नियुक्त करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

    भारतीय लोकतंत्र मध्ये निवडणूक हा मोठा समारंभ व देशातील सामान्य नागरिकांचे मताचे आधारे आपल्या प्रतिनिधीना निष्पक्ष व आदर्श आचार संहितेचा कठोरतेने पालन करूनच निवडणुकीत सहभाग होण्याचा तसेच निवडणूक आयोगाचा परम कर्तव्य असतो परंतु संबंधित उम्मेद्वार व त्यांची निवडणूक पद्धत नियमबाह्य दिसून येत आहेत. Complaint of code of conduct violation

    हे अवश्य वाचा : EVM मशीन बाबत शासकीय कर्मचाऱ्याने केला अपप्रचार, प्रशासनाने केले निलंबित, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आचारसंहिता उल्लंघणाची कारवाई

    शासना कडून अनुदान प्राप्त महाविद्यालय, शिक्षण संस्थान तसेच इतर संस्थेत कोणतेही प्रचार कार्यक्रम किंवा निवडणुकीचा दर्मियान बैठक घेता येत नसताना बी जे पी व इतर NDA घटक दल उम्मीदवार याची बैठक नियमबाह्य रीत्या आयोजित करण्यात येत आहे करीता संबंधित आयोजक समिती तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष विरुद्ध आदर्श आचार संहिता चे उल्लंघन बाबत कार्यवाही करण्यासाठी राईकवार यांनी सदर तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त यांना 5 एप्रिलला केली आहे. राईकवार यांच्या तक्रारींवर निवडणूक आयुक्त काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

     

  • Heat Wave Alert In Chandrapur : 5 एप्रिल रोजी चंद्रपुरात उष्णतेची तीव्र लाट, हवामान विभागाचा यलो अलर्ट

    Heat Wave Alert In Chandrapur : 5 एप्रिल रोजी चंद्रपुरात उष्णतेची तीव्र लाट, हवामान विभागाचा यलो अलर्ट

    Heat Wave Alert In chandrapur चंद्रपूर – हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दि.5 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात दिवसा तसेच रात्रीही उष्णतेची लाट राहणार असुन याबाबत यलो अलर्ट देण्यात आला आहे.यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच प्रचंड उकाडा जाणवू लागला असुन सर्वांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे.

    हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शासकीय कर्मचाऱ्याने केले आचारसंहितेचे उल्लंघन, प्रशासनाने केली निलंबनाची कारवाई

    तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात    मनपा आरोग्य विभागामार्फत उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत असुन उष्माघाताचा धोका टाळण्यास विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तीव्र उन्हात नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक रंग जर घराच्या छतावर लावले तर 2 ते 3 डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. उष्माघातामुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन परिस्थितीप्रसंगी रुग्णवाहिकेला बोलाविण्यास 108 क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. Heat wave alert in chandrapur

     

    ट्रॅफीक सिग्नलवर नागरीकांना अधिक काळ उभे राहावे लागु नये याकरीता 12 ते 3 या कालावधीत ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवण्याच्या सुचना वाहतुक विभागाला देण्यात आल्या आहेत. मनपा क्षेत्रातील उद्याने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येऊन नागरिकांना सावलीचा आश्रय मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे.तसेच उष्माघाताचा धोका टाळण्यास नागरीकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ‘ शीत वार्ड ‘ ची व्यवस्था करण्यात आली आहे. Heat wave alert in chandrapur

    तीव्र उन्हात काय करावे व काय करू नये –

     यलो अलर्टच्या कालावधीमध्ये भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे.
     कमी वजनाचे, सौम्य रंगाचे आणि सुटसुटीत कपड्यांचा वापर या दिवसांमध्ये करावा.
     उन्हामुळे फार घाम येत असल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते कायम राखण्यासाठी या दिवसांमध्ये अधिक पाणी प्या.
     दारु, चहा, कॉफी, सोडा असणारी शीत पेयांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.
     घरगुती पेय ज्यामध्ये लस्सी, ताक, लिंबूपाणी, तोरणी (तांदळाचं पाणी),आंब्याचे पन्हे, नारळ पाणी  यासारख्या गोष्टींची सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही.
     डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ किंवा रुमाल बांधावा. उन्हात डोकं उघडं राहणार नाही याची काळजी घ्यावी.
     लहान मुलं, वयस्कर व्यक्ती तसेच आरोग्य विषयक समस्या असणाऱ्यांची विशेष काळजी या दिवसांमध्ये घ्यावी. Heat wave alert in chandrapur

     थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच थंड पाण्याने अंघोळ करावी .
     शिळे अन्न व उच्च प्रथिने असलेले पदार्थ खाणे टाळावे
     उन्हात प्रवास करताना डोळ्यांना गॉगल लावा,टोपी,छत्री यांचा वापर करावा.

