Author: Admin

  • Unified Pension Scheme : केंद्र सरकारच्या नव्या पेन्शन योजनेचा फायदा किती?

    Unified Pension Scheme : केंद्र सरकारच्या नव्या पेन्शन योजनेचा फायदा किती?

    Unified Pension Scheme केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना मंजूर केली आहे. 

    या योजनेअंतर्गत, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के पेन्शन म्हणून मिळेल.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ 23 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

    Unified Pension Scheme नुकत्याच झालेल्या निवडणुकीत केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना (NPS) ऐवजी जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वीपणे मोडून काढला आहे.  केंद्र सरकारच्या 23 लाख कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, जो विद्यमान NPS सोबत लागू होईल.

    गुन्हेगारी : उधारी चुकविली नाही म्हणून पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    कर्मचाऱ्यांना खात्रीशीर रक्कम मिळेल

     UPS अंतर्गत, कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, कौटुंबिक पेन्शन, खात्रीशीर किमान पेन्शन, निवृत्ती वेतनाची रक्कम महागाई दराशी जोडणे आणि ग्रॅच्युइटीव्यतिरिक्त निवृत्तीच्या वेळी निश्चित रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

    जुन्या पेन्शन योजनेपेक्षा ते किती वेगळे आहे?

     Unified Pension Scheme एकप्रकारे, हे जुन्या पेन्शन योजनेसारखेच असेल, परंतु फरक एवढाच असेल की ओपीएसमध्ये, जिथे कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागत नव्हते, यूपीएसमध्ये त्यांना एनपीएसच्या धर्तीवर 10 टक्के योगदान द्यावे लागेल.  कर्मचाऱ्यांना यूपीएससाठी कोणतेही अतिरिक्त योगदान द्यावे लागणार नाही, तर केंद्र सरकारने पेन्शन फंडातील योगदान सध्याच्या 14 टक्क्यांवरून 18.5 टक्के केले आहे.  जी महागाई दर इत्यादींमुळे वर्षानुवर्षे वाढतच जाईल.

    आता OPS म्हणून खात्रीशीर पेन्शनसाठी UPS. 

     पेन्शनची किमान रक्कम 10,000 रुपये असल्याचे आश्वासन दिले आहे.   ग्रॅच्युइटीशिवाय सहा महिन्यांचा पगारही निवृत्तीनंतर एकरकमी दिला जाईल.  कर्मचाऱ्यांवर कोणताही बोजा नाही, सरकारने योगदान 18 टक्के केले.  पहिल्या वर्षात सरकारवर 6250 कोटींचा बोजा.  NPS अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना UPS स्वीकारण्याचा पर्याय आहे.  केंद्र सरकारचे मॉडेल राज्ये स्वीकारू शकतात.  99 टक्क्यांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना UPS स्वीकारण्याचा फायदा होतो.

    केंद्रावर अतिरिक्त भार पडणार आहे

     यामुळे 2025-26 या वर्षात केंद्रावर 6250 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.  निवडणुकीच्या वातावरणात सरकारकडूनही हे मोठे राजकीय प्यादे मानले जात आहे.  युक्रेनहून प्रवास केल्यानंतर शनिवारी दुपारी नवी दिल्लीत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक संध्याकाळी उशिरा झाली, ज्यामध्ये युनिफाइड पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला.

    OPS चे विशेष वैशिष्ट्य

     निवृत्तीदरम्यान कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या ५० टक्के पेन्शन देण्याची तरतूद होती.

     योगदान: पेन्शनचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने उचलला.  याचा अर्थ OPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये त्यांचे योगदान द्यावे लागत नव्हते.

     पात्रता: OPS फक्त त्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे जे 1 जानेवारी 2004 पूर्वी सेवेत रुजू झाले आहेत.

     समायोजन: महागाई भत्ता (DA) मधील बदलानुसार पेन्शन वेळोवेळी समायोजित केली जाते, जी महागाईशी संबंधित आहे.

  • Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली.

    पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातून वयोश्री योजनेसाठी 10 हजार 766 अर्ज दाखल

    Shocking incident पानठेल्यावर खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीवर बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

    Shocking incident बबन रोहणकर याचा पानठेला आहे. त्याच्या पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने त्या मुलीला खर्ऱ्याची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकीही दिली. मात्र त्या मुलीकडे खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून बबनने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून मागील तीन ते चार महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.

    असा उघडकीस आला प्रकार
    पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली.

    विकृत मानसिकता

    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात 6 जणांनी मिळून मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करीत त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला, पोलिसांनी सदर घटनेत तत्परता दाखवीत आरोपीना अटक केली, या घटनेला 2 दिवस उलटत नाही तर पुन्हा दुर्गापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटनेमध्ये आरोपी यांची विकृत मानसिकता असल्याचे निदर्शनास येते. चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहावे यासाठी सामाजिक संघटना जागृती मशाल मंचतर्फे मध्यरात्री रॅली चे आयोजन केले आहे.

  • Vayoshri Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार 766 अर्ज प्राप्त

    Vayoshri Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार 766 अर्ज प्राप्त

    Vayoshri Yojana राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात म्हणून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 10766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने केले आहे.

    अवश्य वाचा : जिवती तालुका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, कारण काय?

    Vayoshri yojana ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे नागपूर विभागात एकूण 66898 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात प्राप्त अर्जांची संख्या 10766 आहे. ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणे, तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभार्थ्यांच्या बचत खात्यात थेट वितरीत करण्यात येणार आहे.

    ही उपकरणे खरेदी करता येणार : 

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनूसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर खरेदी करता येतील. तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग उपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मन:शक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

    लाभार्थी पात्रता : 

    31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपयांच्या आत असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

    आवश्यक कागदपत्रे : 

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे.

    येथे करा संपर्क : 

    अधिक माहितीसाठी सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर तसेच शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा कार्यालयात संपर्क साधावा. सदर कार्यालयात पात्र ज्येष्ठ नागरीकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • jivati taluka : राज्यात जिवती तालुका दुसऱ्या क्रमांकावर

    jivati taluka : राज्यात जिवती तालुका दुसऱ्या क्रमांकावर

    jivati taluka विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या नीति आयोगाने संपूर्ण भारतात 500 आकांक्षित तालुके घोषित केले आहे. यात महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती या एकमेव तालुक्याचा समावेश असून नुकत्याच जाहीर झालेल्या 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जीवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर पहिल्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याचा समावेश आहे.

    अवश्य वाचा : तीन महिन्यापूर्वी लग्न आणि विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत

    Jivati taluka केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आंतरमंत्रालयीन समितीने 27 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशातून 500 तालुक्यांची निवड केली आहे. त्यापैकी या योजनेत महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जिवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यातील 27 तालुक्यांमूधन द्वितीय क्रमांक, पश्चिम विभागातील 70 तालुक्यांमधून 21 वा क्रमांक तर संपूर्ण भारतातील 500 तालुक्यांमधून जीवती तालुक्याने 111 वा क्रमांक पटकाविला आहे.

    आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, मुलभूत पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या थीमवर तालुक्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारच्या 40 निर्देशांकांपैकी जीवती तालुक्यात 6 निर्देशांक 100 टक्के साध्य करणे, हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 4 जुलै 2024 रोजी जीवतीमध्ये आकांक्षित तालुका अभियान अंतर्गत संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात फोटो/व्हिडीओ काढणे पडणार महागात, नवे नियम लागू

    असे आहेत जीवती तालुक्यासाठी विशेष निर्देशांक : आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मुलभूत पायाभूत सुविधा या प्रमुख पाच थीमवर सदर अभियान 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात 1) गरोदर मातांची पहिल्या तिमाहीमध्ये 100 टक्के नोंदणी करणे, 2) तालुक्यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या नागरिकांची 100 टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे, 3) या वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी करणे, 4) तालुक्यातील 100 टक्के गरोदर मातांना नियमितपणे पोषण आहार देणे, 5) भुधारकांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण करणे आणि 6) तालुक्यातील 100 टक्के बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे.

