Author: Admin

  • Landslide : चंद्रपुरात भूस्खलन, कारण काय?

    Landslide : चंद्रपुरात भूस्खलन, कारण काय?

    landslide चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात 1 ऑगस्टला खळबळजनक घटना घडली, शहरातील रयतवारी कॉलरी परिसरातील एका घरात भुस्खलन झालं, घरात 20 ते 25 फुटाचा खड्डा पडला, त्या खड्ड्यात महिला व एक कुत्रा पडल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या.

    Landslide रयतवारी कॉलरी परिसरातील आमटे ले आऊट येथे राहणारे शिवणकर कुटुंब बाहेरगावी गेले होते, 2 दिवसांनी म्हणजेच 1 ऑगस्टला ते घरी आले, घराचे दार उघडताच त्या खड्ड्यात महिला कोसळली.

    त्यानंतर सदर बाब वाऱ्यासारखी शहरात पसरली तो पर्यंत त्या खड्ड्यात सीडी लावत महिलेला बाहेर काढण्यात आले, पुढील उपचारासाठी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

    राजकीय – खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला कांग्रेसने मारले जोडे

    मागील 10 दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी मुळे सदर घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या संपूर्ण घर खाली करण्यात आले असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चे अधिकारी, पोलीस अधिकारी व आमदार त्याठिकाणी दाखल होत नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

    घटनेचे कारण काय?

    चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीने वेढलेला आहे, जिल्ह्यात विविध भागांत कोळसा खाणी आहे, विशेष बाब म्हणजे ज्याठिकाणी ही घटना घडली ती सुद्धा वेकोलीच्या बंद असलेल्या रयतवारी कोळसा खाणी जवळील भागात आहे.

    Wcl द्वारे अंडर ग्राउंड कोळसा खाणीमधून कोळसा बाहेर काढल्यावर त्याठिकाणी माती टाकावी लागते मात्र तसे होत नाही, आवश्यकतेनुसार तशी प्रक्रिया केल्या जात नाही त्यामुळे अशी घटना घडली. विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात वेकोली च्या खाणी बंद अवस्थेत आहे, त्याठिकाणी काहीजण फायदा घेत वेकोलीच्या जागेची विक्री करतात, अवैधरित्या अश्या विक्री होत असल्याने वेकोली मात्र झोपेचं सोंग घेऊन राहते, लालपेठ भागात खाणीचा विस्तार सुरू आहे मात्र अजूनही त्या भागातील नागरिकांना हटविण्यात आले नाही, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा जैसे थे आहे.

    महत्त्वाचे : पत्रकारांच्या मुलाचा लंडनमध्ये सन्मान

    Landslide चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक शहरात 26 ऑगस्ट 2022 रोजी आमराई वार्डात अशाच प्रकारे एक घर अशाच घटनेत तब्बल 70 फूट खाली खचले होते. कोळसा काढून पोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजविल्या न गेल्याने अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असतात. आता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे तज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरमालक सुरेश शिवणकर यांनी प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

    आमदार पोहचले घटनास्थळी

    चंद्रपूर रय्यतवारी कॉलरी भागात अचानक भूस्खलन झाल्याने एका कुटुंबावर संकट कोसळले आहे. दोन दिवस बाहेरगावी राहून घरी परतलेल्या शिवणकर कुटुंबाच्या घरात २० फूट खोल खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहे.
        यावेळी तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, रामनगर ठाणेदार सुनिल गाडे,अजय जैस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रकात बातव आणि वेकोलिच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    योजना : लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा करा एडिट


       घरातील सुनिता नामक महिला  दरवाजा उघडताच अचानक खड्ड्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ मदत करत शिडीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतु, शिवणकर कुटुंबावर ही घटना अत्यंत भीषण असल्याने त्यांना तातडीने मदत पुरवण्यात आली.
      गेले दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.   घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.
    शिवणकर कुटुंबाच्या राहण्याची सोय वेकोलि वसाहतीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनाने तातडीने पिडीत कुटुंबाला मदत करावी आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही सूचना आमदारांनी केली आहे.

  • Congress : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेवर कांग्रेसने केला जोड्यांचा मारा

    Congress : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेवर कांग्रेसने केला जोड्यांचा मारा

    Congress लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काॅंग्रेस नेते, खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतुन आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकुरनी मा.खा. राहुलजी गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खा. अनुराग ठाकुरच्या निषेधार्थ ब्रम्हपूरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मा.शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले. 