    उष्माघाताची लक्षणे –
     अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.

  • Code of conduct violation : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिली कारवाई

    Code of conduct violation : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिली कारवाई

    Code of conduct violation पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात झाली आहे, या रणधुमाळीत प्रत्येक हालचालीवर प्रशासनाची बारीक नजर आहे, निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

    हे अवश्य वाचा : शॉर्टस रिल्स बनवा आणि जिंका हजारोची बक्षिसे, चंद्रपुरात सुरू झाली स्पर्धा

    एकीकडे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आचारसंहितेबाबत नागरिकांना जागृत करीत आहे तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा प्रकार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील आर्णी विधानसभा क्षेत्रात उघडकीस आला आहे. Code of conduct violation

    हे ही अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात एक दिवस आड होतो विकास, बघा हे भयावह वास्तव्य

    या प्रकरणी सहायक निवडणूक अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाई करण्याचे वनविभागाला निर्देश देत तात्काळ कारवाईचा अहवाल सादर करण्याबाबत आदेश काढला, वनविभागाने सदर प्रकरणात वनविभाग पांढरकवडा येथील वाईल्डलाईफ विभागात कार्यरत क्लर्क ला निलंबित करण्यात आले. Code of conduct violation

     

    विभागीय वन अधिकारी, वन्यजीव कार्यालय येथे वाईल्डलाईफ मध्ये अधिनस्त कर्मचारी शिवशंकर मोरे यांनी व्हाट्सएप स्टेटस वर EVM बाबत संशय घेणे, ये सच्चाई है, असे स्टेटस ठेवले ज्यामुळे खोट्या माहितीचा प्रचार करणे व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, व इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यास माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करण्यात आल्याचे उक्त स्टेटस वर आढळून आले, याबाबत सुजाण नागरिकाने मोरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता उल्लंघणाची तक्रार देत व्हिडीओ सादर केले. Code of conduct violation

    हे ही वाचा : मुनगंटीवार यांच्यावर घाणेरडी टीका?

    शिवशंकर मोरे हे स्वतः शासकीय कर्मचारी असून त्यांच्याकडून अश्याप्रकारचे वर्तन अशोभनीय आहे, करीता मोरेवर लोकप्रतिनिधींत्व कलम 1951 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर विभागीय वन अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करीत तसा अहवाल सहायक निवडणूक अधिकारी चंद्रपूर लोकसभा क्षेत्र यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश सुहास गाडे यांनी दिले होते, निवडणूक काळात वनविभागातील कर्मचाऱ्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने तात्काळ मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

  • Water problem in Chandrapur : चंद्रपूर शहरातील एक दिवसआडचा विकास

    Water problem in Chandrapur : चंद्रपूर शहरातील एक दिवसआडचा विकास

    Water problem in Chandrapur चंद्रपूर मनपा हद्दीत मोठ्या थाटामाटात अमृत योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र अमृत आता नागरिकांच्या जिव्हारी लागत आहे, अमृत योजनेचा पहिला टप्पा अपूर्ण सुरू झाला आता दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून मागील अनेक वर्षांपासून 1 दिवस आड नळाला पाणी येत आहे.

     

    घुटकाला प्रभागात मागील 2 ते 3 दिवसापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिक पाण्याच्या टाकीजवळ पोहचले, लिकेज प्रॉब्लेम असल्यामुळे नळ येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले, मात्र हा लिकेज चा त्रास आमच्या प्रभागात वारंवार का होत आहे? असा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला. Water problem in Chandrapur

    पाणी 6 महिने देता आणि वर्षभराचे बिल वसूल करता हा कुठला न्याय आहे, भर उन्हाळ्यात पालिकेतर्फे पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मनपा करीत आहे, 42 डिग्री तापमानात नागरिक पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहे, विकासाच्या नावाने शहरात अधोगती आली की काय असे चित्र या माध्यमातून पुढे येत आहे. यामुळे नागरिकांचा संयम आता सुटताना दिसत आहे, मनपाने पाण्याच्या समस्येवर तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे. Water problem in Chandrapur