  • Intercaste marriage : गोंडपीपरी तालुक्यात विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत

    Intercaste marriage : गोंडपीपरी तालुक्यात विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत

    Intercaste marriage चंद्रपूर/गोंडपीपरी – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात असणाऱ्या पानोरा गावात आज रात्री च्या सुमारास धक्कादायक घटना घडली.

    रात्री 9.30 वाजताची वेळ अचानक एक महिला विहिरी च्या दिशेने धावत आली, काही क्षणात तिने विहिरीत उडी घेतली, तिला वाचविण्यासाठी पतीने सुद्धा विहिरीत उडी घेतली आणि दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

    अवश्य वाचा : शासकीय रुग्णालय चंद्रपुरात फोटो/व्हिडीओ काढण्यास मनाई

    Intercaste marriage गोंडपीपरी तालुक्यातील पानोरा गावातील प्रकाश शरबत ठेंगणे व उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतकाची नावे आहे, तीन महिन्यांपूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता, मात्र आज दोघात असं काय घडलं की पत्नीने विहिरीत उडी घेतली, याबाबत तर सध्या प्रश्नचिन्ह आहे? ही घटना का घडली? याबाबत पोलीस तपास करतीलचं.

    महत्त्वाचे : 3 वर्षांपूर्वी रानटी डुक्कराच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले होते, वनविभागाची मदत तब्बल 3 वर्षांनी मिळाली

    पानोरा गावात विवाहित जोडप्याचा असा धक्कादायक अंत कुणालाही अपेक्षित नव्हता, हसत खेळत व चांगल्या दोघे राहत होते, घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, घटनेचा पंचनामा करण्यात आला असून दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी पानोरा गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

    सध्या तरी मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे, पोलीस तपासनंतर दोघात काय घडलं? व यामागील कारण काय हे पोलीस सांगू शकणार. ठेंगणे दाम्पत्य यांचं लग्न झाल्यापासून काही वाद होता का? त्यांना कुटुंबीय काही मानसिक त्रास देत होते का? याबाबत आता पोलीस तपास करणार आहे.

  • Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

    Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

    gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे.

    Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाईकाकडे एक हिरव्या रंगाचा व एक लाल रंगाचा पास देण्यात येईल. हिरव्या रंगाचा पास हा रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांकरिता असेल, तर लाल रंगाचा पास हा रुग्णालय प्रशासनामार्फत भेटीसाठी नेमून दिलेल्या दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत इतर नातेवाईकांना भेटण्याकरिता राहील. लाल रंगाच्या पास वर एकावेळी एका नातेवाईकाला रुग्णास भेटण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच आधी गेलेला नातेवाईक परत आल्यानंतर त्याच पासचा वापर करून दुसऱ्या नातेवाईकास आत प्रवेश देण्यात येईल. सदर पासची वैधता 7 दिवसांकरिता राहील.

    अवश्य वाचा : 3 वर्षांपासून रखडलेलं काम, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका झटक्यात केलं

    Gmc chandrapur रुग्ण जर 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीकरिता भरती राहिल्यास सदर पासवर आंतररुग्ण नोंदणी विभागातून नवीन तारखेचा शिक्का मारून घेणे आवश्यक आहे. तसेच पास हरवल्यास 50 रुपये प्रतीपास दंड आकारण्यात येईल. दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णाकडील दोन्ही पास वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे जमा करण्यात यावे. त्याशिवाय रुग्णास सुट्टी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

    तर होणार 500 रुपये दंड : रुग्णालयाचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छ राहावा, याकरिता धूम्रपान करणे, पान, गुटखा, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे. परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना किंवा थुंकताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

    बाहेरील वाहनांना प्रवेश निर्बंध : रुग्णालय परिसरामध्ये विनाकारण बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त रुग्णांची ने – आण करण्याकरिता मर्यादित वेळेसाठीच बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वाहन पासेस उपलब्ध करुन दिल्या जाईल सदर पासच्या आधारे त्यांना रुग्णालयात वाहनासह प्रवेश देण्यात येईल.