    महत्त्वाचे : पत्रकाराचा मुलगा साता समुद्रापार चमकला

    Congress यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाईफेक करून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. व भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

    बघा जोडे मारो आंदोलनाचा व्हिडीओ

    याप्रसंगी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक नितीन उराडे, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅग्रेस सचिव मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी जि.प.सदस्या स्मिता पारधी, बाजार समिती उपसभापती सुनीता तिडके यांसह तालुका/शहर काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल , सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यासहित राज्यात सुद्धा अनुराग ठाकूर विरोधात कांग्रेस रस्त्यावर उतरले आहे.

  • Rice mill : नागपूर मार्गावरील राईस मिल मध्ये आग

    Rice mill : नागपूर मार्गावरील राईस मिल मध्ये आग

    rice mill गुरू गुरनुले मुल – मुल नागपुरे राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी नारायण राईस मिलच्या बाजूलाच अमोल एंटर प्रायजेस कंपनीची राईस मिल अनेक वर्षापासून उत्कृष्ठ तांदळाचे उत्पादन करीत आहे. सध्या स्थितीत गेल्या बारा दिवसापासून दिवस रात्री पाऊस येणे सुरूच आहे.

    अवश्य वाचा : पत्रकारांच्या मुलाची लंडन भरारी

    Rice mill दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास अमोल एंटर प्रायजेस कंपनीची उच्च प्रतीच्या तांदळाचे लाखो टन उत्पादन करणारी राईस मिल आहे. याच राईस मिलला लागूनच कोंड्याचे शेड आहे. याच शेडला रात्रीला ३ वाजता सुमारास अचानक आग लागल्याने शेड मधील पूर्ण कोंडा व राईस मील मद्ये असलेले उच्च प्रतीच्या धानाचे ५००० हजार पोते स्टॉक होते.त्यातील १०० पोते जळून खाक झाले. यात लाखोचे नुकसान झाले असल्याचे अमोल एंटर प्रायजेसचे संचालक अमोल बच्चुवार यांनी आमच्या प्रतीनिधि जवळ प्रत्यक्ष पाहणी करतांना सांगितले.

  • Master of Science : पत्रकाराचा मुलगा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण

    Master of Science : पत्रकाराचा मुलगा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण

    Master of science परिष मेश्राम वार्विक युनिव्हर्सिटी युके (लंडन)मधील सायबर सेक्युरिटी मॅनेजमेंट (मास्टर ऑफ सायन्स) मध्ये बल्लारपूर येथील वरिष्ठ पत्रकार एडवोकेट मंगल जीवने यांचा मुलगा सम्यक जीवने प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश मिळविले. त्याचा सत्कार बुधवारला सकाळी बारा वाजता वार्विक युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएशन डे 2024 या कार्यक्रमात वार्विक यूनिवर्सिटी चे व्हाईस चाउन्सलर व अध्यक्ष बारोनॅस कॅरी आस्टन व रजिस्टार रॉबिन क्लार्क यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मान करण्यात आला.

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला असेल तर असं करा दुरुस्त

    सम्यक यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले त्याच्यावर बल्लारपुरातील गणमान्य नागरिक व हितचिंतक यांनी त्याच्यावर सर्वत्र कौतुकाची थाप पाडली आहे.

  • Ladki bahin arj : महिलांनो आता शेवटची संधी

    Ladki bahin arj : महिलांनो आता शेवटची संधी

    ladki bahin arj – मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात आजपर्यंत 2 लक्ष 70 हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच 27 जुलैपासून ऑनलाईन अर्ज तपासणीचे काम सुरू झाले असून प्रत्येक तालुका स्तरावर वॉररूम तयार करण्यात आली आहे. यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आाहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन हे या योजनेच्या कार्यप्रणालीवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक बनण्याची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