  • Election Shorts Reels : शॉर्ट रिल्स बनवा आणि जिंका 15 हजार रुपये

    Election Shorts Reels : शॉर्ट रिल्स बनवा आणि जिंका 15 हजार रुपये

    Election Shorts Reels लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे व नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘माय व्होट इज माय फ्युचर : पावर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स, पोस्टर्स मेकींग व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    हे ही वाचा – चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन

    लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तसेच दिशा देण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान करायलाच हवे. याचाच एक भाग म्हणून स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये रिल्स, पोस्टर व मिम्सचे विशेष आकर्षण असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Election Shorts Reels

    हे ही वाचा – चंद्रपुर लोकसभा उमेदवाराने केली पोलिसात तक्रार

                या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता विशेष रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. रिल्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम बक्षीस 15 हजार रुपये,  द्वितीय बक्षीस 10 हजार तर तृतीय बक्षीस 5 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये आहे. तसेच मिम्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहे.      Election Shorts Reels

     

    मतदान करण्याबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी स्वतः बनविलेले रिल्स, पोस्टर्स व मिम्स्  https://forms.gle/uCRyEJkaHiqV५q८T७  या लिंकवर 12 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करून पाठवावे. सदर लिंक जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Election Shorts Reels

  • Teacher Political leader : शिक्षकांना राजकीय पक्षात व संघटनेत काम करण्याचा अधिकार

    Teacher Political leader : शिक्षकांना राजकीय पक्षात व संघटनेत काम करण्याचा अधिकार

    Teacher Political leader जिल्हा परिषद व महापालिकेचे प्राथमिक शिक्षक असल्यास त्यांना सक्रीय राजकारणात भाग घेता येत नाही. मात्र, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज आणि सिनिअर कॉलेज शिक्षक असल्यास राजकारणात सक्रीय भाग घेता येतो. निवडणुकीला उभं राहता येते. प्रचारही करता येतो. त्यात कुणीही आडकाठी करु शकत नाही. दोघांच्याही सेवाशर्ती व कायदा वेगळा आहे. त्‍यामुळे शिक्षकांना राजकीय पक्षात व संघटनेत काम करण्याचा अधिकार आहे, अशी माहिती आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली.

    निवडणुकीच्या प्रचारात शिक्षकांना भाग घेता येणार नाही, अशा पद्धतीचे आदेश काही अधिकारी परस्पर देत असल्याच्या बातम्या येत आहेत. जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे शासकीय कर्मचारी आहेत. ते सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर बंधन जरुर आहे. मात्र, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांना खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच निवडणुकीसंदर्भात स्वातंत्र्य आणि अधिकार दिला आहे. हे शिक्षक शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नव्हेत. तर ते त्या – त्या अनुदानित शिक्षण संस्थांचे किंवा विनाअनुदानित शिक्षण संस्थांचे कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना कोणताही अधिकारी प्रतिबंध करु शकत नाही. तसे केल्यास ते राज्य घटनेतील तरतुदीशी विसंगत ठरेल. Teacher Political leader

     

    राज्य घटनेतील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) कायदा व नियमावलीनुसार शिक्षकांना पूर्ण राजकीय स्वातंत्र्य आहे. राज्यघटनेच्या भाग ६, प्रकरण ३ अनुच्छेद १७१ (ग) नुसार माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अशा त्या राज्यातील शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना विधान परिषदेवर प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे, असेही आमदार अडबाले यांनी म्हटले आहे. Teacher Political leader

    महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियम अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ मध्ये शिक्षकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. प्रचार करणे, भाषण करणे, संदेश देणे याला कोठेही प्रतिबंध करण्यात आलेला नाही. निवडणुकीत प्रचार, प्रसार करणे, भाषण करणे, मॅसेज करणे, व्हॉटस्अपवर मॅसेज करणे कायद्यानुसार विहीत आहे. राज्य घटनेतील मुलभूत स्वातंत्र्याच्या अधिकारात अभिव्यक्ती स्वातंत्र्यही येते. त्यावर प्रतिबंध लादता येत नाही. मतदानाच्या दिवशी शिक्षकांना निवडणुकीचे काम करावे लागते ती सुद्धा घटनेने दिलेली जबाबदारी आहे. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांना राजकीय पक्षात काम करता येत नाही. Teacher Political leader