    अवश्य वाचा : महाविकास आघाडीच्या आंदोलनात पालकमंत्री मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांचा निषेध

    विनापरवानगी फोटो /व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई : रुग्णालयाच्या आत तसेच परिसरात विनापरवानगी फोटो तसेच व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई असून असे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. फोटो किंवा व्हिडिओग्राफी करायची असल्यास वैद्यकीय अधीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊनच काढण्यात यावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

    नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तैनात झालेले सुरक्षा रक्षक, रुग्णालय प्रशासन, तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी केले आहे.

  • Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

    Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

    Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज त्यांच्या प्रयत्नांतून सलग 3 वर्षा आधीच्या रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना आपल्या प्रयत्नातून मदत मिळवून दिली.

    अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुनीम च्या कुटुंबाला मिळाली वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्हा हा वन व्याप्त जिल्हा असल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत असतात. या हल्ल्यात जखमी नागरीकांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जात असते. परंतु हि मदत अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती.

    Pratibha dhanorkar सन 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील विविध घटनेत पाच नागरीक रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. परंतु तीन वर्ष लोटूनही त्यांना वन विभागाकडून मदत मिळाली नव्हती. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष प्रयत्न करुन जखमींना तात्काळ मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्याची फलश्रृती म्हणून आज दि. 24 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या उपस्थितीत रानटी डुकाराच्या हल्ल्यात जखमी झालेल्ल्या त्या पाच नागरीकांना प्रत्येकी 1 लक्ष 25 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या कामाने जखमी कुटूंबातील सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

    आंदोलन : महिला अत्याचाराविरोधात चंद्रपुरात महाविकास आघाडीचे तोंडाला काळ्या फिता लावीत निषेध आंदोलन

    यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजु चिकटे, वरोरा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर त्या सोबतच वन विभागाचे अधिकारी व नागरीकांची उपस्थिती होती.

    विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वनमंत्री सुद्धा आहे, त्यांना याबाबत वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली नव्हती काय? त्यांच्याकडे त्या नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी कधी भेट घेतली की नाही? हे अनेक प्रश्न यावरून उपस्थित झाले असले तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तक्रार प्राप्त होताच संबंधितांना मदत का दिली नाही याबाबत वनविभागाला जाब विचारला आणि काही दिवसात 3 वर्षांपासून मदतीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मदत मिळाली.

  • Forest Department : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोलावार यांच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    Forest Department : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोलावार यांच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    forest department गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील वनपारिक्षेत्र चिचपल्ली (प्रादेशिक) उपक्षेत्र मूल नियतक्षेत्र मूल मधे मुनीम रतिराम गोलावार वय (41) वर्ष रा. चिचाला ता. मूल जिल्हा चंद्रपुर हे दिनांक 18/8/24 रोजी कक्ष क्रमांक 752 मधे बकरी चरावयास गेला सायंकाली घरी परत न आल्याने सदरची माहिती वनविभागास दिली.

    आंदोलन : चंद्रपुरात महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन

    Forest department दिनांक 19/8/24 रोजी श्री प्रशांत खाड़े विभागीय वनअधिकारी चंद्रपुर वनविभाग व प्रियंका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादेशिक) चीच्पल्ली यांचे आदेशानव्ये एम. जे.मस्के क्षेत्र साहयक मूल, वनरक्षक सुधीर ठाकुर, राकेश गुरनुले संजीवनी पर्यावरण संस्थाचे उमेशसिंह झिरे व सदस्य rru टीम चंद्रपुर यांनी सकाळी 6.00 वाजता शोध घेतला असता सदर इसमाचा मृत शव आढ़ळून आला मोकयावर पोलिस कर्मचारी पंचनामा करुन शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले व आज दिनांक 24/8/25 रोजी ना. सुधीर मूंनगटीवार मंत्री, वने महारास्ट् राज्य यांचे हस्ते मृतकाची पत्नी श्रीमती चंदा मुनीम गोलावार याना 10 लक्ष रू.रकमेचे धनादेश देण्यात आले.