    Ladki bahin arj अर्जदारांसाठी सुचना : 1) ज्या यंत्रणांनी ऑफलाईन अर्ज जमा केले आहेत त्यांनी तातडीने अर्ज ऑनलाईन करावे. अर्जदारांनी आपला अर्ज ऑनलाईन असल्याची खात्री करावी. यासाठी अर्ज ऑनलाईन झाल्याचा एसएमएस आला की नाही हे तपासावे. ज्यांना असा एसएमएस आला नसेल त्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज ऑनलाईन भरून घ्यावा. 2) अर्जाची तपासणी होऊन अर्ज मंजूर झाला असेल तर त्याबाबत अर्ज मंजूर झाल्याचा एसएमएस अर्जदाराच्या मोबाईलला येणार आहे. ज्या अर्जदाराचे अर्ज काही कारणाने नामंजूर झालेले असेल अशा अर्जदारांना याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. 3) अर्ज नामंजूर झाल्याची कारणे ज्या मोबाईल मधून अर्ज भरला असेल तेथे दिसून येईल. अर्ज दुरुस्त करण्याची एक संधी अर्जदारास असणार आहे. त्यामुळे अर्जदाराने अशा अर्जातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करून अर्ज सबमिट करावा, ही संधी एकदाच असून त्यानंतर अर्ज कायमचा बाद होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

  • Gadchandur Bomb Case : असा फसला त्या जुळ्या भावांचा प्लॅन

    Gadchandur Bomb Case : असा फसला त्या जुळ्या भावांचा प्लॅन

    Gadchandur bomb case प्रतिनिधी | प्रकाश हांडे
    गडचांदूर – गडचांदूर शहरात 30 जुलैला भगवती nx या कापड दुकानात अज्ञात इसमाने बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याने खळबळ उडाली होती.
    बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याने आरोपी इसमाने भगवती nx वस्त्र भांडार चे मालक शिरीष बोगावार व त्यांच्या पत्नीला फोन केला, आणि तुमच्या दुकानात आम्ही बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले.

    अवश्य वाचा : पायलट बनण्याचे स्वप्न होणार पूर्ण, असा करा अर्ज


    Gadchandur bomb case गडचांदूर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी 2 जुळे भाऊ आयुष धाबेकर व पियुष धाबेकर यांना अटक केली. आरोपीनी धमकी देत खंडणी वसुली करण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
    आरोपी जुळे भाऊ हे दोघे चिमूर तालुक्यातील निवासी असून दोघेही गडचांदूर येथे जलजीवन मिशन च्या कामाकरिता आले होते, अंगावर कर्ज झाल्याने ते फेडायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता, त्यामुळे त्यांनी ही योजना आखली. दोघा भावांनी youtube बघून पाईप, सर्किट, led लाईट व घडी च्या साहायाने तो बॉम्ब बनविला होता. सदर बॉम्ब बनावट असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोध पथकाने तो बॉम्ब निकामी केला.
    तब्बल 7 तास हे बनावट बॉम्ब नाट्याने पोलीस विभागाची तारांबळ उडाली होती, या प्रकरणात अजून 1 आरोपी असून सध्या तो पसार आहे. गडचांदूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

    विशेष बाब म्हणजे 2024 या वर्षात चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीने चर्चेत आला आहे, एक लहानश्या जिल्ह्यात अश्या प्रकारे गुन्हे घडणे ही एक गंभीर बाब आहे, जुलै महिन्यात 3 गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे, जिल्ह्यात बंदुकीचा पुरवठा कुठून होत आहे, याबाबत मात्र अजूनही काही सुगावा लागलेला नाही. नव्या पोलीस अधिक्षकांसमोर गुन्हेगारीने नवे आवाहन उभे केले आहे. पोलीस प्रशासनाला आता आपली गुप्त यंत्रणा मजबूत करायला हवी.

  • Mns vs Rto : मनसेचा परिवहन अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप

    Mns vs Rto : मनसेचा परिवहन अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप

    Mns vs Rto चंद्रपूर:- जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व इतर अधिकारी हे वर्षाकाठी 80 कोटीच्या वर बेकायदेशीर वसुली करून स्वतःची गडगंज संपत्ती मिळवीत असल्याने या परिवहन अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून ईडी मार्फत चौकशी करा व त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, मनसे जिल्हाध्यक्ष राजू कुकडे, मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे शहर अध्यक्ष पियुष धुपे उपस्थित होते.

