Author: Admin

  • Mahila Bachat Gat : मूल येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा

    Mahila Bachat Gat : मूल येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा

    Mahila bachat gat गुरू गुरनुले मूल – महिलांचा आर्थिक विकास होऊन त्यांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संघटित होऊन बचत गटाची निर्मिती केलेल्या शेकडो महीला बचत गटांना विनातारण कर्जाच्या माध्यमातुन आर्थिक सहकार्य केल्याने आज हजारो महीला सक्षम व आत्मनिर्भर झाल्याचे दिसत असल्याने समाधान बँकेला व संचालक मंडळाला आहे असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.

    अवश्य वाचा : स्वच्छतेचे 2 रंग अभियानाला चंद्रपुरात सुरुवात

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल, राजोली आणि चिरोली शाखेच्या वतीने आयोजित महिला बचतगट मेळावा व गटाला कर्जवाटप करतांना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत बोलत होते. स्थानिक श्री माँ दुर्गा मंदिराचे सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यास बँकेचे ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार, क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, उपाध्यक्ष गुरुदास चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    महिला बचत गटाच्या पदाधिकारी पुष्पा कच्चेवार, वैशाली सावसाकडे, प्रणाली मल्लेवार, चंद्रकला सातपुते, आणि कुसुमबाई कोवे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.

    Bachat gat loan
    महिला बचत गटाच्या मेळाव्यात उपस्थित महिला

     

    Mahila bachat gat उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे यांनी प्राप्ताविक केले. यावेळी महिला बचत गटाच्या फरहाना शेख, मंदाताई चलावार, नलिनी आडपवार, जयमाला चंदनखेडे या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना बचत गटाला आर्थिक सहकार्य देऊन महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी दिली. याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार, क्रांतीज्योती पत संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या विविध कल्याणकारी योजना व कार्यावर प्रकाश टाकला.

     

    मेळाव्यात बचत गटाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुल येथील गृहिणी महिला बचत गट आणि सावित्रीबाई महिला बचत गटाच्या पदाधिका-यांचा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व संचालक संदीप गड्डमवार यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षीय मनोगतनंतर बँकेच्या मूल शाखेतील ११ राजोली शाखेतील ७ आणि चिरोली शाखे अंतर्गत कार्यरत असलेल्या ७ अश्या एकूण २५ महिला बचत गटांना ८० लाखाचे वर कर्जाचे धनादेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय पडोळे यांनी तर विभागीय अधिकारी प्रशांत तोटावर यांनी आभार मानले.

     

    Mahila bachat gat मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार यांचे मार्गदर्शनात मूल शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे, राजोली शाखा व्यवस्थापक नरेश पाडेवार, चिरोली शाखा व्यवस्थापक भास्कर पांचभाई, निरीक्षक नंदकिशोर मडावी, विनोद वेठे, अनिल सिरस्कर, तिन्ही शाखेचे निरीक्षक व कर्मचारी वृंद यांचे सह बँकेच्या बचत गटाच्या मार्गदर्शक महिला प्रतिनिधींनी माधुरी मांडवगडे,नलिनी आडपवार मुल सोनी शेंडे राजोली, नाजूका नागुलवार यांनी सहकार्य केले.

  • Zilla parishad chandrapur : स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

    Zilla parishad chandrapur : स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

    Zilla parishad chandrapur चंद्रपूर जिल्हात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व सुका निळा  या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, सदर अभियान 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अभियान कालावधित जास्तीत जास्त गृहभेटी देवुन गावस्तरावर शाश्वत स्वच्छतेसह अतिसार निर्मुलन करण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

    अवश्य वाचा : त्या सांबराचा मृत्यू

    या अभियानाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच संवादक यांची निवड करण्यात आली असून, यांचे पाणी व स्वच्छता या विषयावर प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण झालेले आहे. या प्रशिक्षित संवादका कडून जिल्ह्यातील प्रत्येक गावात गृहभेटी देण्याचे काम चालू आहे.अतिसार निर्मूलन, पाणी व स्वच्छता याची नीट काळजी घेणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, स्त्रोतांची सुरक्षितता राखणे, मैला गाळ व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. घराघरातून निघणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण हे कुटुंब स्तरावरच व्हावे .याची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे ‌. यामध्ये हिरव्या रंगाची कचराकुंडी ही ओला कचऱ्यासाठी व निळा रंगाची कचराकुंडी ही सुक्या कचऱ्यासाठी अशा प्रकारचे दोन रंगाचे अभियान मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक गावात कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