    अवैध बांधकाम : चंद्रपूर शहरात अवैध बांधकाम

    यावेळी उपस्थित मा. श्री झुरमुरे साहेब अप्पर प्रधान मुख्य वन सरक्षक नागपुर, श्री प्रशांत खाड़े विभागीय वनाधिकारी चंद्रपुर वनविभाग, प्रियंका वेलमे वनपारिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिचपल्ली, माजी न.प. उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, श्री एम. जे. मस्के क्षेत्र साहयक मूल वनरक्षक, सुधीर ठाकुर, राकेश गुरनुले उपस्थित होते.

    मूल तालुक्यात या वर्षी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली असून आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

  • Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

    Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

    mahavikas aghadi कलकत्ता, बदलापूर व नागभीड येथे झालेल्या अत्याचार प्रकरणविरोधात आज चंद्रपूर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फित लावत गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

    महाविकास आघाडीच्या वतीने आज 24 ऑगस्टला बंद पुकारण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद हा नियमबाह्य असल्याचे सांगितले.

    संतापजनक : मनोरुग्ण महिलेवर चंद्रपूर जिल्ह्यात सामूहिक अत्याचार


    देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे, यावर राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहे, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आली.


    Mahavikas Aghadi आयोजित निषेध आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार गट दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, शिवसेनेचे प्रमोद पाटील, कुसुमताई उदार, सुनीता लोढिया, संगीता अमृतकर उपस्थित होते.

    कायदा व सुव्यवस्था : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू


    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली की देशात व राज्यात महिला अत्याचार सतत वाढत आहे याबाबत मविआ ने बंद पुकारला होता मात्र न्यायालयाने बंद नियमबाह्य असल्याचे म्हटले होते, शरद पवार यांनी संविधानाचा आदर करीत तोंडाला काळ्या फिति लावत निषेध आंदोलन करण्याचे सांगितले, त्यामुळे आम्ही संविधानाचा आदर करीत आंदोलन करीत आहो. राज्यात घडलेल्या या घटना संतापजनक आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा.

    राज्य सरकारचा निषेध


    आमदार सुभाष धोटे म्हणाले की 23 ऑगस्टला हिंदू समाजाच्या मोर्च्यात पालकमंत्री व स्थानिक आमदार उपस्थित होते त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, यावर आम्ही त्यांचा निषेध करतो.
    आयोजित निषेध आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  • security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

    security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

    security guards आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. या बैठकीत सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू होणार असून, या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत सत्कार केला आहे.

    अवश्य वाचा : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

     security guards यावेळी कामगार संघटनेचे बाबु जावळे, समीर पठाण, राजेश गायकवाड, संजय नागपूरे, शरद मंचलवार, यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, माया पटले, करण नायर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       2015 मध्ये चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि 103 सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोंदित 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी वैध ठरविण्यात आली. त्यानंतर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडून मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. परंतु, तांत्रिक कारणांमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली. पुढील चाचणीसाठी तारीख लवकर देण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सुरक्षा रक्षकांना कळविण्यात आले, मात्र आदेश काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सदर सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले होते.

    अवैध बांधकाम : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

      आमदार किशोर जोरगेवार यांनी याचा गांभीर्याने विचार करून सदर सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची मागणी केली होती. मागणीच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. परिणामी मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावली. महानिर्मितीला 250 सुरक्षा रक्षकांची गरज आहे. या भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणीकृत 103 सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांना सरळ सेवेत घेण्यात यावे, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले होते. आता लवकरच हे सर्व कामगार कामावर रुजू होणार आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जवळपास 9 वर्षांची कामगारांची बहु प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी शुक्रवारी कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.

     यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “हा विजय कामगार आणि कामगार संघटनेच्या जिद्दीचा आहे. आपण एकजुटीने राहिलो, त्यामुळे आपल्याला हे यश मिळाले आहे. आपण सदैव कामगारांसोबत आहोत. आपल्याला न्याय मिळवून देता आला याचा नक्कीच आनंद आहे. आता आपण लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. जिथे गरज भासेल तिथे मी तुमच्यासोबत उभा राहील.” असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला सुरक्षा रक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.