    अवश्य वाचा : पालकमंत्री मुनगंटीवार झाले भावुक

    Mns vs rto चंद्रपूर जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आता प्रादेशिक परिवहन कार्यालय झाले असून इथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या कडे प्रादेशिक परिवहन अधिकारी चा चार्ज दिला गेला आहे तर सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणुन चार्ज दिला गेला आहे, या कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कुठलेही कायदेशीर काम होतं नसून साधे ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी सुद्धा एजंट मार्फतच जावे लागते अन्यथा फेल केल्या जाते, या कार्यालयात मोठ्या प्रमाणात वाहन मालकाकडून बेकायदेशीर वसुली होत असून वरील गैरअर्जदार हे ही वसुली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे अरुण टोंगे, रवी निवलकर, संजय नगराळे, राहूल नगराळे, देवा गोंगले, दिपक खाडीलकर, रमेश नळे, मनोज घडसे, गणवीर, कुणाल नगराळे, पंकज व अतुल माळवे ह्या खाजगी लोकांना शासनाची कुठलीही मंजुरी न घेता बेकायदेशीर कार्यालयीन कामे व वसुली करिता एजंट म्हणुन नियुक्त केले आहे, वास्तविक पाहता उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरमध्ये कार्यालयीन कामांकरिता शासनाने कोणतेही खाजगी कर्मचारी नेमले नसतांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी ट्रान्सपोर्टर व नवीन गाड्यांच्या शोरूम मालकाकडून व गाड्या पासिंग च्या नावाखाली अवैध वसुली करिता यांना ठेवण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : लोकसभा पावसाळी अधिवेशनात प्रतिभा धानोरकर यांचे जोरदार भाषण

    या कार्यालयात एका वर्षात जवळपास एक लाख वाहने नोंदणी होतं असतात तर तेवढेच नागरिक लायसन्स सुद्धा काढतात यामधून यांनी नेमलेल्या एजंट आणि दलाला मार्फत प्रत्येकी 500 रुपये हे बेकायदेशीरपणे या अधिकाऱ्यांच्या घशात जातात म्हणजे वर्षाकाठी जवळपास गाड्या पासिंग व लायसन्स मिळून हे 10 कोटी कमावतात, सोबत फिटनेस व गाडी ट्रान्सफर यासाठी सुद्धा त्यांचे रेट ठरलेले आहेत यातून 2 कोटी रुपये कामावतात, जिल्ह्यात जवळपास ट्रक, हायवा व सिमेंट कंपन्यात चालणारे ट्रक इत्यादी मिळून 10 हजार पेक्षा जास्त गाड्या आहेत त्यातून एंट्री फी च्या नावावर 3 हजार ते 7 हजार हे एजंट मार्फत वसुल करतात त्यांचे महिन्याकाठी 5 कोटी तर वर्षाकाठी 60 कोटी रुपये हे कामावितात, एवढेच नाही तर तेलंगना राज्य सिमा नाका आहे त्या रोड ने कमीतकमी 500 गाड्या चालतात त्या गाडयांकडून प्रत्येकी 500 ते 700 रुपये घेतात त्याची रक्कम 3 लाख रुपये याप्रमाणे महिन्याकाठी 90 लाख तर वर्षाकाठी 10 कोटी 80 लाख रुपये हे कमावितात असे एकूण ते 80 कोटी 80 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम कमावितात सोबतच गाड्यांचे टॅक्स सेटलमेंट यातून वर्षाला दोन चार कोटी हे कमावतात तर गाड्यांच्या बोगस रजिस्ट्री सुद्धा येथे केल्या जातात.

    असा फुटला गडचांदूर शहरातील तो बॉम्ब

    या प्रादेशिक परिवहन कार्यालयात होतं असलेल्या भ्रष्टाचाराची अनेकांनी लाचलुचपत विभागाला, राज्याचे परिवहन मंत्री यांना व स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी दिल्या, मात्र यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम हे एवढे छातीर आहे की समोरच्यांना पैसे देऊन गप्प करतात दरम्यान मोटार वाहन निरीक्षक कलबरसिंग कलसी यांच्याकडे वसुलीच्या पैशाचं काम आहे तेच सर्वाना मैनेज करतात, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी हे काहीही बोलायला तयार नाही त्यामुळं हा भ्रष्टाचार जोरात सुरू असून या प्रकरणी ईडी मार्फत चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात धाड टाकून चौकशी करावी व सत्यता पडताळणी करिता प्रमुख अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी आणि दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा आपण सुद्धा त्यांच्यासोबत मिळाल्यास आम्ही या संदर्भात पुराव्यासह न्यायालयात दाद मागू असा इशारा मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून निदेशक, अंमलबजावणी संचालनालय यांना दिला आहे.

    परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणतात की…


    याबाबत चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्याशी सम्पर्क साधला असता ते त्यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देत कुकडे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले, ते म्हणाले की 5 दिवसांपूर्वी राजू कुकडे यांच्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली होती, त्यांच्या वाहनाचा टॅक्स पेंडिंग आहे, त्यामुळे वैयक्तिक द्वेषापोटी त्यांनी हे आरोप केले असावे, राहिला प्रश्न चौकशीचा तर आम्ही कुठल्याही चौकशीसाठी तयार आहो अशी प्रतिक्रिया प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.

  • Sudhir Mungantiwar : कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मुनगंटीवार झाले भावुक

    Sudhir Mungantiwar : कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मुनगंटीवार झाले भावुक

    sudhir mungantiwar आज वाढदिवसाच्या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळत आहे. लोकांचे प्रेम मिळत आहे. या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील बालाजी मंदिरात आयोजित महाआरती प्रसंगी ते बोलत होते.

    महत्त्वाचे : गडचांदूर बॉम्ब प्रकरणी जुळे भाऊ ताब्यात

    Sudhir mungantiwar ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भगवान बालाजीची आपल्या परिवारावर कृपा आहे. महाराष्ट्रात कोणालाही मिळाला नसेल असा बहुमान भगवान बालाजीने आपल्या परिवाराला दिला आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने माझ्या अर्धांगिनीची नियुक्ती तिरूपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी केली होती . यातून भगवान बालाजीची सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. केवळ मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्याच्या हितासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. जनसेवेचे व्रत आपण घेतले आहे. हे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    अवश्य वाचा : लोकसभा पावसाळी अधिवेशनात प्रतिभा धानोरकर यांचे जोरदार भाषण

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बल्लारपूर,दुर्गापूर, लखमापूर येथे महाआरती करण्यात आली. मूल येथे रूग्‍णांना फळे व भेटवस्‍तुंचे वाटप करण्यात आले. कार्यकर्ता स्‍नेहमिलन घेण्यात आले. पुरग्रस्‍त भागातील नागरिकांना अन्‍नधान्‍याच्‍या किटचे वाटप करण्‍यात आले. पोंभूर्णा येथे विविध आजारांवर मोफत उपचार करण्‍यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्‍यात आले. राजुरा येथेही महाआरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. काशीनाथ सोमा टेकाम यांचा पुरात बुडाल्याचे मृत्यू झाला. यांच्‍या पत्‍नी सिंधुबाई टेकाम व मुलगा सुनिल टेकाम यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते चार लाख रूपयांचा सानुग्रह निधी प्रदान करण्‍यात आला. चंद्रपूर महानगर भाजपा तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. जिल्हाभर कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. वाढदिवसाच्या दिवशीही जनसेवेशी संबंधित उपक्रम राबवित ना. श्री. मुनगंटीवार यांनी लोकनेता कसा असतो, याचा परिचय पुन्हा एकदा दिला.

  • Ncp Ap : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

    Ncp Ap : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

    Ncp AP मनोज गोरे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्याच्या ठिकाणी भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आबिद अली प्रदेश सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले परिसरातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी होवून शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधले राजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना,जिवती तालुक्यात वर्ग २ जमीन १ कामासाठी वाद २ दशकापासून सुरु आहे यामुळे शेतकऱ्याची पिळवणुक आर्थिक भुर्दंड तसेच चकरा मारण्यात वेळ जात आहे.

    अवश्य वाचा : पावसाळी अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांची जोरदार बॅटिंग