    Zilla parishad chandrapur त्यासोबतच या अभियानात पावसाळ्यात उद्भवणारा अतिसार हा आजार कायमस्वरूपी कसा थांबवता येईल .याची काळजी कशी घ्यावी, गावात कुठल्या उपाययोजना कराव्या. याबाबत सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार गावात कार्यवाही चालू असून , गावागावात पाणी नमुन्याची तपासणी वेळेत केल्या जात आहे.  स्त्रोतांची स्वच्छता ठेवल्या जात आहे.

     

    या मोहिमेत गाव स्तरावर गावचे सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छतागृही , जलसुरक्षक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गावात सर्व दूर गृहभेटी देण्यात येत असुन, याद्वारे गावात शाश्वत स्वच्छते विषयी जनजागृती केल्या जात आहे. यामुळे गाव शाश्वत स्वच्छ राखण्यास मदत व गाव पातळीवर अतिसार सारख्या साथ रोगांचे निर्मूलन करण्यास  मदत होणार आहे.

     

    Zilla parishad chandrapur गाव स्तरावर चालू असलेल्या गृहभेटी मुळे शाश्वत स्वच्छता व अतिसार निर्मूलन याविषयी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यास मदत होत असून ,गृहभेट अभियान गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावे .याकरिता यंत्रणेतील सर्वांनी प्रयत्न करावे .असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

  • jangli sambar : अखेर त्या सांबराचा मृत्यू

    jangli sambar : अखेर त्या सांबराचा मृत्यू

    jangli sambar (गुरू गुरनुले) 13 जुलै ला दुपारी ४ वाजता मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून अवघ्या तीन कीलोमीटर अंतरावर चंद्रपूर ला जाना-या एका कार वर रस्ता ओलांडताना सांबराने उडी मारली आणि तो सांबर कारच्या सामोरील काचेवर धडकला या अपघातात सांबर गंभीर जखमी झाला आणि कारचे पण भरपूर नुकसान झाले.

     

    jangli sambar या घटनेची माहिती मिळताच fdcm चिचपल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस.बी.बोथे यांचे मार्गदर्शनात वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटना स्थळी जाऊन गंभीर जखमी सांबराला मूल येथे उपचारासाठी वाहनात आणताना त्याचा मृत्यू झाला.

    महत्वाचे : सावित्रीबाई फुले आधार योजनेला मुदतवाढ द्या – सचिन राजूरकर 

    अपघातात मृत झालेले सांबर मादि असुन त्याचे वय जवळपास दोन वर्ष होते, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी मृत सांबराचे शवविच्छेदन केले व नंतर त्याचे दहण करण्यात आले.

     

    jangli sambar या सर्व कार्यवाही दरम्यान fdcm चे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे, वनरक्षक यु.आर.गवई, प्रादेशिक चे वनरक्षक सूधिर ठाकुर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, प्रभाकर धोटे, दिनेश खेवले, विशाल टेकाम, संदिप सोयाम, आदित्य दहिवले उपस्थित होते.

  • Savitribai Phule Aadhaar yojana : या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी – सचिन राजूरकर

    Savitribai Phule Aadhaar yojana : या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी – सचिन राजूरकर

    Savitribai Phule Aadhaar yojana इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या वर्षीपासून लागु केलेली आहे. व सदरील योजनेकरीता अर्ज भरण्याची मुदत हि 15 जुलै 2024 ठेवण्यात आलेली आहे.परंतु या योजनेचा लाभ घेतांना प्रवेश झालेल्या महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र व अर्जावर प्राचार्यांची स्वाक्षरी/शिक्का आवश्यक आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात कायद्याची पाठ शाळा

    अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहिर न झाल्याने व काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले तरी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याने विद्यार्थ्यांनी बोनाफाईड प्रमाणपत्र व प्राचार्याची सही आणावी कुठून असा प्रश्न उपस्थित होतो. व अशा तांत्रिक कारंणामुळे अनेक गरजु विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचीत राहून त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची 15 जुलै 2024 पर्यंत असलेली मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे.