    मधुकरराव चौधरी, वसंत पुरके, प्रा. जावेद खान, प्रा. रामकृष्ण मोरे हे शिक्षकच होते. ते शिक्षणमंत्रीही झाले. शिक्षक म्हणून ते निवृत्तीपर्यंत कार्यरत होते. तेव्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि सिनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला घटनात्मक अधिकार आणि राजकीय स्वातंत्र्य निर्भयपणे अनुभवले पाहिजे. कुणालाही घाबरता कामा नये, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

  • Trending Loksabha Election Manifesto : गोरगरिबांना ब्रँडेड दारू पिण्याचा अधिकार, लोकसभा उमेदवाराचा जाहीरनामा

    Trending Loksabha Election Manifesto : गोरगरिबांना ब्रँडेड दारू पिण्याचा अधिकार, लोकसभा उमेदवाराचा जाहीरनामा

    Trending loksabha election manifesto लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, सध्या राज्यात दारू विषयाच्या मुद्द्यावर ट्रेंडिंग असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या लोकसभा उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी आपला जाहीरनामा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केला आहे.

    हे अवश्य वाचा – अब की बार चंद्रपूर जिल्ह्यातून 13 तडीपार

    पत्रकार परिषदेत वनिता राऊत म्हणाल्या की रेशन कार्ड वर गरीब नागरिकांना ब्रँडेड दारू आम्ही निवडून आल्यावर देण्याची व्यवस्था करणार, जिल्ह्यातील 500 लोकसंख्या असलेल्या गावात बेरोजगार तरुणांना बिअर बार चे परवाने देण्यात येणार, गावात अधिकृत दारूचे दुकान उघडण्यात येणार नाही तोपर्यंत नागरिकांना शुद्ध व स्वस्त दारू उपलब्ध होणार नाही, त्यासाठी हे काम आम्ही निवडून आल्यावर लगेच करणार आहोत. Trending loksabha election manifesto

    हे अवश्य वाचा – त्याला सांभाळा, तो माझ्यावर टीका करतोय 

    प्रत्येक गावात शासकीय बिअर बार मध्ये गावकरी हे थाटात बसून दारू प्यायला हवे अशी व्यवस्था करणार.
    सोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला किमान शंभर दिवसाचा रोजगार व किमान मजुरी ही शासकीय चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराएवढि करण्यात आली तर गोरगरीब जनतेला रक्षण कार्डवर मद्य देण्याची गरजच भासणार नाही. Trending loksabha election manifesto

    हे ही वाचा : चंद्रपुरात लव्ह जिहाद?

    गरीब लोक बिअर बार मध्ये जाऊन थाटात दारू पिणार.
    जनतेला आनंदी सुखी समाधानी ठेवण्याचे काम हे सरकारचे आहे व तेच काम निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहो, नागरिकांनी ब्रँडेड दारू पित स्वतःच आत्मशांतीचा अनुभव जोपासावा अशी माझी इच्छा आहे, मनाला आनंदित व प्रफुल्लित करण्यासाठी मद्य सेवन करणाऱ्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार, लोकांना या माध्यमातून आनंदित करणे हे पुण्याचे काम मी करणार असे आश्वासन वनिता राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले. Trending loksabha election manifesto

    मी जर निवडून आली तर सर्वप्रथम गाव तिथे बिअर बार, गाव तिथे दारूचे दुकान, गोरगरीब जनतेला रेशनकार्ड च्या माध्यमातून विदेशी ब्रँडेड दारूचे वितरण करणारा, तेव्हा मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकावा अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली. Trending loksabha election manifesto

    राज्यात सध्या वनिता राऊत ह्या दारूच्या मुद्द्यावरून ट्रेंडिंग वर आहे, त्या निवडून येवो की नाही मात्र त्यांचा हा मुद्दा मद्यप्रेमींसाठी एक पर्वणी सारखा नेहमीच लक्षात राहणार.