    Ncp Ap नागरिक त्रस्त आहेत कार्यालयातील चकरा व शासनाने ऑनलाईन करतांना वर्ग २ नोंदविल्याने शासनाने वेळोवेळी शासन निर्णय होवून सुद्धा प्रश्न सुटले नाही मोहीम राबवीत हा प्रश्न सोडवावा व ग्रामपंचायत तलाठी साजा निहाय वर्ग १ मोहीम राबवावी वन्यप्राण्यामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ७५% अनुदानावर पिक संरक्षणासाठी कुंपण झटका मशीन उपलब्ध करण्यात यावे आदिवासी पेसा क्षेत्रातील ३ पिढीचा पुरावा अट शिथिल करावी व गैरआदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप करावे राष्ट्रीय महामार्ग जडवाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते नादुरुस्त झाले ते तातडीने दुरुस्त करण्यात यावीत व जि.आर.आय.एल कंपनीने मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन कामाची चौकशी करावी जिवती-कोरपना तालुक्यातील जलजीवन मिशन निकृष्ठ कामाची व गैरव्यवहाराची चौकशी करावी संजय गांधी निराधार योजनेच्या बोगस लाभार्थी रद्द करावे या सह अनेक मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री,महसूल मंत्री,वनमंत्री,विभागीय आयुक्त यांना तहसीलदार कोरपना मार्फत देण्यात आले.

    यावेळी शिष्ट मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स.आबिद अली, महादेव साखरकर,संजय पिंपळशेंडे,महादेव पेंदोर,धनराज जीवने,विवेक वडस्कर,मोहब्बत खान, मारोती खापने विकास टेकाम, नादिर कादरी, शहेबाज अली,हिरालाल चव्हाण, भाऊराव ठाकरे, चंद्रभान तोडासे, लक्ष्मन मोहितकर यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : भरोसा सेल ने पालकांना दिला भरोसा

    यावेळी तहसीलदार मा.व्हटकर यांनी वर्ग २ जमिनीचा भूमिधारी बाबत गावनिहाय्य नियोजन करून प्रकरण निकाली व हि मोहीम आँगस्ट महिन्यापासून सुरु करण्यात येईल वन्यप्राणी व पंचनामे संबंधात वनविभागाला योग्य सुचना करण्यात येईल आपल्या निवेदनातील स्थानिक प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले व तहसिलविभागाचे प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे शिष्ठमंडळाला आश्वासित केले यावेळी अनेक शेतकऱ्याचे प्रश्न तहसीलदारांनी समजून घेतले आंदोलन कर्त्यांनी घोषणाबाजी करित तहसीलकार्यालयासमोर धरणे दिले.

    यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता. परिसरातील नागरिकांचे महत्वाचे प्रश्न आंदोलनात चर्चेला आल्यामुळे शेतकरी मागण्या शासनाने मान्य करण्याची मागणी केली

  • Mp Pratibha Dhanorkar : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धानोरकरांची जोरदार बॅटिंग

    Mp Pratibha Dhanorkar : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धानोरकरांची जोरदार बॅटिंग

    mp pratibha dhanorkar सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच घेरले. काल चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील सभागृहात अर्थसंकल्पावर भाषण देत मोदी सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले याकडे लख वेधले.

    Mp pratibha dhanorkar खासदार धानोरकर यांनी आपल्या भाषणा दरम्यान महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात सावत्र वागणूक मिळाल्याची खंत देखील व्यक्त केली. त्यासोबतच शेतकरी आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचे देखील सांगितले. 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी देखील सभागृहात केली. शेतकऱ्यांच्या शेतमाला ला हमीभाव मिळावा यासाठी देखील प्रयत्न करावे अशी मागणी केली.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील युवक आता पायलट बनणार

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पूर परिस्थितीच्या संदर्भाने देखील सभागृहात चर्चा करुन तात्काळ मदतीची मागणी केली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची रक्कम तात्काळ मिळावी, शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र सरकार ने सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या बी-बियाणावर व साहित्यांवर लावलेला जीएसटी चुकीचे असल्याचा घणाघात देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. नीट मधील पेपर फुटीच्या प्रकरण व आस.ए.एस. अधिकारी पुजा खेडेकर यांच्या संदर्भाने देखील सभागृहाचे लक्ष वेधले. जातनिहाय जणगणना करावी अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

    अवश्य वाचा : गडचांदूर चा बॉम्ब निकामी, जुळ्या भावांना अटक

    महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा केंद्र सरकार ने सोडवावा, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगाराचे आमिष दाखवून सरकार ने युवकाची दिशाभूल केल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. देशात महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारासंदर्भात सरकार ला चांगलेच धारेवर धरले. कोळसा खाणी संदर्भात प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल्याची मागणी देखील अर्थसंकल्पावरील भाषणात केली. या सोबतच भारत जोडो यात्रे संदर्भात राहुल गांधीनी इतिहास घडविल्याचे वक्तव्य देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सांगितले.