    अवश्य वाचा : 24 जुलैला हजारो शेतकरी धडकणार वनविभागावर

    Savitribai Phule Aadhaar yojana शासनाचे दिनांक 9 मार्च 2015 चे शासन परीपत्रक असताना सुद्धा विद्यार्थ्याकडून शपथपत्रावर व स्वयघोषणा पत्रावर नोटरी करून मागण्यात आले आहे ही अट रद्द करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी पत्राद्वारे इतर मागस व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, पुणे यांचेकडे केली आहे.

     

    राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत उत्तर देताना शेती व पगाराचे उत्पन्न ग्राह्य धरू नये अशी केंद्र सरकारला विनंती करणार आहे, असे उत्तर दिले. परंतु केंद्र शासन मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक अँड पेन्शनर्स विभागाने 8 सप्टेंबर 1993 ला क्रीमिलेअर बाबत अटी व शर्ती बनविल्या त्या शर्ती अजूनही अबाधित आहे त्यात आजही कोणताच बदल करण्यात आला नाही आहे.

    क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा तितकीच

    फक्त दर तीन वर्षांनी क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढत असते 13 सप्टेंबर 2017 ला क्रीमीलेअरची मर्यादा 8 लक्ष केली होती ती अजूनही तेवढीच आहे, आणि वर्ग दोन ,तीन व चार चे शेती व पगारापासून मिळणारे कर्मचाऱ्यांसाठी उत्पन्न झिरो पकडायचे आहे.

    बीपी शर्मा कमिटी रद्द

    Savitribai Phule Aadhaar yojana केंद्र सरकारने क्रीमीलेरच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्यासाठी दिनांक 8 मार्च 2019 ला केंद्र सरकार मधील निवृत्त सचिव बी. पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनविली होती परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनाच्या आंदोलना नंतर ती कमिटी रद्द करण्यात आली आहे.

     

    लक्षवेधीला उत्तर देताना राज्याच्या ओबीसी मंत्री क्रीमिलेअर बाबत माहिती विधान सभागृहात बरोबर देत नसेल तर ओबीसी जनतेच काय भल होणार.

  • New Law Workshop : चंद्रपुरात कायद्याची पाठ “शाळा”

    New Law Workshop : चंद्रपुरात कायद्याची पाठ “शाळा”

    New Law Workshop जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन नवीन क्रिमीनल कायद्याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन प्रियदर्शनी सभागृह येथे करण्यात आले.

     

    भारत सरकारने ऑगष्ट 2019 मध्ये भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्यामध्ये सुधारणा करुन नविन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ केला. देशातील नागरिक, लोकप्रतिनिधी, नॅशनल लॉ-युनिवर्सिटी, विधी तज्ञ, सेवानिवृत्त न्यायाधिश,  पोलीस अधिकारी यांच्याकडुन यासंदर्भात सुचना मागविण्यात आल्या.

     

    त्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 ही तीन विधेयके संसदेमध्ये सादर करण्यात आली. सन 2020 मध्ये गृह मंत्रालयाने डॉ.रणबिरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली सदर विधेयकांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. त्यानंतर सुधारित विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होवून दिनांक 25 डिसेंबर, 2023 रोजी मा.राष्ट्रपती यांची त्यावर स्वाक्षरी झाली.

    महत्त्वाचे : वनविभागावर हजारो शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

    New Law Workshop सदर तिन्ही कायद्याची अंमलबजावणी दिनांक 01 जूलै, 2024 पासून संपुर्ण भारत देशात लागू करण्यात आली आहे. सदर तिन्ही क्रिमीनल नविन कायद्याबाबत चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसुल विभागातील अधिकारी यांना माहिती व्हावी या दृष्टीकोणातून महसूल आणि पोलिस विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेला महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील विधी निदेशक अॅडव्होकेट संजयकुमार पाटील आणि अॅडव्होकेट राजेश सचदेव यांना मार्गदर्शनासाठी बोलाविण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे आज दि.13 व 14 जुलै 2024 रोजी असे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : मागील 10 वर्षांपासून संविधानाची हत्या – खासदार धानोरकर

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सर्व उपविभागीय अधिकारी व तालुका दंडाधिकारी  तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस निरीक्षक यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे जवळपास 1200 लोकांची उपस्थिीती होती.