  • Modi Guarantee : गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ‘मोदी गॅरंटी’ – सुधीर मुनगंटीवार

    Modi Guarantee : गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ‘मोदी गॅरंटी’ – सुधीर मुनगंटीवार

    Modi Guarantee गेल्या दहा वर्षांत निराधार, वंचित, शेतकरी, महिलांसाठी विविध योजना केंद्र सरकारने आणल्या. या माध्यमातून उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आणि देशाचा सर्वांगीण विकास साधण्याची ‘मोदी गॅरंटी’ सन्माननीय पंतप्रधानांनी दिली आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना-राष्‍ट्रवादी व म‍ित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    राष्ट्रगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देश विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Modi Guarantee

    चंद्रपूर येथील शकुंतला लॉनमध्‍ये मंगळवार, 2 एप्रिल रोजी राष्‍ट्रीय ओबीसी, एससी, एसटी, क्रांती दल महाराष्‍ट्र राज्‍य कार्यकर्ता मेळावा व सत्‍कार सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला ओबीसी, एससी, एसटी, क्रांती दलाचे अॅड. राजेंद्र महाडोळे, माधव कोहळे, रंजना पारशिवे, राजू बल्‍लूरवार, धर्माजी मेश्राम, गणेश आत्राम, सुहास काळे, लक्ष्‍मीकांत लोळगे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. Modi Guarantee

    अॅड. राजेंद्र महाडोळे हे सर्वजातीसमुहाचे सक्षम नेतृत्‍व असून त्‍यांनी वंचित, दीनदुर्बलांना एकत्रि‍त करण्‍याचे काम केले आहे. त्‍यांनी जनतेचा विकास आणि मोदी गॅरंटीच्‍या आधारावर मनापासून दिलेला हा पाठिंबा नक्‍कीच ही लोकसभा निवडणूक ज‍िंकून देईल, असा विश्‍वास मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

  • Chandrapur police action : अब तक 13 तडीपार

    Chandrapur police action : अब तक 13 तडीपार

    Chandrapur police action लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून तडीपारचे आदेश संबंधित उपविभागीय अधिका-यांनी निर्गमित केले आहेत.

    हे ही वाचा – तो माझ्यावर घाणेरडी टीका करतोय – सुधीर मुनगंटीवार

    अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलिस आणि उपविभागीय अधिका-यांनी आदेश पारीत करताच शुभम अमर समूद (वय 26), रा. पंचशील वॉर्ड चंद्रपूर, शाहरुख नुरखा पठाण (वय 29), रा. अष्टभुजा वॉर्ड, जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा (वय 31), रा. लुंबिनी नगर, बाबुपेठ वॉर्ड चंद्रपूर, मोहन केशव कुचनकर (वय 25), रा. चिचघर ले-आऊट वरोरा, दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग (वय 22), रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, मुनीर खान वहिद खान पठाण (वय 55), रा. शिवनगर नागभीड,  शिवशाम उर्फ  भिस्सु दामोदर भुर्रे (वय 25), रा. हनुमान नगर, ब्रम्हपूरी यांना कलम 56 (1)(अ)(ब)  मपोका अन्वये सहा महिन्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. Chandrapur police action

    हे अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ

    तर आठवडाभरात आतापर्यंत एकूण 13 गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली असून यात वरील सात गुन्हेगार आणि अरविंद बापुजी उरकुडे (वय 45), रा. अमराई वॉर्ड घुग्घुस, प्रताप रमेश सिंग (वय 26), रा. अमराई वॉर्ड घुग्घुस, श्यामबाबू चंद्रपाल यादव (वय 29)  रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर, राजेश मुन्ना सरकार (वय 47), रा. इंडस्ट्रीय वॉर्ड, बंगाली कॅम्प चंद्रपूर, संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने  (वय 30), रा. सिस्टर कॉलनी चंद्रपूर, अरबाज जावेद कुरेशी (वय 26), रा. हवेली गॉर्डन चंद्रपूर यांना कलम 56 (1)(अ)(ब)  मपोका अन्वये 6 महिने व 1 वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. Chandrapur police action

     

    सदर कारवाई पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम (वरोरा), सुधाकर यादव (चंद्रपूर), दीपक साखरे (राजुरा), दिनकर ठोसरे (ब्रम्हपूरी), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक आसिफराजा (बल्लारपूर),  अनिल जिट्टावार  (ब्रम्हपूरी), विजय राठोड (नागभीड), सुनील गाडे (रामनगर, चंद्रपूर) आणि श्याम सोनटक्के (घुग्घुस) यांच्यावतीने करण्यात आली आहे.