    नवीन तीन क्रिमीनल कायद्याबाबत सदर प्रशिक्षण कार्यशाळा इतक्या मोठया संख्येने घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.

  • Mahakali mandir : महाकाली मंदिराचे रुपडे पालटणार, 250 कोटी रुपयांचा आराखडा तयार

    Mahakali mandir : महाकाली मंदिराचे रुपडे पालटणार, 250 कोटी रुपयांचा आराखडा तयार

    Mahakali mandir लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. या कामासाठी 250 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. शुक्रवारला अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदर काम करण्याबाबत घोषणा केली आहे त्यामुळे आता लवकरच 250 कोटी रुपयांतून माता महाकाली मंदिर यात्रा परिसराचे रुपडे पालटणार आहे.

    अवश्य वाचा : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

    Mahakali mandir आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमी आणि माता महाकाली मंदिर परिसर या भागाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे दीक्षाभूमी येथील विकास कामांना मंजुरी मिळाली असून यासाठी 56.90 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. तर माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांच्या पाठपुराव्यानंतर 250 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता.
    चंद्रपूर ची आराध्य दैवत श्री महाकाली मातेचे १६ व्या शतकातील प्राचीन जागृत असे मंदिर गोंड राजवंशाने बांधले आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र नवरात्री दरम्यान महाकाली यात्रा सुरू होते. या यात्रेमध्ये नांदेड, मराठवाडा सह तेलंगाना, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातूनही लाखोच्या संख्यने भाविक यात्रेसाठी येत असतात. वर्षातील चैत्र नवरात्री व अश्विनी नवरात्री या दोन्ही नवरात्री दरम्यान श्री महाकाली माता मंदिर परिसरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. परंतु सदर यात्रा परिसरात भाविकांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. यात्रेकरुंच्या संख्येच्या तुलनेत निवास, शौचालय, स्नानगृहे, भोजनकक्ष व्यवस्था नसल्यामुळे महिला भाविकांना उघड्यावरच दैनंदिन कार्य उरकावे लागत आहे. तसेच ऊन, वारा व पावसापासून संरक्षित सभामंडप नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे भाविकांच्य जीवितास हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे यात्रा परिसरात भाविकांसाठी आधुनिक सुविधांसह विकासाकामांची गरज होती.

    अवश्य वाचा : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 हजार 493 घरकुल मंजूर

    मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर 250 कोटी रुपयांच्या या आराखड्यानुसार मंदिर परिसरात शेड व शौचालयाचे बांधकाम, मंदिर परिसर प्रवेशद्वार व सीमा भिंतीचे बांधकाम, पाईपलाइन व पाण्याच्या टाकीचे काम, मंदिर परिसरात विद्युतीकरण, भक्त निवास आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

    Mahakali mandir पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर 250 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यानुसार विकासकामे करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता मंदिर यात्रा परिसराच्या विकास कामाला गती येणार आहे. विशेष म्हणजे आश्विन नवरात्री दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरात माता महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या भव्यतेमुळे माता महाकाली देवस्थान देशपातळीवर पोहोचले आहे. परिणामी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा परिणाम येथील व्यवसायावरही दिसून येत आहे.

     

    जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि इतर पर्यटकांना माता महाकाली मंदिराकडे वळविण्यासाठी सदर महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने येथे व्यवस्था नाहीत. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी येथे विकासकामे केले जाणे अपेक्षित होते.

    Mahakali mandir  दरम्यान, आता श्री महाकाली मंदिर यात्रा परिसराचा सर्वांगीण विकासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने येथे सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा येथील व्यवसाय वाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन आदी क्षेत्रांवर दिसून येणार आहे. मंदिर परिसराचा विकास व्हावा, येथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम भक्त निवास असावा हा संकल्प आपण केला होता. मुख्यमंत्री यांची  घोषणा ही या संकल्प पूर्ततेकडील वाटचाल असून चंद्रपूरच्या नागरिकांच्या आणि महाकाली मातेच्या भक्तांच्या वतीने आपण मुख्यमंत्री यांचे आभार मानतो, असे किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Chandrapur Van Vibhag : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी धडकणार वनविभाग कार्यालयावर

    Chandrapur Van Vibhag : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी धडकणार वनविभाग कार्यालयावर

    Chandrapur van vibhag चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाला चारही बाजूने जंगलाने वेढले आहे. घनदाट असलेल्या या वनात विविध जातींच्या वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठ्या संख्येने देश-विदेश्यातील पर्यटक भेट देत असतात. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असते. ही सकारात्मक बाजू नेहमी माध्यमातून मांडली जाते.मात्र याची दुसरी बाजू फारच विदारक आहे. जिल्हातील मानव-वन्यजीव संघर्ष टोकावर पोहचला आहे.

    अवश्य वाचा : 10 वर्षांपासून केंद्र सरकार संविधानाची हत्या होत आहे – प्रतिभा धानोरकर

    जंगलातील वन्यजीव आता थेट शेतात,गावात पोहचत आहेत.वन्यजीवांचा हैदोसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रानडूक्करे थेट शेतात येऊन शेत पिकांची नासधुस करीत असतात. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी गोंडपिपरी तालुक्यात जनसंवाद, जनसंपर्क यात्रा केली.

     

    Chandrapur van vibhag या यात्रे दरम्यान हजारो शेतकऱ्यांनी रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानीचा पाडा वाचला. रानडुकरांच्या हल्ल्यात काही शेतकरी आणि नागरिकांचा जीव गेलेला आहे.वन विभागातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जणवन योजने अंतर्गत झटका मशीन दिली. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना वन्यजीवांनी शेताचे कितीही नुकसान केलं तरी तीन वर्ष कुठलाच मोबदला मिळणार नाही, अशी अट आहे.

     

    वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या योजनेत सुद्धा सेटिंग केली. झटका मशीन विकणाऱ्या दुकानदारांकडून अतिशय दर्जाहीन वस्तू दिल्या गेल्या. या झटका मशीन वन्यजीवांना रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. दुसरीकडे शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फसवेगिरीची ठरली. यातून झटका मशीन विक्रेते आणि त्यांच्यासोबत सेटिंग केलेले वन कर्मचारी मात्र आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेत, अशी तक्रार हजारो शेतकऱ्यांनी फुसे यांच्याजवळ केली.

     

    Chandrapur van vibhag या योजनेची निवृत्त न्यायाधीशा मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे. या सर्व मागण्यांना घेऊन 24 जुलैला भूषण फुसे धाबा वन विभाग कार्यावर धडक मोर्चा नेणार आहेत. या मोर्चात तालुक्यातील वीस हजार शेतकरी सहभाग होतील असे फुसे यांनी सांगितले आहे.

  • Samvidhan hatya diwas : हे स्वतः संविधान हत्येचे दशक साजरे करणारे सरकार – खासदार प्रतिभा धानोरकर

    Samvidhan hatya diwas : हे स्वतः संविधान हत्येचे दशक साजरे करणारे सरकार – खासदार प्रतिभा धानोरकर

    Samvidhan hatya diwas केंद्र सरकार ने या पुढे 25 जुन हा संविधान हत्या दिवस जाहिर करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय देशातील कोणत्याही नागरीकांना न पटणारा असून हा जाणीवपुर्वक काँग्रेस चे खच्चीकरण करण्यासाठी केंद्र सरकार ने घाट रचल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.

    महत्त्वाचे : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 हजार 493 घरकुल मंजूर

    केंद्र शासनातील एनडीए सरकार हे स्वतः संविधान विरोधी असून यांच्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतः संविधान बदलाची भाषा करुन संविधानाचा अपमान केला आहे. अनेक संविधान विरोधी कृती करणाऱ्या केंद्र सरकार ने संविधानाची हत्या दिवस साजरा करणे हे हास्यास्पद असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.

     

    Samvidhan hatya diwas आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणूकीत 272 जागा बहूमताला पाहिजे असतांना 400 चा नारा देऊन संविधान बदलाची भाषा भारतीय जनता पार्टी च्या खासदारांनी केली होती. आणीबाणी च्या काळातील अनेक बाबी चुकीच्या पध्दीतीने भारतीय जनता पार्टी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हा प्रयत्न कदापीही यशस्वी होणार नाही. काँग्रेस पक्ष हा लोकशाही टिकविण्यासाठी संविधानाचा सन्मान करणार पक्ष असून याच मुद्दयावर काँग्रेस पक्ष निवडणूकांना समोर जावून यश प्राप्त करीत आहे. संविधानाची हत्या करणारे खरे गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टी च असून केंद्र सरकार च्या भाषेत संविधान हत्या दिन एक दिवस नाही तर संविधान हत्या दशक साजरे करावे, असा टोला खासदार धानोरकर यांनी संविधान हत्या दिन साजरा करण्यासाठी काढलेल्या केंद्र सरकारच्या निर्णयावर केला.

    महत्त्वाचे: शहरातील या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता

    आणीबाणी च्या काळात देखील काँग्रेस पक्ष हा जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे अवघ्या देशवासीयांनी बघितले होते. या निर्णयाविरोधात येणाऱ्या अधिवेशनात निषेध देखील व्यक्त करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले.

  • Gharkul yojana : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 हजार 493 घरकुल मंजूर

    Gharkul yojana : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 हजार 493 घरकुल मंजूर

    Gharkul yojana महाविकास आघाडी सरकार काळात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करिता राज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली.

     

    या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले. तर आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी भेटून धरल्याने विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण 3493 लाभार्थ्यांना या योजनेचा हा मिळणार असून यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

    Gharkul yojana समाजातील हातावर आणून पानावर खाणे अशा प्रचंड संघर्ष जीवन जगणाऱ्या भोई समाजाला आजवर कुठल्याही योजनेमार्फत हक्काचे घर मिळाले नाही. तर पोटाची भूक भागविण्यात संपूर्ण मिळकत खर्च होत असल्याने तसेच बचत शिल्लक राहत नसल्याने फार विवंचनेच सापडलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उद्यान हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता काळात समाजातील एक दुर्बल घटकांकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंमलात आणली.
    सदर योजनेमार्फत राज्यातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी उद्दिष्ट पूर्तीत काही तांत्रिक अडचणी व कागदी त्रुट्यांमुळे जे लाभार्थी अपात्र ठरले व ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना आज फलश्रुती मिळाली असून एकट्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात एकूण 3493 घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
    Gharkul yojana यात सिंदेवाही तालुक्यात 666, सावली-2365, तर ब्रह्मपुरी तालुक्यात-462 अशी लाभार्थी संख्या समाविष्ट आहे. सत्ता काळातील विरोधी वाका पर्यंत च्या प्रवासात सर्वसामान्यांची नाळ जुळून असलेला नेता म्हणून सर्व दूर परिचित असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या या यशाच्या फलश्रुतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • Plastic pollution : चंद्रपुरात पुन्हा 500 किलो प्लॅस्टिक जप्त

    Plastic pollution : चंद्रपुरात पुन्हा 500 किलो प्लॅस्टिक जप्त

    Plastic pollution चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर कारवाई करून ५०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे तसेच संबंधित दुकानदाराकडुन १५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रतिबंधित स्वरूपाचा मोठा प्लास्टिक साठा आढळल्याने दंड वसुल करण्यात आला असुन दुकानात पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पोलीस तक्रार करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : तुकडा बंदी कायदा, सकारात्मक निर्णय घ्या – हंसराज अहिर

    प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई केली जात आहे.प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबविली जात आहे.

    Plastic pollution दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात आहे.आतापर्यंत अनेकांनी मनपाच्या या योजनेचा लाभ घेतला आहे. बंदी असलेले प्लास्टिक कॅरी बॅगचा साठा, विक्री व वापर करणे तत्काळ बंद करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले असुन अन्यथा सक्त कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.